या महिलांना Maharashtra मध्ये 3 Cylinder Free मिळणार आहे, बघा कोणती कागदपत्रे लागतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 Cylinder Free Maharashtra: मागील वर्ष 2024 हे महाराष्ट्रातील जनतेकरिता अतिशय महत्वपूर्ण आणि योजनामय गेले आहेत. महाराष्ट्र सरकारने विविध कल्याणकारी योजना तत्कालीन महायुती सरकारने राबविल्या आणि नवीन योजना देखील सुरु केल्या आहेत.

वाढत्या महागाई ने एकीकडे महिला तसेच समस्त जनता त्रस्त आहे. यावरच थोडी सांत्वन मिळण्याकरिता तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक वर्षात 3 Cylinder Free देण्याची घोषणा केली होती आणि काही दिवसातच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Maharashtra सुरु करण्यात आली आहे.

या योजनेद्वारे राज्यातील सरसघट महिलांना घरघुती 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. या योजनेतून संपूर्ण राज्यातील जवळपास 56 लाख 16 हजार कुटुंबाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनांद्वारे फायदा होणार आहे. थोडी का होई ना परंतु तेव्हडीच मदत महागाई पासून वाचण्याकरिता होत आहे.

Read Also: राशन कार्ड असेल तर महिलांना मिळेल 12600 रुपये, बघा सविस्तर माहिती

3 Cylinder Free मिळवण्यासाठी पात्रता

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मार्फ़त 3 Cylinder Free मिळवणन्यासाठी एलपीजी गॅस चे कनेक्शन कुटुंबातील महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • ज्या अर्जदार महिलांना केंद्रसरकारची योजना प्रधानमंत्री उज्वला योजना चा लाभ घेतला आहे, ते सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • मागील वर्षीच सुरु केलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी जा महिला पात्र झाल्या असतील किंवा लाभार्थी आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • एक रेशनकार्ड धारक कुटुंबातील फक्त एकच महिला 3 Cylinder Free Yojana चा लाभ घेऊ शकणार आहे.
  • अन्नपूर्णा योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना मिळणं ज्यांच्या घरी 14.2 किलो ग्राम गॅस सिलेंडर चे कनेक्शन असेल त्यांनाच मिळणार आहे.
  • ज्या परिवाराने आपले रेशन कार्ड 1 जुलै 2024 नंतर वेगळे वेगळे केले आहे, अशा परिवारातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेच्या लाभाची कार्यपद्धती

3 Cylinder Free Yojana म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना च्या लाभाकरिता दोन भागात विभागणी केली गेली आहे. एक उज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकरिता आणि दुसरी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्या लाडक्या बहिणी करीता. ते कशे याविषयी माहिती आपण खालील प्रमाणे बघू शकता.

1.उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता

  • केंद्रसरकार ची योजना प्रधान मंत्री योजनेच्या लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर हे तेल कंपनी मार्फ़त प्रदान करण्यात येते. तसेच अन्नपूर्ण योजना जी राज्यसरकार ने सुरु केली त्याचे 3 Cylinder Free हे सुद्धा तेल कंपन्या माध्यमातूनच दिले जाते.
  • महागाई च्या सत्रात उज्वला योजनेच्या गॅस सिलेंडर चे सरासरी भाव हे 800 पेक्षा अधिक आहेत. त्यावर सरकारद्वारा 300 रुपयांची सबसिडी देखील दिली जात आहे.
  • कार्यरत तेल कंपन्या ह्या राज्य सरकार कडून एक गॅस सिलेंडर चे अंदाजे 530 रुपये घेत असतात. परंतु अन्नपूर्णा योजनेद्वारे आत ती रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. सोबत लाभार्थ्यांची जी यादी राहील ती ऑफिसिअल साइट वर प्रसारित करावी.
  • योजनेच्या कुठल्याही लाभार्थ्यास एक महिन्यामध्ये फक्त एकाच गॅस सिलेंडर ची सबसिडी मिळणार आहे.
  • प्रत्येक जिल्हानिहाय गॅस सिलेंडर च्या किमतीमध्ये थोडा फरक असल्यामुळे जे सिलेंडर वितरित केले त्यांच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेले पैसे हे तेल कंपन्यांना दिले जाईल.

2.माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी

  • लाडकी बहीण योजनेच्या लाभ करीत पात्र असणाऱ्या महिलांना देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने मार्फत 3 Cylinder Free मिळणार आहेत. ज्यांचे वितरण देखील तेल कंपन्या मार्फतच केले जाणार आहे.
  • यांना सुद्धा एक महिन्यात एक पेक्षा अधिक सिलेंडर ची सबसिडी मिळणार नाही आहे.
  • सरकारद्वारा गठीत केलेल्या समितीने निश्चित केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलेच्या कुटुंबनिहाय माहिती, शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा, मुंबई/ जिल्हा पुरवठा अधिकारी अथवा अन्यधान वाटप अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील तेल कंपणाऱ्यांना विस्तारपूर्वक द्यावी.
  • माझी लाडकी बहीण योजनेनुसार जे पात्र महिला आहेत त्याचे राशन कार्ड नुसार कुटुंबाची सुनिश्चीतता ठरवावी.
  • सरकारने घेतलेला 1 जुलै 2024 च्या निर्णयाप्रमाणे जे पात्र महिला असतील त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल.
  • जर एखाद्या परिवाराने 1 जुलै 2024 नंतर रेशन कार्ड अलग केले असेल तर ते कुटुंब या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना PDF

3 Cylinder Free मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  1. अर्ज महिलेचे आधार कार्ड
  2. आधरसोबत लिंक असलेले बँक पासबुक
  3. माझी लाडकी बहीण योजना अर्ज भरलेली पोचपावती
  4. रेशन कार्ड
  5. दोन पासपोर्ट फोटो
  6. मोबाईल नंबर

योजनेचा लाभ असा घ्यावा

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना चा लाभ घेण्याकरिता महिलेला सांगितलेले सर्व कागदपत्रे घेऊन तुमचे गॅस कनेकशन असलेल्या एजेन्सी मध्ये जावे. तेथे जाऊन तुम्हाला E-KYC करावी लागणार आहे. आणि तेथील अधिकार्यां मागितलेली सर्व माहिती प्रदानकरावी लागणार आहे.

निष्कर्ष

वाढती महागाई हा राज्यातच नई तर संपूर्ण देशातील मोठं संकट आहे. ज्याला सर्वात जास्त तोंड हे सर्वसामान्य माणसालाच द्यावे लागते. पंतप्रधान यांनी मोफत गॅस उज्वला योजनेमार्फत तर दिले मात्र आटा त्याच एक गॅस सिलेंडर ची किंमत हि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही आहे. मानून राज्यसरकारने मोफत तीन सिलेंडर प्रति वर्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे या महागाईमुळे थोडा दिलासा जनतेला मिळत आहे.

FAQs

Que: अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

Ans- महाराष्ट्रातील महिला ज्यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेचा आणि माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. ते सर्व महिला अन्नपूर्ण योजनेच्या लाभार्थी होऊ शकणार आहेत.

Que: महाराष्ट्रात 3 सिलेंडर मोफत कसे मिळणार?

Ans- आर्थिक दृष्ट्या गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबातील महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मार्फ़त 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. त्याकरिता आपल्याला संबंधित गॅस एजेन्सी मध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment