शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता मिळणार प्रति वर्ष 15,000 रुपये: Namo Shetkari Yojana Maharashtra 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana Maharashtra 2025: नमो शेतकरी योजना हि राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुरु केलेली अतिशय महत्वाची योजना आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या योजना मार्फ़त प्रति वर्ष आर्थिक मदत दिले जाते.

हि योजना महाराष्ट्रातील कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागामार्फत वर्ष 2023 पासून राबविण्यात येत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना वाढण्यासाठी, बी- बियाणे खरेदीसाठी याची मदत होत असते.

आता काही दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी हा निधी वाढवण्याची घोषणा देखील केली आहे. ती कशी आणि नमो शेतकरी योजना महाराष्ट्र (Namo Shetkari Yojana Maharashtra) काय आहे, योजनेचा लाभ कसा घेता येईल, कोण पात्र असेल, कागदपत्रे काय लागतील तसेच अर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती आपणास खालील प्रमाणे वाचायला मिळेल.

Read Also: शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकार फळबागेसाठी देणार 100% अनुदान।

नमो शेतकरी योजना महाराष्ट्र माहिती: Namo Shetkari Yojana Maharashtra

केंद्रसरकारची PM Kisan Sanman Yojana हि देखील शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली मोठी योजना आहे. जी कि देशातील संपूर्ण शेतकऱ्यांकरिता आहे. त्याच प्रकारे Namo Shetkari Yojana Maharashtra हि योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. राज्यातील शेतकरी दोनी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

केंद्र सरकार PM Kisan Sanman Yojana मार्फत प्रति वर्ष 6000/- शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकते तर राज्य सरकार देखील प्रति वर्ष 6000/- टाकत होते. परंतु आत्ता हीच रक्कम वाढून 9000/- कारण्यासची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. हि आनंदाची बातमी ऐकून संपूर्ण शेतकरी अतिशय उत्साही झाला आहे.

आदी केंद्र सरकार आणि राज्यसरकार च्या योजना मिळून राज्यातील शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी 12000/- रुपये मिळत होते . आतापासून शेतकऱ्याला वाढीव रकम अर्थात 15000/- रुपये प्रत्येक वर्षी मिळणार आहेत.

या Namo Shetkari Mahasanman Nidhi मुळे शेतकऱयांना उत्पन्न वाढ होण्यास मदत तर होणारच आहे, सोबतच शेतकरी पीक उत्पादन होई पर्यंत घर खर्च देखील या निधीमधून भागवू शकणार आहे. खास वैशिष्ट्य हे आहे कि, येवडा मोठा निधी फक्त आपल्या महाराष्टातीलच शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आला आहे.

Read Also: Farmer ID Maharashtra 2025: फार्मर आयडी नसेल तर नाही मिळणार योजनेचा लाभ, मोबाईल वरूनच करा रजिस्ट्रेशन

नमो शेतकरी योजनेचे उद्दिष्ट

राज्यातील शेतकरी हा आनंदी आणि समृद्ध बेण्यासाठी सरकार विविध योजना प्रत्येक वर्षी राबवित असतात. मात्र नमो शेतकरी योजना महाराष्ट्र हि शेतकऱ्यांसाठी कुठल्या वर्दनापेक्षा कमी नाही आहे. कारण ना काही करता शेतकऱ्याला शेतकऱ्याला वाढीव रकम अर्थात 9000/-रुपये देणार आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने हि योजना आज कार्यरत आहे. उद्देश हाच आहे कि, शेतकऱ्यांनी शेती करून अधिक उत्पादन घ्यावे आणि जे नवीन तरुण आहेत त्यांनी देखील शेतीकडे करियर च्या नजरेने बघावे.

ज्यामुळे राज्यातील बेरोजगारीचे वाढणार नाही. शेतीच्या माध्यमातूनच राज्याचा विकास आणि राज्यातील नागरिकांचा देखील विकास करता येईल. नमो शेतकरी योजना महाराष्ट्र (Namo Shetkari Yojana Maharashtra) हिलाच “नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना” या नावाने सुद्धा ओळखले जाते.

नमो शेतकरी योजनेचे फायदे

नमो शेतकरी योजना मुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. ज्या च्या माध्यमातून शेतीतील पीक येई पर्यंत ते हा मिळणार निधी वापरून स्वतःचा उदर्निर्वाह करू शकणार आहेत. योजनेच्या माध्यमातून राज्यसरकार 9000/- रुपयाची निधी प्रति वर्ष देणार आहे.

सरकार प्रत्येकवर्षी जवळपास दोन कोटी शेतकऱ्यांना हा निधी खात्यात जमा करते. प्रत्येक दोन महिन्यांच्या फरकाने नाचूकता हा निधी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या योजनेसाठी जे शेतकरी पात्र असतील त्यांना PM Kisan Sanman Yojana चा देखील लाभ मिळणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्याला प्रत्येक वर्ष 15000/- रुपये मिळतील.

नमो शेतकरी योजनाची पात्रता व अटी

  • नमो शेतकरी योजनेसाठी पात्र होण्याकरिता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराकडे असलेली शेती हि त्याच्या नावाने असणे गरजेचे आहे.
  • जेही शेतकरी हे केंद्र सरकारची योजना PM Kisan Sanman Nidhi Yojana साठी पात्र असतील त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • जो हि अर्जदार असेल तो आयकर दाता असेल तर त्याला अपात्र करण्यात येईल.
  • शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरी करत नसावे.
  • शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा अधिक नसावे.
  • अर्जदाराचे बँक खाते खाते आधारकार्डासोबत लिंक असणे आवश्यक आहे.

नमो शेतकरी योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्याचे आधारकार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर
  • बँक खातेबुक
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • सातबारा आणि आठ अ
  • रेशन कार्ड
  • मतदान कार्ड

योजनेची अर्ज प्रक्रिया

राज्यातील जे शेतकरी PM Kisan Sanman योजनांसाठी पात्र आहेत, ते ऍटोमॅटिकली नमो शेतकरी योजना साठी पात्र होणार आहेत. आपण जर अजून PM Kisan Sanman Yojana चा अर्ज भरला नसेल तर सरकारने प्रसारित केलेल्या अधिकृत साइट वर जाऊन ऑनलाइन आज करावा लागणार आहे.

निष्कर्ष

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा हेच आमचे सुद्धा उद्दिष्ट आहे. ज्यामुळे शेतकरी हा जगाचाच फक्त पोशिंदाच नव्हे तर जगावरती राज्य करणारा बनेल. या योजनेमार्फत मिळणाऱ्या लाभामुळेच शेतकरी वाढत्या महागाई शी संघर्ष करू शकत आहे.

त्यामुळे ज्या युवा शेतकऱ्यांना अजूनही Namo Shetkari Yojana Maharashtra चा लाभ मिळत नसेल ते नक्की आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगा. आम्ही तुम्हाला नक्की मदत करण्याचा प्रयत्न करूया. तसेच नवीन नवीन योजनेची माहिती मिळवण्याकरिता तुमचा नंबर कंमेंट्स मध्ये टाकायला विसरू नका .

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता मिळणार प्रति वर्ष 15,000 रुपये: Namo Shetkari Yojana Maharashtra 2025”

Leave a Comment