ई श्रम कार्ड असेल तर मिळणार हे मोठे फायदे,अर्ज झालेत सुरु : E Shram Card Benefits In Marathi

E Shram Card Benefits In Marathi: भारत आणि महाराष्ट्र जरी कृषी प्रधान असले तरी मात्र बहुसंख्य नागरिक आणि युवा हे कामगार सुद्धा आहेत. जे कामगार असंघटित आहेत त्यांच्या साठी केंद्र सरकारने ई श्रम कार्ड सुरु केले आहेत. ज्याप्रकारे शेतकरी कार्ड मार्फ़त सरकार शेतकऱ्यांना विधा योजना चा लाभ देत आहे, त्याच प्रकारे आता देशातील कामगारांना सुद्धा सरकारने नवीन- नवीन योजनांचा लाभ या कार्ड मार्फ़त मिळणार आहे.

त्यासाठी त्या अधिकृत पोर्टल वर जाऊन नोंदणी कारवी लागणार आहे. नंतरच तुम्हाला ते कार्ड मिळू शकेल. आतापर्यत देशभरातील जवळपास तीस करोड कामगारांनी या कार्ड ची नोंदणी करून कार्ड मिळवले आहे. ई श्रम कार्ड म्हणजे काय? E Shram Card Benefits In Marathi कोणती?, याचे रजिस्ट्रेशन कोठे करायचे? रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया आणि कोणती कागदपत्रे लागणार आहेत? या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या एकाच आर्टिकल मध्ये बघायला मिळणार आहे.

महत्वाचे बघा: फार्मर आयडी नसेल तर नाही मिळणार योजनेचा लाभ, मोबाईल वरूनच करा रजिस्ट्रेशन

ई श्रम कार्ड म्हणजे काय?

E Shram Card Benefits In Marathi 2025

देशातील कामगारांचे ई श्रम कार्ड हे एक ओळखपत्र असणार आहे. जे दाखवून त्याला देशभरात कुठेही काम करता येणार आहे. मंग ते बांधकाम कामगार, शेती कामगार, भाजीपाला विक्रेता, फळ विक्रेता, साफसफाई कामगार, पाणीपुरी विक्रेता, झोमॅटो डिलिव्हरी बॉय आणि इतर कुठलेही असंघटित कामगार असो त्यांना हे ई श्रम कार्ड काडत येणार आहे.

ज्या कामगारांकडे हे कार्ड असेल तो देशभर कुठे हि काम करण्यास समर्थ असू शकेल आणि कोणीही त्या कामगाराला काम करण्यापासून बेदखल करू शकणार नाही आहे . शिवाय ज्या ठिकाणी तो काम करतो त्या ठिकाणातील प्रशासन आणि अधिकृत व्यक्ती सोडून. सोबतच सरकार ई श्रम कार्ड धारकांसाठी अनेको कल्याणकारी योजनांचा लाभ सुद्धा देऊ करणार आहे. त्यामुळं हे श्रम कार्ड असणे अतिशय फायदेशीर असणार आहे.

ई श्रम कार्ड चे फायदे मराठी : E Shram Card Benefits In Marathi

E Shram Card Benefits In Marathi
E Shram Card Benefits In Marathi

महत्वाचे बघा: कुक्कुट पालन योजना मार्फ़त सरकार देणार 75% अनुदान, अर्ज झाले सुरु

  • ज्या नागरिकाकडे किंवा कामगारांकडे ई श्रम कार्ड असेल त्यालाच देशभरात कुठेही कामाच्या अनुषन्गाने वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.
  • तसेच त्या कामगाराला प्रधानमंत्री श्रम योगी योजनेचा लाभ घेण्याकरिता सुद्धा पात्र करण्यात येणार आहे. या प्रधानमंत्री श्रम योजनेमार्फत ज्या कामगारांकडे ई श्रम कार्ड असेल आणि त्याचे वय हे 60 वर्ष पेक्षा जास्त असेल तर त्याला प्रति महिना 3,000 रुपये आणि वर्षाला 36,000 हजार रुपयाची पेन्शन हे सरकार मार्फ़त मिळणार आहे.
  • कामावर असताना किंवा एखादी बीके चालवत असतांना जर मृत्यू झाला तर त्या कामगाराच्या वारसाला 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत हि ई श्रम कार्ड मार्फ़त मिळते. जर अपघात झाला आणि त्यामध्ये अपंगत्व आले तरी सुद्धा 1,00,000 रुपयाची मदत हि कार्ड धारकाला दिली जाणार आहे. जणू एकप्रकारचं विमा सेवांची मिळणार आहे.
  • याच्या व्यतिरिक्त जर कामगार रोजगार हमी मध्ये काम करत असेल तर त्याला काम नाही मिळाल्यास बेरोजगारी भत्ता सुद्धा ई श्रम कार्ड मार्फ़तच दिला जाणार आहे.
  • सरकारनी केव्हाही नवीन योजना हि कामगारांसाठी सुरु केली असता, ज्या असंघटित कामगारांकडे श्रम कार्ड असेल त्यांना सर्वात आदी आणि डायरेक्ट लाभ मिळणार आहे.
  • देशातील काही राज्यातील सरकार हे ज्या युवक असंघटित कामगारांकडे हे ई श्रम कार्ड आहे त्यांना प्रति वर्ष 4,000 हजार रुपये सुद्धा देत आहे.
  • अशाप्रकारचे अनेको ई श्रम कार्ड चे फायदे आहे.

ई श्रम कार्ड काढायला लागणारे कागदपत्रे

  • कामगाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँकेचे खातेबुक
  • आधार कार्ड आणि बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट फोटो

ई श्रम कार्ड कसे काढायचे

आपण वरती ई श्रम कार्ड चे फायदे मराठी मध्ये बघितलेच आहेत. सोबत कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे सुद्धा पहिली. आता ई श्रम कार्ड कसे काढायचे, त्याचे ऑनलाईन रजिष्ट्रेशन कसे करायचे आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया हि खालीलप्रमाणे जाणून घेणार आहोत.

  • सर्वप्रथम तुम्हाला गुगल वरती जायचे आहे आणि तेथ E Shram असे शेअरच करायचे आहे.
  • तिथे जर तुम्हाला E Shram Home असे दिसले असेल तर त्या साईट वर क्लिक करायचे आहे.
  • तुमचे पुढे सरकारच्या अधिकृत साईट चा डॅशबोर्ड ओपन होईल आणि तिथे पंतप्रधान मोदी यांचा फोटो दिसेल.
  • साईड ला गेले तर तिथे तेथे तुम्हाला रजिस्टर व ई श्रम हा एक पर्याय दिसेल
  • त्यावर क्लिक केले तर तुमच्या पुढे रजिस्ट्रेशन करण्याचा पर्याय येईल
  • त्यामध्ये तुम्हाला मोबईल सी संलग्न असलेला आधार नंबर टाकावा लागणार.
  • त्याच्या खाल्ली दिलेला कॅप्चा व्यवस्तीत भरावा लागेल
  • त्याच्या खाली अंकी दोन एस/नो चे पर्याय दिसतील, त्या दोन्ही ला तुम्हाला नो, नो असे निवडायचे आहे
  • सर्व भरन झाले कि मग सेंड ओटीपी या पर्यायावर क्लीक करावे लागणार आहे.
  • तुमच्या आधार कार्ड शी लिंक असलेला जो मोबाईल नामाबर असेल त्यावर हा ओटीपी जाणार आहे
  • तो आलेला ओटीपी येथे टाकून सबमिट करायचा आहे.
  • नंतर परत एकदा तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आणि सोबत एक कॅप्चा सुद्धा भरायचा आहे.
  • दिलेल्या सर्व अटी मान्य आहेत या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि पुन्ना एकदा सबमिट बटनावर क्लिक करायचे.
  • मग एकदा तुमच्या नंबर वर एक ओटीपी येतो, तो ओटीपी तुम्हाला व्हॅलिडेट करावा लागेल
  • यानंतर परत तुम्हला तुमच्या आधाराची माहिती दिसेल, ती बरोबर आहे किंवा नाही चेक करून पुचे जायचे आहे.
  • नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील, त्याचे तुम्हाला उत्तरे द्यायचे आहेत.
  • मग तुमचा वारसदार कोण असेल हे सुद्धा तेथे टाकायचे आहे, सोबत वारासदाराचे संपूर्ण डिटेल सुद्धा भरायचे आहे
  • खाली तुमचा सध्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी पत्ता टाकावा लागेल.
  • नंतर तुमचे शिक्षण किती आहे याविषयी माहिती भरायची आहे. सोबतच तुमचे काही कागदपत्रे सुद्धा उपलोड करावे लागतील.
  • तुमचे उत्पन्न किती आहे याची सुद्धा माहिती भरणे गरजेचे राहणार आहे.
  • तुम्ही सध्या कुठले काम करता, कुठला व्यवसाय करता हे टाकायचे आणि सोबत तुमचे बँक डिटेल सुद्धा भरायची आहे.
  • हे सर्व एकदा भरलं आणि सबमिट केलं तर तुम्ही भरलेली सर्व माहिती तुमच्या स्क्रीन वरती येईल. तुम्ही भरलेली माहिती परत चेक करू शकता. आणि मग सबमिट बटनावर क्लीक केलं कि तुमचं ई श्रम कार्ड च रजिस्ट्रेशन पूर्ण होत.
  • नंतर मंग तुमचे ई श्रम कार्ड तयार होत, जे तुम्ही याच साईट करून डाउनलोड देखील करू शकता
  • आशा प्रकारे तुम्ही सरळ पद्धतीने रजिष्ट्रेशन करून ई श्रम कार्ड चे फायदे घेऊ शकता.

निष्कर्ष

देशभरातील असंघटित कामगारांच्या कल्याणा करीता आणि सुरक्षा करीता केंद्र सरकारने ई श्रम कार्ड सुरु केले आहे. ज्याचे मोठे फायदे होणार आहे. आपण या आर्टिकल मध्ये आज ई श्रम कार्ड म्हणजे काय, E Shram Card Benefits In Marathi मध्ये बघितले आहेत.

सोबतच कसे काढायचे त्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची संपूर्ण प्रक्रिया सुद्धा बघितली आहे. आम्हाला आशा आहे कि आर्टिकल मध्ये सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल आणि तुम्हाला श्रम कार्ड काढण्यास कमी येईल. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करत असतांना कुठलीही अडचन येत असेल तर नक्की आम्हाला कंमेंट्स करा आणि हि माहिती जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, धन्यवाद.

FAQs

  1. Que: ई श्रम कार्ड साठी कोण पात्र आहे?

    Ans- देशातील सर्व असंघटित कामगार ज्यांचे वय 18 ते 60 मध्ये आहे, ते ई श्रम कार्ड काढण्यास पात्र आहेत. मग ते भाजीपाला विक्रेता, फळ विक्रेता, दूधवाला, शती कामगार, साफसफाई कामगार, डिलिव्हरी बॉय, दुकानदार, गायी पालन करणारा, कुक्कुट पालन करणारा, घर कामगार यांसारखे सर्व पात्र असणार आहेत.

  2. Que: श्रम कार्ड साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

    Ans- अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खातेबुक, जातीचा दाखल, रहिवासी दाखला, पासपोर फोटो, शाळेचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र श्रम कार्ड काढण्यासाठी गरजेचे असणार आहेत.

Leave a Comment