बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बांधकाम कामगार म्हंटले कि आपल्याला रोडचे काम करणारे आणि रस्त्याच्या कडेला झोपडे बांधून राहणारे लोक आठवतात. परंतु हि त्यांची मजबुरी असते. मागील दोन वर्षांपासून या बांधकाम कामगारांवर सरकार विशेष लक्ष देत आहे आणि त्यांना या आधुनिक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचा प्रयत्न करत आहे. सरकार कामगारांना आरोग्याच्या, निवासाच्या, तसेच्या त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष योजना राबवत आहे.

Read Also: Bandhkam Kamgar Bhandi Yojana: बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांड्याचा सेट,आताच करा अर्ज

गृहनिर्माण योजना- हक्काचे पक्के घर मिळवण्याची संधी

आपल्याला माहीतच आहे कि सरकार अनेको योजना बांधकाम कामगारांसाठी राबवत आहे. त्यापैकीच एक गृहनिर्माण योजना सुद्धा आहे. या योजनेच्या मार्फत बांधकाम कामगारांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी सरकार 2.5 लाख रुपयाचा निधी अनुदान स्वरूपात देणार आहे.

तसेच ज्या कामगारांकडे घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन नाही आहे त्यांना जमीन खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये जस्तीची मदत करणार आहे. बांधकाम कामगार नेहमी रस्ते आणि मोठं मोठ्या बिल्डिंगा बांधतांना आपण बघतो, पण आता मात्र त्यांचे स्वतःचे हक्काचे पक्के घर होणार आहे. ज्यामुळे राज्यातील हजारो कामगारांचे दिवस आणि भविष्य बदलण्याची हि एक मोठी संधी चालून आली आहे.

पात्रता निकष आणि अटी

स्वतःचे पक्के घर मिळवण्यासाठी खालील अटी आणि निकषांमध्ये बसने आवश्यक आहे.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा
  • मागील पूर्ण वर्षात त्याने कमीत कामी 90 दिवस तरी बंधक कामगार म्हणून काम केलेलं असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार बांधकाम कामगारांचे वय हे 18 ते 60 च्या दरम्यान असायला हवे.
  • या पूर्वी अर्जदाराने घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

बांधकाम कामगाराला मिळणार अन्य सुविधांचा लाभ

कामगाराला पक्के घर तर मिळणारच सोबत त्या घरासाठी भांड्याचा संच, कामगाराला सेफटी किट, आरोग्याच्या सुविधा, कामगाराचा विमा, पेन्शन तसेच अपघाती विमा देखील मिळणार आहे. ज्यामुळे कामगारांचे आणि त्यांचे कुटुंबाचे जीवनमन सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच विकासाकडे त्याची वाटचाल होईल.

मुलांना शिक्षण आणि प्रशिक्षण योजना

कामगारांचे मुलं जर चांगले शिक्षण घेऊ पाहत असतील तर त्यांना उच्च शिक्षण घेण्याकरिता सरकार शिष्यवृत्ती स्वरूपात मदत करणार आहे. कामगार पाल्याला सरकार 1 लाख रुपये शिष्यवृत्ती प्रदान करत आहे. तसेच त्यांना पुस्तक घेण्यासाठी आणि राहण्याची सोयी साठी सुद्धा मदत करणार आहे. ज्यामुळे कामगाराचे भविष्य उज्वल होईल आणि त्यांना त्यांच्या पालकांप्रमाने जीवनाशी संघर्ष करण्याची आवश्यकता पडणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्र

  • बांधकाम कामगार असण्याचे प्रमाणपत्र
  • स्वतःचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँकेचे पासबुक
  • 90 दिवस काम केल्याचा पुरावा

असा करा अर्ज

योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्या तालुका मधील बांधकाम विभागामध्ये जावे. तिथे योजनेची संपूर्ण माहिती काढावी आणि योजनेचा अर्ज सुद्धा तेथूनच घ्यावा. तो अर्ज भरून सोबत मागण्यात आलेले कागदपत्रे सुद्धा जोडावीत आणि ते संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करावा. किंवा सरकारने सुरु केलेल्या मदत केंद्राला भेट द्यावी.

निष्कर्ष

हि योजना सरकारने समाजातील एक महत्वपूर्ण आणि विशिष्ट्य घटक असलेल्या बांधकाम कामगाराकरिता सुरु केली आहे. ज्यामुळे त्यांच्या जीवनात एक आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे उद्देश सरकारचे आहे. सरकारच्या या आर्थिक मदतीमुळे हजारो कामगारांचे हक्काचे पक्के घर तयार होणार आहे.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment