Amrut Yojana Maharashtra: राज्यातील तरुण युवक आणि युवती ह्या रोजगार मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्शील असतात. त्यासाठी त वेगळे वेगळे कोर्स स्वतः हजारो रुपये भरून करत असतात. आशा असते ते फक्त चांगला जॉब मिळण्याची. दहावी झाली कि, विध्यार्थी कॉम्पुटर चे कोर्स MSCIT आणि टायपिंग करून घेत असते.
काही विद्यार्थी इतके गरीब परिवातील असतात कि, त्यांच्या पालकांकडे हे फीज भरण्याचे पैसे नसतात. तरी सुद्धा ते पालक इकडून तिकडून उधार किंवा व्याजाने पैसे काढून मुलाने हा कोर्स करण्यासाठी पैसे भरतात. अशाच विद्यार्थ्यांसाठी सरकार अमृत योजना महाराष्ट्र अंतर्गत शासकीय संगणक टंकलेकन बेसिक कोर्स उत्तीर्ण झाल्यास 6,500 रुपये प्रोत्साहन स्वरूपात देणार आहेत.
तसेच जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन पद्धतीची लघुलेखन परीक्षा पास होतील त्यांना सुद्धा 5,300 रुपये प्रोत्साहन स्वरुपाध्येच दिले जाणार आहेत. आता हि अमृत योजना काय आहे? त्यासाठी पात्रता काय लागेल? सरकारचा उद्देश्य काय आहे आणि अर्ज कसा करायचा? आणि कागदपत्रे कोणती लागतील? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण खालील प्रमाणे बघुयात.
Amrut Yojana Maharashtra सरकारचे उद्देश
दरवर्षी राज्यातील पात्र अर्जदारांना अमृत योजनेचा लाभ दिला जात असतो. आजचे युग आधुनिक आहे, त्यामुळे नवीन पिढीला जर स्वतःचा विकास करायचा असेल कॉम्पुटर चे ज्ञान असणे आवश्यक आहे. हे कोर्सेस जास्तीत जास्त युवक आणि युवतींनी करण्यासाठी सरकारे हि योजना राबवत आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील उमेदवार याचा लाभ घेऊ शकणार आहेत. ज्यामुळे त्यांना भविष्यात रोजगार मिळवण्यास सुद्धा मदत होणार आहे.
योजनेसाठीची पात्रता
Amrut Yojana Maharashtra चा लाभ घेण्याकरिता तुम्हाला खालील प्रमाणे जे पात्रता निकष सांगण्यात आले आहेत, ते पूर्ण करणे अत्यंत गरजेचे असणार आहेत.
- अर्जदाराने याआधी कोणत्याही इत्तर संस्थेकडून आर्थिक मदत घेतलेली नसावी. त्याचे स्वयंघोषणापत्र सुद्धा अर्जदाराला प्रस्तुत करावे लागणार आहे. तसेच ज्या संस्थेमार्फत तुम्ही हे कोर्स केला त्या संस्थाचालकांचे सुद्धा स्वयंमघोषणापत्र द्यावे लागेल.
- अर्जदार टंकलेखनाचा कोर्स उत्तीर्ण असणे तसेच ऑनलाईन घेण्यात येत असलेली लखूलेखनाची टेस्ट सुद्धा पास होणे बंधनकारक आहे. कारण त्याचे प्रमाणपत्र हे अर्ज करताना सादर करावे लागणार आहे.
- तुम्ही टायपींक करण्यासाठी जी फी भरली असेल त्याची पावती आणि स्वयं टेस्टट सर्व पुरावा देणे येथे गरजेचे असणार आहे.
- अर्जदार किमान दहावी तरी उत्तीर्ण असावा.
असा मिळेल लाभ
- अर्जदार ने जर का महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संगणक टंकलेखक बेसिक कोर्स (अर्थात टायपिंग मध्ये मराठी ला 40 किंवा हिंदी ला 50 आणि इंग्रजीला 60 शब्द प्रति मिनिट) करून टेस्ट पास केले असेल त्यांना Amrut Yojana Maharashtra अंतर्गत सरकार प्रोत्साहन स्वरूपात 6,500 रुपये आर्थिक मदत करणार आहे.
- तसेच जर का अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन ( मराठी मध्ये किंवा हिंदी मध्ये 60,80,100 आणि 120 शब्द प्रति मिनिट तसेच इंगजी मध्ये लघुलेखनात 60,80,100,120,130,140,150 आणि 160 शबद प्रति मिनिट) करून तसे उत्तीर्ण होईल त्यांना 5,300 रुपयाचे प्रोत्साहन पर मदत दिली जाणार आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही आहे. तसेच लाभार्थ्यांच्या थेट आधारसीं लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी खालीलप्रमाणे जी कागदपत्रे सांगितली आहेत ते असणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.
महत्वाचे बघा: राशन कार्ड असेल तर महिलांना मिळेल 12600 रुपये, बघा सविस्तर माहिती
- अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
- स्वतःचे पॅन कार्ड
- मेल आयडी
- सुरु मोबाईल नंबर
- अर्जदाराचा रहिवासी दाखला
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट फोटो (ऐकून आठ)
- आधारसीं लिंक बँक खातेबुक
- स्वयंघोषणापत्र
- संस्थेचे घोषणापत्र
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
असा करा योजनेचा अर्ज
सरकारच्या Amrut Yojana Maharashtra साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ते कुठे आणि कसा खराब लागेल हे आपण खालील प्रक्रियेमार्फत जाणून घेऊ शकता.
- सर्वप्रथम योजनेचा अर्ज भरण्यासाठी वरती जे कागदपत्रे सांगितली आहेत ते गोळा करून घ्यावीत.
- नंतर योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी mahaamrut.org.in या अधिकृत संकेस्थळावरती जावे.
- तेथे सर्वप्रथम तुमच्या आधारकार्ड च्या माध्यमातून लॉग इन करावे लागेल आणि नंतर तुम्ही योजनेचा अर्ज हा भरू शकणार आहेत.
- अर्ज भरत असतांना सर्व माहिती अचूक असावी याची दक्षता घ्यावी.
- अर्जासोबत काही कागदपत्रे आणि स्वयंघोषणापत्रे सुद्धा अपलोड करावी लागणार आहेत.
- आणि सर्व झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा लागणार.
- अशा अगदी सोप्या पद्धतीने Amrut Yojana Maharashtra चा लाभ घेण्यासाठी आपण मोबाईल वरूनच अर्ज करू शकता.
निष्कर्ष
Amrut Yojana Maharashtra साठी अर्ज सध्या सुरु झालेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्या. अर्ज करत असतांना काही अडचण येत असेल तर कंमेंट्स मध्ये नक्की सांगा.