दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी मिळणार मोफत ई रिक्षा, बघा संपूर्ण माहिती: Divyang E Rickshaw Yojana Maharashtra

Divyang E Rickshaw Yojana Maharashtra: आत्मनिर्भर भारत सरकारचे घोषवाक्य आपण नेहमी ऐकत असतो. या वाक्याप्रमाणे देशातील आणि राज्यातील सरकार महिलांना, युवकांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा विविध योजनाअंतर्गत आर्थिक मदत करत असते. महाराष्ट्र सरकारने राज्यातील अपंग बांधवांचा विचार करत त्यांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली आहे.

त्यामार्फ़त त्यांना अनेक वेगळ्या- वेगळ्या योजना राबवून स्वावलंबि बनवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्या योजनांपैकीच राज्यसरकारची एक महत्वाची योजना म्हणजे दिव्यांग ई रिक्षा योजना आहे. त्यामार्फ़त दिवायंग बांधवांना आणि भगिनींना मोफत इलेकट्रीक रिक्षा दिला जाणार आहे. जो कि एक व्यवसायिक रिक्षा असेल, या रिक्षा वरती तो स्वतःचे दुकान लावून स्वतःचे आणि परिवाराचे पालन पोषण करू शकणार आहे.

महत्वाचे बघा: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर Pink E Rickshaw Yojana Maharashtra मार्फत मिळणार इलेकट्रीक रिक्षा.

Divyang E Rickshaw Yojana Maharashtra In 2025: अपंग ई रिक्षा योजना महाराष्ट्र

Divyang E Rickshaw Yojana Maharashtra In 2025
Divyang E Rickshaw Yojana Maharashtra In 2025

दिव्यांग म्हटले कि आपल्या समोर रस्त्यावर भीक मागणारे, बस स्टॅन्ड वर बसून दान मागणारे आठवत असेल. परंतु अजून सुद्धा स्वतःच्या मेहनतीवर जीवन जगण्यासाठी तळमळ करणारे सुद्धा आहेत. पण त्यांच्या दिव्यांगपणा मुळे स्वतः काहीही करू शकत नाहीत. त्यांचे दुःख लक्षात घेऊन राज्य सरकारने अपंग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी हि योजना आणली आहे. ज्या मार्फ़त अगदी मोफत पात्र अपंगांना स्वतः व्यवसाय करण्यासाठी ई रिक्षा दिला जाणार आहे.

कोणाला दान मागचे काम नसेल आणि स्वतःच्या भरोशावर संपूर्ण कुटुंब सुद्धा चालू शकेल. अशी हि सरकारी योजना आहे. आता योजनेचा अर्ज कुठे करायचा, योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील, कोण लाभास पात्र असेल, सरकारचे उद्दिष्ट्य काय आहे आणि अर्जदाराचा फायदा काय होणार या सर्व बाबींविषयी सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे बघू शकणार आहात.योजनेचे

योजनेमागील उद्देश

  • राज्यातील इतर नागरिकांप्रमाणे अपंग बांधवांनासुद्धा आत्मनिर्भर बनवणे
  • दिव्यांग बांधवांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यास Divyang E Rickshaw Yojana Maharashtra आर्थिक मदत करणे.
  • त्यांना दुसऱ्याच्या भरोशावर जीवन जगण्याचे काम पडू नये.
  • अपंग बांधवांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा.
  • स्वतःच्या व्यवसायातून ते स्वतःचे आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचे चांगल्या प्रकारे पालन पोषण करू शकतील.

योजनेच्या काही पात्रता अटी

Divyang E Rickshaw Yojana Maharashtra चा लाभ घेण्याकरता खालील निकषांमध्ये बसने आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अर्ज केला तरीसुद्धा तुमहाला अपात्र करण्यात येणार आहे. म्हणून खालील पात्रता निकष ध्यानपूर्वक समजून घ्या.

  • हि योजना महाराष्ट्र शाशन कडून राबविण्यात येत आहे, त्यामुळे अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदार हा 40% दिव्यांग असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच या योजनेचा लाभ त्याला घेता येईल.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्ती कडे अपंग असल्याचे आयडी कार्ड असायला हवे.
  • पात्र होण्याकरिता किमान वय हे 18 आणि कमाल वय 55 असावे.
  • अपंग व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच त्याला योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदार दिंव्यंग व्यक्ती हा सरकारी कुठल्याही मंडळामध्ये नोकरी करत नसावा.
  • जर त्या व्यक्तीवर कुठलेही कर्ज असेल तर ते थकबाकी असायला नको. अन्यथा अर्जदाराला अपात्र करण्यात येऊ शकते.

अर्जदाराची निवड पद्धती

योजनेसाठी लाभार्थी बनवण्याकरिता अर्जदार जेवढा अधिक अपंग असेल तेवढे अधिक प्राधान्य हे त्याला दिले जाणार आहे. जर का समाज अर्जदाराची मानसिक स्थिती बरोबर नसेल तर त्याच्या पालकाला योजनेचा लाभ दिलों जाईल. अर्जदाराने या आधी कोणत्याही कोणत्याच योजनेतून ई रिक्षा चा लाभ घेतलेला नसावा. व्यवस्थित पद्धतीने अर्ज सबमिट केला असेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडले असेल अशांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने घोषित केलेल्या जीआर अनुसार पात्र व्यक्तीस मोफत ई रिक्षा दिली जाईल. ज्याची किंमत 3.75 लाख रुपये असेल.

लागणारी आवश्यक कागदपत्रे

महत्वाचे बघा: दहावी पास असाल तर सरकार देणार 5,000 रुपये महिना: Pradhanmantri Internship Yojana

योजनेचा अर्ज करण्यापूर्वी जे खालीलप्रमाणे कागदपत्रे सांगितली आहेत ते गोळा करून घ्यावीत. म्हणजे अर्ज करताना पाहिलं गडबड होणार नाही आणि तुमचा अर्ज व्यवस्थित भारत येईल.

  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. दिव्यांग प्रमाणपत्र
  3. UDID प्रमाणपत्र
  4. बँकेचे खातेबुक
  5. रहिवासी दाखला
  6. जातीचा दाखला
  7. अधिवास प्रमाणपत्र
  8. पासपोर्ट फोटो
  9. स्कॅन केलेली सही

या अपंग बांधवांना अर्ज करण्याची गरज नाही

ज्या दिव्यांग व्यक्तींनी मागील वर्षी Divyang E Rickshaw Yojana Maharashtra साठी ऑनलाईन अर्ज केला होता, मात्र त्यांना अजून पर्यंत लाभ मिळाला नाही त्यांना यावर्षी पार्ट अर्ज करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा योजनेच्या लाभाचा नंबर येईल तेव्हा तुम्हाला नक्की लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे अधिक काळजी करण्याचे काही कारण नाही आहे.

असा करा योजनेचा अर्ज

सर्वप्रथन योजनेचा लाभ घेण्याकरिता आपण पात्र आहोत कि नाही ते बघा. नंतर सांगितलेले सर्व कागदपत्रे गोळा करून ठेवा. नंतर खाली प्रमाणे जी प्रक्रिया सांगितली आहे त्याचा अवलंब करून तुम्ही योजनेचा अर्ज करू शकणार आहेत.

  • योजनेचा अर्ज करण्यासाठी आदी तुम्हाला सरकारने प्रसारित केलेली साईट egister.mshfdc.co.in यावरती जावे लागेल.
  • नंतर तिथे देण्यात आलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचून काढाव्यात.
  • रजिस्ट्रेशन करण्यासाठी उजव्या बाजूला एक मेनू दिसेल.
  • त्या मेनू मधील चौथ्या नंबर ला रजिस्ट्रेशन नावाचा पर्याय दिसेल तयावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल.
  • तेथे योजनेचा फॉर्म असेल.
  • त्या फॉर्म मध्ये तुमच्या स्वतः विषयीची माहिती व्यवस्तित भरावी लागणार आहे.
  • सोबत काही प्रमाणपत्र आणि काही कागदपत्र सुद्धा उपलोड करणे गरजेचे आहे.
  • सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यावर, अर्ज पार्ट एकदा तपासून घ्या आणि मंग सबमीट करा.
  • अश्या अगदी सोप्या पद्धतीने दिव्यांग ई रिक्षा योजनांचा अर्ज तुम्ही मोबाइलवरूनच भरू शकणार आहेत.
  • तसेच तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमच्या आधारसीं जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर नोंदणी क्रमांक येतो.
  • जरा नंतर कधी तुमच्या अर्जाचे स्टेट्स चेक करायचे असेल तर हाच नोंदणी क्रमांक टाकून तुम्ही चेक करू शकणार आहेत.

निष्कर्ष

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे हे आपण सर्व लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. याच समाजाचा एक अविभाज्य भाग हे अपंग नागरिक सुद्धा आहेतच. परंतु त्यांना अपंग असल्यामुळे हिणवलं जात, कमजोर समजल्या जात. कारण कि त्यांचे संपूर्ण जीवन मान हे इत्तरांवरती अवलंबून असते.

त्यांना सुद्धा स्वावलंबी होण्याची इच्छा असते, मात्र कधी कधी नशीब सुद्धा समाजाप्रमाणे त्यांना संघर्ष करण्यास भाग पाडत. परंतु जर या योजनेचा अर्ज तुम्ही भरला तर सरकार तुम्हाला अपंग असले तरी स्वतःच्या पायावर उभे केल्या शिवाय सोडणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा आणि स्वतःच्या व्यवसाय करिता Divyang E Rickshaw Yojana Maharashtra मार्फत इलेकट्रीक रिक्षा मिळावा.

FAQs

Que: अपंग ई रिक्षा योजनेमार्फ़त किती अनुदान दिले जाते?

Ans– पात्र लाभार्थ्याला सरकारने जाहीर केलेल्या गिअर च्या अनुसार व्यवसायिक ई रिक्षा करीता 3.75 लाख रुपये अनुदान स्वरूपात दिले जाणार आहेत.

Que: ई रिक्षा योजना कोणी सुरु केली?

Ans– महाराष्ट्र सरकारने राज्यातील अपंग बांधवांसाठी हि ई रिक्षा योजना सुरु केली आहे. त्यामार्फ़त अपंग बांधवांना आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.

Que: योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

Ans– महाराष्ट्र राज्यातील 18 ते 55 वयोगटातील 40% अपंग असलेले बांधव योजनेचा अर्ज करू शकणार आहे. सोबतच लाभ घेण्याकरिता काही पात्रता अटी सरकारने लादून दिलेल्या आहे. ते आपण वरील प्रमाणे बघू शकता.

Que: लाभार्थ्यांची निवड करतांना प्रथम प्राधान्य कोणाला दिले जाणार?

Ans– जो अर्जदार अधिक अपंग असेल, त्याला योजनेच्या लाभ मिळण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती घोषणापत्रामध्ये नमूद आहे.

Que: योजना सुरु करण्यामागील उद्देश काय आहे?

Ans– राज्यातील अपंग व्यक्तींना आत्मनिर्भर बनवणे, त्यांचा आर्थिक विकास करणे तसेच सामाजिक पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

Leave a Comment