Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra 2025: ज्याप्रकारे राज्यातील बेरोजगार युवकांसाठी आणि राज्यसरकारने माझा लाडका भाऊ योजना सुरु केली होती, त्याच प्रकारे आता उच्चशिक्षित बेरोजगार युवकांकरिता Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra 2025 राबविण्यास सुरुवात झाली आहे.
ज्यामुळे बेरोजगारी तर घातलाच सोबतच जे तरुण मित्र आहेत त्यांना सरकारी कामकाजाचा अनुभव आणि संशोधन करण्याचे सुद्धा भाग्य लाभणार आहे. कदाचित त्याचा फायदा त्यांना जीवनातील अन्य अडचणींचा सामना करण्यासाठी देखील होऊ शकेल.
जे युवक सरकार नोकरी ची तयारी करत आहेत त्यांना सुद्धा या मार्फ़त मदत होऊ शकणार आहे. तसेच आर्थिक अडचणीहि दूर होतील. चाल तर Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra नेमकी काय आहे, कोण अर्ज करू शकणार, कोणती कागदपत्रे लागतील आणि योजनेचा लाभ कसा मोडेल याची सखोल माहिती आपण खालीलप्रमाणे बघुयात.
महत्वाचे बघा: बेरोजगारी भत्ता योजना 2025। Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra
Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra Information: मुख्यमंत्री फेलोशिप योजनाची संपूर्ण माहिती मराठी
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तसेच राज्यातील महिलांचे लाडके देवा भाऊ यांनी युवकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी अलीकडेच Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra ची घोषणा केली होती. हि योजना वर्ष 2025-2026 या वर्षांमध्ये राबविण्यात येणार आहे.
अर्थातच योजनेचा कालावधी हा एक वर्षापुरते मर्यादेत ठेवण्यात येणार आहे. पात्र युवकांना या योजनेअंर्तगत एक वर्षापर्यंतच रोजगार दिला जाईल. जे कि सरकारी कार्यालयामध्ये कामाचा अनुभव देखील मिळणार आहे. राज्याच्या नियोजन विभागाअंतर्गत सरकारी जी आर देखील प्रसारित केला गेला आहे.
योजनेच्या माध्यमातून 21 ते 26 या वयोगटातील ऐकून 60 मुलांना हि फेलोशिप मिळणार आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra ची ऑनलाईन अर्ज हे 16 एप्रिल पासून सुरु देखील केले गेले आहेत.
महत्वाचे बघा: Free Laptop Yojana Maharashtra: विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप,हे लागणार कागदपत्र, लवकर करा अर्ज.
मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र उद्देश
राज्यातील सर्व उच्चशिक्षित युवकांना शिष्यवृत्ती सोबतच शासकीय कामकाजामध्ये सहभागी होण्याची हि एक उत्तम आणि मोठी संधी असणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी तर दूर होतीलच सोबत संशोधन वृत्ती देखील जागृत होण्यास मदत होणार आहे.
ज्यामुळे प्रशासकीय सेवेची तयारी करणाऱ्या मुलांना फार मोठा अनुभव मिळणार आहे. तसेच शासनाचे धोरानात्मक कामकाज जवळून बघता यावे व प्रशासन कशाप्रकारे राज्य चालावते ह्याची जाणीव हि करून देणे हा सरकारचा उद्देश आहे.
फेलोशिप कार्यक्रमाचे मानधन आणि लाभ
योजनेचा अर्ज भरून पात्र झालेल्या उमेदवारांना Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra मार्फ़त प्रति माह मानधन 56,100 रुपये दिले जाणार आहे. तसेच प्रवासखर्च 5,400 रुपये मिळणार आहेत. एकंदरीत बघितले तर टोटल दर माह मानधन 61,500 रुपये एवढे सरकार फेलोशिप म्हणून देणार आहेत.
सोबतच शासकीय विभागांचे प्रशिक्षण आणि नेतृत्व विकास कार्यशाळा होईल. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या शासकीय परिषदांमध्ये सुद्धा सहभागी होता येणार आहे.राज्यपातळीवरील मोठं मोठ्या अधिकार्यांसबत कामाचा अनुभव येईल तसेच राजकारणातील दिग्गज नेत्यांसोबत सुद्धा वेळ घालवता येणार आहे.
महत्वाचे बघा: टायपिंग येत असेल तर सरकार देणार 6,500 रुपये, लवकर करा अर्ज: Amrut Yojana Maharashtra
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे वैशिष्ट्य
- राज्यातील शासन धोरण निर्मिती आणि मांडणी प्रक्रियेत सहभागी होता येईल
- राज्य सरकारच्या विविध सरकारी विभागांमध्ये एक वर्ष काम करू योगदान देण्याची संधी.
- देशातील प्रशासकीय अधिकारी असलेल्या, मंत्री असलेल्या आणि तज्ञ् असलेल्या लोकांसोबत कामाचा अनुभव मिळेल
- स्वतःमध्ये संशोधन कौशल वाढवण्याकरिता योग्य वातावरण मिळेल
- सरकारकडू मासिक मंधांसोबतच इतरही सोइ सुविधा मिळतील
फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या जबाबदाऱ्या
Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra मध्ये पात्र झाल्यानंतर एक वर्षाकरिता कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती देण्यात येतील ते खाईलप्रमाणे बघा.
- शासनाने नेमून दिलेल्या विविध प्रकल्पाचे संशोधन करणे
- नवीन नवीन धोरणे बनव्याकरिता सरकारची मदत करणे
- निवडून दिलेल्या विभागातील प्रशासकीय लेवल चे काम बघणे
- सरकारी योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करून घेणे
- नवीन तंत्रज्ञांच्या साहाय्याने शासकीय कामकाजाला गती देणे
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी पात्रता निकष
- अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra चा अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत अर्जदाराचे वय हे किमान 21 आणि कमाल 26 वर्ष असणे आवश्यक आहे
- अर्जदाराने कोट्याही शाखेमध्ये पदवी केलेली असावी तसेच त्याला 60% पेक्षा अधिक गुण असावे
- उमेदवाराला किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असावा. मग ते इंटर्नशिप/ आर्टिकलशिप/ अप्रेंटीशीप सुद्धा चालेल. एवढेच नाही तर स्वयंरोजगार किंवा स्वयंउद्योजगतेचा अनुभव सुद्धा चालेल. त्याकरिता फक्त त्याचे स्वयंघोषणापत्र असणे आवश्यक असेल.
- अर्जदाराला पात्र होण्याकरिता मराठी भाषा वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे. तसेच हिंदी आणि इंग्रजी सुद्धा पुरेशी यायला हवी.
- संगणकाचे आणि इंटरनेटचे सुद्धा ज्ञान गरजेचे राहणार आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेकरिता लागणारी कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पदवीची मार्कशीट
- कामाचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट फोटो
- बँकेचा तपशील
- जन्माचा दाखला
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेकरिता असा करा अर्ज
Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra चा अर्ज हब ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम आवश्यक असतील ते कागदपत्रे गोळा करून घ्यावीत. नंतर शासनाने प्रसारित केलेल्या अधिकृत साइट mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/ वरती जायचे आहे.
योजनेचा अर्ज भरण्याची सुरुवात हि 15 एप्रिल पासून झाली आहे आणि शेवटची तारीख हि 5 मे राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर योजनेसाठी अर्ज करावा. मागण्यात आलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी आणि नंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. अर्जाची फी हि 500 रुपये असणार आहे. जे कि भरणे बंधनकारक राहणार आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची निवडप्रक्रिया
- फेलोशिप योजनेचा अर्ज आणि परीक्षा फी भरणे अनिवार्य राहणार आहे.
- नंतर तुमचा अर्ज जर व्यवस्थित सबमिट झाला असेल तर तुम्हाला परीक्षा देता येणार आहे.
- हि परीक्षा वस्तुनिष्ठ चाचणी असेल, ज्यामध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जी कि ऑनलाईन होणार आहे.
- नंतर पूना एक निबंध चाचणी सुद्धा द्यावी लागणार आहे.
- परीक्षा आणि निबंध झाल्यानंतर मुंबईला तुमचा इंटरव्हिव्ह घेतला जाईल. या सर्व पायऱ्या पास होऊन जे विध्यार्थी पात्र होतील त्यांनाच फेलोशिप कार्यक्रमाचा लाभ मिळणार आहे.
- विशेष म्हणजे सर्व महाराष्ट्रामधून फक्त 60 उमेदवारांनाच पात्र केले जाणार आहे.
फेलोशिप योजनेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम
योजनेकरिता पार होण्या करीत 100 मार्कची वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी एक तासाचा कालावधी सुद्धा देण्यात येणार आहे. या मध्ये खालील प्रमाणे सांगितलेले विषयावरती प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
- सामान्य ज्ञान 30 मार्कांसाठी
- तर्कशास्त्र 30 मार्कांसाठी
- इंग्रजी भाषा 30 मार्कांसाठी
- मराठी भाषा 10 मार्कांसाठी
- माहिती आणि तंत्रज्ञान 10 मार्कांसाठी
- ऍप्टिट्यूड टेस्ट 10 मार्कांसाठी
निष्कर्ष
राज्यातील तरुणांसाठी एक आशेचा किरण म्हणून या योजनेकडे बघितले जाते. राज्याचे मुख्यमंत्र्यांची योजनेची घोषणा केल्यानंतर लगेच अंमलबजावणी सुद्धा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra ची संपूर्ण महत्वपूर्ण माहिती बघितली आहे.
ज्याचा फायदा आपणाला नक्कीच होईल. जर तुम्ही सरकारी निकराची तयारी करत असाल आणि पात्रता निकषांमध्ये बसत असाल तर या कार्यक्रमाचा अर्ज नक्की भरा. तसेच अर्ज भरतांना जर काही अडचणी येत असतील तर कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.आम्हाला आशा आहे कि, सर्व माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल, धन्यवाद.
FAQs
Que: महाराष्ट्रात सीएम फेलोशिप प्रोग्राम काय आहे?
Ans- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उच्चशिक्षित तरूणांकरिता फेलोशिप कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली. त्यामार्फत पात्र अर्जदारांना एक वर्षाकरिता प्रशिक्षण आणि 61,500 रुपये दार माह मानधन सुद्धा दिले जाणार आहे.
Que: मुख्यमंत्री फेलोशिप योजनांची शेवटची तारिख?
Ans- राज्यसरकारने फेलोशिप योजनेचा जीआर जाहीर केला आहे, त्या नुसार अर्ज करण्यासाठी 15 एप्रिल 2025 पासून सुरुवात केली गेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 5 मे 2025 देण्यात आली आहे. या कालावधी मधेच अर्ज करू शकणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.