Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra 2025: रोजगार प्रत्येकाचा हक्क आहे, त्याच प्रकारे गरजूंना रोजगार देणे हे सुद्धा सरकारचे कर्तव्य आहे. ग्रामीण भागात ना कुठल्या कंपन्या नाही एमआयडीसी एरिया राहत. त्यामुळेच गावातल्या गावातच सरकारी काम आणि योजना मध्ये रोजगार दिला जातो.
आपण जर ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तेथील मजुराच्या आणि छोट्या शेतकऱ्यांच्या रोजगाराच्या समस्यांशी नक्कीच परिचित असाल. आज आपण या आर्टिकल मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देणारी Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.
Read Also: ग्राम पंचायत अपंग योजना: Gram Panchayat Apang Yojana 2025
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra In Marathi

महात्मा गांधी योजगार हमी योजना ला मनरेगा या नावाने सुद्धा पाडकले जाते. हि योजना 1977 पासून सुरु करण्यात आली आहे. देशातील आणि राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता नियोजन विभागाकडून हि योजना राबविलीओ जात असते. खास तर योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार देणे हा आहे.
ज्या नागरिकांनी जॉब कार्ड काढलं असेल त्यांना केंद्र सरकारमार्फत 100 दिवस रोजगार स्वतःच्या गाव मध्ये दिला जाणार आहे. तसेच बाकीचे दिवस रोजगार देण्याची जिम्मेदारी हि महाराष्ट्र सरकारची असणार आहे.
तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर आपण या गोष्टीचा नक्कीच अनुभव घेतला असेल. कारण शेतीचे काम संपल्या नंतर गावातील नागरिक हे बेरोजगारच होत असतात. त्यामुळेच त्यांना रोजगार देण्याकरिता सरकार या योजनेमार्फत काम देत असत. जर सरकारने तीस दिवसाच्या आत काम दिले नाही तर त्याच्या बेरोजगारी भत्ता सुद्धा सरकारलाच द्यावा लागतो.
जो कि, डायरेक्ट कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. योजनेअंतर्गत रोजगार न दिल्यास भत्ता देण्याची जबाबदारी हि सरकारची असणार आहे. योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरावयाचा असते.
Read Also: Bankam Kamgar Yojana। बांधकाम कामगार योजना। Online Apply 2025
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट
- खेड्या गावातील, ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब लोकांना रोजगार देणे.
- गावातील नागरिकांना शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचे सोर्स म्हणून निर्माण करणे.
- सामाजिक विकासासोबतच अर्थी विकासाला सुद्धा चालना देणे.
- ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाचे जीवनमान आणि राहणीमान सुधारणे
- गावातील तरुणांना गाव सोडून ना जात गावातच रोजगाराच्या नवीन संधी आणणे.
- कुटुंबाचे पालनपोषण करण्याकरिता रोजगाराची उपलब्धता करणे.
- Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra मार्फत ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांचा विकास करणे.
- मजुरांना तसेच त्यांच्या परिवारांना कुठल्याही आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ पडून नये त्याकरिता हि योजना राज्यातील प्रत्येक गाव गावात सरकार राबत असते.
रोजगार हमी योजनेचे वैशिष्ट्य
ग्रामीण भागातील जनतेच्या उद्धाराकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेला हा अतिशय उत्तम आणि यशस्वी प्रयत्न आहे.
मुख्य गोष्ट म्हणजे नागरिकांना शंभर दिवस काम हे केंद्र सरकार देते तर बाकीचे दिवस काम देण्याची जिम्मेदारी हि राज्यसरकारची असते. जो व्यक्ती काम मागेल त्याला Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra मार्फत रोजगार दिला जातो.
ज्याप्रमाणे मागेल त्याला विहीर योजना राबविली जाते त्याच प्रमाणे मागेल त्याला दिले जाते. जर तीस दिवसाच्या आत रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर तेवढ्या दिवसाचा बेरोजगारी भत्ता हा राज्यसरकार द्यावा लागत असतो.
Read Also: घरकुल योजनेच्या अनुदानात मोठी वाढ, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा, यादीत करा नाव चेक
रोजगार हमी योजने करता कशी मिळते मंजुरी
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra चा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे. ते काढण्याकरिता तुमच्या गावातील रोजगारसेवकाला आधरसोबत लिंक असलेले बँक खातेबुक ची झेरॉक्स देणे आवश्यक आहे.
मजुरांना मिळणाऱ्या विविध सुविधा
- सर्वात प्रथम म्हणजे मजूर ज्या गावातील असतील त्यांना त्याच गावांध्ये काम देणे किंवा पाच किलोमीटर च्या आत काम दिले जाते.
- कामाच्या जागेवर सर्व मजुरांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देणे.
- कामाच्या ठिकाणी कोणाला काही छोटी दुखापत झाली असता प्रथोमोपचार सेवा प्रदान करणे तसेच काही तत्कालीन सेवा देखील देणे.
- मजुरांना कामाच्या ठिकाणी विश्रांती घेता यावी आणि ऊन, पाऊस यापरूसून सरंक्षण मिळावे त्यासाठी एक शेड बनवून ठेवणे.
- कामावर जर पाच पेक्षा अधिक मजुरांचे मूळ असतील तर त्यांना वागवण्याकरिता एक दाईची व्यवस्था सुद्धा केली जाते
- जर किमवर्ती एखाद्या मंजुळाला किंवा मजूर पाल्याला काही दुखापत किंवा इजा झाली असेल तर त्याच्या दवाखान्याचा संपूर्ण खर्च हे राज्यसरकार देत असतो. तसेच त्याला कामाचा अर्धा पगार सुद्धा दिला जातो.
- काम करतांना मजुराला अपंगत्व आले किंवा जर का मृत्यू झाला तर त्या परिस्थिती मध्ये पन्नास हजार रुपयापर्यं मदत त्याच्या कुटुंबाला सरकार देत असते.
- जर कोणत्या मजुराला काम मागून आणि जॉब कार्ड असून सुद्धा रोजगार मिळाला नाही, तर दिवसाप्रमाणे 25% पगार भत्ता म्हणून सरकारला द्यावा लागतो.
- जरा कामाचे ठिकाण हे खूप जास्त दूर असेल तर प्रवासाचे भाडे अतिरिक्त द्यावे लागणार असते.
रोजगार हमी योजनेचे फायदे
- सरकार Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra अंतर्गत लागतात 100 दिवस काम देण्याची हमी ग्रामीण भागातील मजुरांना देते. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम लागते.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मजुरांना कोणत्याही मोठ्या प्रक्रिया कराव्या लागत नाही तसेच सरकारी काम असल्यामुळे कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही.
- योजनेचा लाभ घेऊन आणि रोजगार मिळवून ग्रामीण भागातील नागरिक सुखी आणि समाधानी जीवन जगतात.
- गावांमधील गरीब कुटुंबांचा आर्थिक विकास होतो आणि बेरोजगारांना रोजगार मिळतो.
- गावातील मजूर वर्ग हा आत्मनिर्भर बनेल.
- आर्थिक तंगी पासून गावातील मजूर दूर राहतील
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या काही अटी
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातच रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- पात्र अर्जदाराला पूर्णपणे लाभ मिळण्याकरिता सुरुवातीचे 14 दिवस रोजगार हमीच्या कामावर जावे लागेल.
- जर या कालावधीच्या आत मजुराने काम सोडून दिले तर मात्र त्याला त्याचा पगार दिला जाणार नाही.
- अर्ज करणारा व्यक्ती हा शारीरिक बाबतीने मजबूत आणि कणखर असावा.
- योजनेचा लाभ त्यांनाच दिला जाईल ज्यांच्याकडे जॉब कार्ड असेल.
- तसेच गावातील रोजगार सेवकाकडे नोंदणी केलेली असणे सुद्धा आवश्यक आहे.
रोजगार हमी योजनेकरिता लागणारी कागदपत्रे
1) | अर्जदाराचे आधार कार्ड |
2) | अर्जदाराचे रेशन कार्ड |
3) | रहिवासी दाखला |
4) | ग्रामसभेचा मान्यता ठराव |
5) | जॉब कार्डची झेरॉक्स |
6) | सुरु मोबाईल नंबर |
7) | मेल आयडी (असल्यास) |
8) | पासपोर्ट फोटो |
जॉब कार्ड काढण्याची पद्धती
जॉब कार्ड काढण्यासाठी आधी तर आपणाला तुमच्याच गावातील ग्रामपंचायतीला भेट दयावी लागेल. आणि तेथील सचिवांकडून योजनेचा अर्ज घेऊन विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी लगेन.
नंतर मागण्यात आलेले सर्व कागदपत्रे ववस्थीत अर्जांसॊबतच जोडून तो अर्ज परत ग्रामपंचायतीकडे द्यावी लागेल. नंतर आवश्यक ती प्रक्रिया ग्रामसचिव करेल आणि काही दिवसातच तुम्हाला तुमचे जॉब कार्ड दिले जाईल. तसेच काम सुद्धा मिळेल.
निष्कर्ष
राज्यासह देशातील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी आहे. त्यावर मत करण्यासाठी आणि बेरोजगार नागरिकांना, युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठीची महत्वपूर्ण योजना Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra विषयी संपूर्ण माहिती आज आपण या आर्टिकल मध्ये बघितली आहे.
माहिती अभाव गावातील मजूर हे बेरोजगारच राहतात त्यामुळे त्यांना अतिशय आर्थिक मंदीचा सामना हा करावा लागत असतो. परंतु जर हि माहिती प्रत्येक गाव गावात पोहोचली तर कोणीही ग्रामीण भागातील व्यक्ती बेरोजगार राहणार नाही. त्यामुळे हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा.
FAQs
-
Que: रोजगार हमी योजनेमार्फत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता किती मिळतो?
Ans– अधिकृत जीआर नुसार जर सरकार किंवा संबंधित ग्रामपंचायत काम देण्यास अक्षम असल्यास तेवढ्या दिवसाचा 25% प्रमाणे प्रति दिवस बेरोजगारी बट्टा द्यावा लागतो.
-
Que: रोजगार हमी योजना कधी सुरु झाली?
Ans– महाराष्ट्र मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना 1977 मध्ये सुरु करण्यात आली आणि तेव्हाच महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा कायदा सुद्धा संमत करण्यात आला.