Shravan Bal Yojana Form भरण्याकरिता लागणारे Documents आणि संपूर्ण Information In Marathi

महाराष्ट्र सरकार नवनवीन योजना काढण्यात किती अग्रेसर आहे, हे आपल्याला माहित असेलच. महिला साठी वेगळ्या वेगळ्या योजना राबवणे असो अथवा युवक साठी लाडका भाऊ योजना सारख्य योजना असो. महाराष्ट्र सरकार सर्व सरकार पेक्ष्या सध्यातरी आघाडीवरच आहे. यांमधीलच एक योजना Shravan Bal Yojana हे आहे.

Shravan Bal Yojana Form भरणाऱ्या व्यक्तीला सरकार प्रति माह 1,500/- रुपये उदर निर्वाहासाठी प्रदान करत असते. हि योजना मुख्यत्त्वे राज्यातील सर्व जेष्ठ नागरिकरिता सुरु करण्यात आली आहे.जे वृद्ध नागरिक निराधार आहे, ज्यांच्याकडे उत्पन्नाचा कुठलाही स्रोत राहिलेला नाही आहे. त्या नागरिकांना एक आर्थिक मदत म्हणून हि योजना संपूर्ण राज्यात सरकार राबवत आहे.

याचाच लाभ घेऊन सर्व वृद्ध नागरिक आपले बाकीचे जीवन आनंदाने व कोना समोरही हात न पसरता अपने बाकीचे राहिलेले जीवन जगात आहेत. आपण आज या आर्टिकल मध्ये Shravan Bal Yojana Form कसा भरायचा, त्यासाठी लागणारे Documents, योजनेसाठी कोण पात्र राहील या सर्व बाबतीतील Information In Marathi मध्ये पाहणार आहोत.

महत्वाचे बघा: Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi: मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी

Shravan Bal Yojana Form Information In Marathi 2025- श्रावण बाळ योजना फॉर्म ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये

Shravan Bal Yojana Form Information In Marathi 2025
Shravan Bal Yojana Form Information In Marathi 2025

श्रावण बाळ योजना हि सरकारने कोणत्या नागरिकांसाठी सुरु केलेली आहे आपणास कळलेच असेल. महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे वय 65 आहे किंवा त्यापेक्षाही अधिक आहे ते सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्यसरकार द्वारा सुरू केलेली हि योजना लाडकी बहीण योजना सारखीच कल्याणकारी योजना म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

ज्या योजनेद्वारे सरकार वृद्ध नागरिकांना आर्थिक मदतीद्वारे जीवन जगण्यास सहाय्य करत आहे. याच मिळणाऱ्या पैशातूनच जेष्ठ नागरिक आपल्या जीवनावश्यक गरज भागवत असतात. परंतु योजनेचा लाभ प्राप्त करण्याकरता Shravan Bal Yojana Form भरणे अतिशय महत्वाचे आहे.

योजनेचा अर्ज Online आणि Offline या दोनी प्रक्रीद्वाराने देखील सबमिट करत येणार आहे. सॊबतच सरकारने दिलेले सर्व निकष आणि Documents असले तरच श्रावण बाळ योजनेचं लाभ घेता येऊ शकणार आहे.

लाभार्थ्यांचे मनोगत

नीलकंठ राऊत: सरकारची श्रावण बाळ योजना हि माझ्यासाठी तरी एक प्रकारचे वरदानच बनली आहे. कारण माझ्याकडून आता कुठलेही काम होत नाही, त्यामुळे मी माझ्या परिवारावर एकप्रकारे ओझे झालेलो होतो. मात्र सरकारच्या योजनेचा अर्ज भरला आणि मला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. ज्यामुळे मी माझे उदर्निर्वाह चांगल्या पद्धतीने कु शकत आहो.

ज्योतीराम कांबळे: श्रवण बाळ योजनेच्या लाभ मुले मी स्वावलंबी बनलो आहे. मी माझा खरंच स्वतः उचलू शकतो आणि स्वतःचे आरोग्याची सुद्धा काळजी घेऊ शकत आहो. माझे वय जरी 65 वर्षापेक्षा जास्त आहे तरी आज मला कोणाला हि जीवन जगण्याकरिता भीक मागण्याची गरज नाही आहे.

श्रावण बाळ योजनेचे मुख्य उद्दिष्टे

  • राज्यातील 65 वर्षापेक्षा अधिक वय असणारे जेष्ठ नागरिक आर्थिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून न राहता स्वतंत्र राहावे हे या योजनेमागचा मुख्य हेतू आहे.
  • राज्यातील जेष्ठ नागरिकांचा आर्थिक विकास आणि सामाजिक प्रबळता निर्मण होणे हे उध्दिष्टये डोळयासमोर ठेऊन हि योजना सुरू करण्यात आली आहे.
  • राज्यातील सर्व वृष नागरिक सशक्त आणि आत्मनिर्भर जीवन जगावे .
  • राहणीमान तथा जीवनमान सुधारावे.
  • नागरिकांना त्यांच्या वृद्ध काळात कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. आणि ते स्वतः चा खर्च स्वतः उचलतील.
  • या योजनेमुळे वृद्ध स्वावलंबी जीवन जगण्यास प्रेरित होतील.
  • आत्मनिरभर भारत सोबतच राज्यातील नागरिक देखील आत्म निर्भर होईल.

श्रावण बाळ योजनेसाठी पात्रता निकष

श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील पात्रता निकषांमध्ये बसने आवश्यक आहे. त्यामुळे ते व्यवस्थित समजून घ्यावे.

महत्वाचे बघा: जननी सुरक्षा योजना माहिती मराठी 2025| Janani Suraksha Yojana In Marathi

  1. Shravan Bal Yojana Form भरणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
  2. तो व्यक्ती एक जेष्ठ नागरिक असावा म्हणजेच त्याचे वय 65 वर्ष किंवा या पेक्षा अधिक असावे.
  3. महाराष्ट्रा बाहेरील व्यक्तीला श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळणार नाही.
  4. जो नागरिक अर्जदार आहे त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 पेक्षा अधिक असू नये.
  5. कुटुंबातील एक सुद्धा व्यक्ती सरकारी नोकरी वर असला तर अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
  6. श्रावण बाळ योजना फॉर्म भरणारा व्यक्ती हा किमान पंधरा वर्षा पासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  7. लाभ घेण्याकरिता अपत्य बाबतची कुठलिहि अट देण्यात आलेली नाही.
  8. जे अर्जदार 65 वर्ष आतील असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ते पात्र देखील ठरणार नाहीत.
  9. अर्जदाराचे महाराष्ट्रातील कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

श्रावण बाळ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे- Shravan Bal Yojana Documents

1.-आधार कार्ड
2.-पॅन कार्ड
3.-मतदान कार्ड
4.-जेष्ठ नागरिक कार्ड
5.-जन्म प्रमाण पात्र
6.-रहिवाशी दाखला
7.-रेशन कार्ड
8.-उत्पन्नाचा दाखल
9.-पासपोर्ट फोटो
10.-मोबाईल नंबर

Shravan Bal Yojana Offline Apply

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या Shravan Bal Yojana Form हा Online आणि Offline या दोन्ही पद्धतीने देखील सबमिट करता येऊ शकतो. सर्वप्रथम Offline Form कसा भरावा या विषयी च माहिती बघुयात.

  • सर्वप्रथम पात्रता निकषानुसार Shravan Bal Yojana Form भरण्यासाठी लागणारे Documents गोळा करून घेणे.
  • नंतर अर्ज घेण्याकरिता जिलाधिकारी कार्यालय/ तहसील कार्यालय/ तलाठी कार्यालय अथवा सेतू मध्ये जावे.
  • तेथील अर्जाची प्रत घेतल्या नंतर संपूर्ण अर्ज व्यवस्तीत रित्या वाचून घ्यावा.
  • जे माहिती अराजमध्ये भरावयाची सांगितली ते पूर्णपणे भरावी.
  • नंतर अर्जाच्या मागे निकषानुसार मागितलेले कागदपत्रे ची झेरॉक्स जोडावीत.
  • त्या नांतर अर्ज आणि कागद पत्रे तहसील मध्ये जाऊन संबंधित कार्यालय अधिकारी कडे सोपवावी.
  • या सर्व प्रोसेसवर तुम्ही Shravan Bal Yojana Form भरून सबमिट करू शकता आणि जर पात्र झालात तर 1500/- प्रति माह लाभ देखील प्राप्त करू शकता.

Shravan Bal Yojana Online Apply

  • सर्वप्रथम Shravan Bal Yojana Form Online Apply करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रसारीत केलेल्या अधिकारीक संकेतस्थाळावर जावे लागेल.
  • नंतर त्या साईट चे होम पेज म्हणजेच मुख्य पृष्टय तुमच्या डोळ्यासमोर येईल.
  • तेथे एक न्यू रजिस्ट्रेशन चा पर्याय दिसेल, त्यावर क्लीक करा.
  • नंतर तुमच्या स्क्रीन वर दोन पर्याय ओपन होणार आहेत.
  • जर तुमि पर्याय नंबर एक निवडला तर तुमाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी मिळवावा लागेल आणि जर जिल्हा निवडाल तर तुमाला स्वतःचा आयडी आणि पासवर्ड बनवावा लागणार आहे.
  • दुसरा पर्याय मध्ये तुमाला एक Form दिसेल जे सामुर्ण मागितलेली माहिती तुमाला न चुकता भरायची आहे.
  • नंतर रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुमचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर योजनेचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्या करीत आपले सरकार या पोर्टल वर लॉग इन करावे लागणार आहे.
  • अर्ज भरण्यासाठी जे पागे ओपन होईल त्याच्या एक एक बाजूने मेनू सुद्धा दिसेल, त्यामध्ये तुमचा विभाग निवडावा लागणार आहे.
  • सामाजिक न्याय आणि विशेष सहायय विभाग दिसेल त्यावर क्लिक करावे.
  • त्यातील श्रावण बाळ योजना पर्याय निवडून लॉग इन करावा लागेल.
  • नंतर Shravan Bal Yojana Form तुमच्या समोर ओपन होईल. त्यामध्ये संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल आणि जे निर्देश दिले त्याप्रमाणे तुमचे Documents अपलोड करावे लागतील.
  • बँकेची माहिती भरावी लागणार, नांतर संपूर्ण माहिती आपण व्यवस्थित भरली आहे कि नाही याची खात्री करून घ्या. नंतर अर्ज सबमिट च्या बटनावर क्लिक करा.
  • अश्या पद्धतीने आपण श्रावण बाळ योजनेचा फॉर्म भरून योजनेचा लाभ घेऊ शकता.

ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता खालील बटनावर क्लिक करा

निष्कर्ष

राज्यातील जेष्ठ नागरिक सुद्धा स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतील अशी हि श्रावण बाळ योजना आहे. योजनेच्या लाभामुळे अनेक लाभार्थ्यांच्या आर्थिक अडचणी दूर होत आहेत. जर तुमच्या घरामध्ये कोणी जेष्ठ नागरिक असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर योजनेचा अर्ज भर आणि घरच्या वृद्धांना आत्मनिर्भर बनवा. अर्ज करत असताना काही अडचणी येत असतील तर आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा, धन्यवाद.

FAQs.

  1. Que- श्रावण बाळ योजना कोणासाठी आहे?

    Ans: श्रावण बाळ योजना हि महाराष्ट्र सरकारने राज्यातील जेष्ठ गरीब नागरिकांकरिता सुरु केली आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिया अर्जदाराचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्याच नागरिकांसाठी हि योजना आहे.

  2. Que- श्रावण बाळ योजना कागदपत्रे?

    Ans: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड, जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि पासपोर्ट फोटो एवढे कागदपत्रे श्रावण बाळ योजना फॉर्म भरण्याकरिता आवश्यक आहेत.

  3. Que- श्रावण बाळ योजना मार्फ़त पगार किती मिळते?

    Ans: सरकारच्या अधिकारीक माहितीनुसार योजनेसाठी पात्र असणाऱ्या अर्जदाराला प्रति माह 1500/- रुपये पगार मिळते.

Leave a Comment