Ladki Bahin Karj Yojana Maharashtra: आज आपल्या राज्यात लाखो लाडक्या बहिणींना महायुतीच्या सरकारने सावत्र बहीण केले आहे यावरती लाखो महिला नाराज असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते आहे.
यावरतीच मरहूम पट्टी करण्यासाठी आणि बहिणींचे मन परत एकदा जिंकण्यासाठी आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी सभे मध्ये 12 मे 2025 ला लाडक्या बहिणींना 30- 40 हजार रुपयांचे कर्ज लघु उद्योगासाठी उपलब्ध करून देण्याची मोठी घोषणा केली आहे.
ज्यामुळे राज्यातील पात्र लाडक्या बहिणींमध्ये आनंदाची लाट आलेली आहे.लाडक्या बहिणींना हे कर्ज स्वतःचा एक छोटा व्यापार किंवा उद्योग करण्यासाठी देण्यात येत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली. या वरून राज्य सरकारचे लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचे उद्देश्य स्पष्टपणे लक्षात येते.
या योजनेचा लाभ हा फक्त ज्या लाडक्या बहिणी आहेत अर्थात ज्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता प्रत्येक महिन्याला मिळतो, त्यांनाच या योजनेचा लाभ सरकार देऊ करणार आहे. बहिणींनो Ladki Bahin Karj Yojana चा तुम्ही लाभ कसा घेऊ शकाल, याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये बघूया.
Read Also: लाडक्या बहिणींना Mofat Pith Girni Yojana मार्फत मिळणार पिठाची गिरणी, असा करा अर्ज
Ladki Bahin Karj Yojana In Marathi: लाडकी बहीण कर्ज योजना म्हणजे काय?
लाडक्या बहिणींना कर्ज देऊन आत्मनिर्भरण बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे. ज्याचा लाभ हा राज्यातील लाडक्य बहिणीलाच मिळतो. ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना या योजनेअंतर्गत कर्ज सुद्धा दिले जाणार नाही.
वित्त मंत्र्यांनी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार पात्र महिलांना 30-40 हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सहकारी बँक मार्फत या कर्जाचे वातारण केले जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. या योजनेचे विशेषतः हि आहे कि कर्ज काढल्यानंतर लाडक्या बहिणीला एकही रुपया स्वतः भरण्याची आवश्यकता नसेल.
कारण दर माह लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये सरकार टाकत असते. त्या हप्त्यामधूनच या कर्जाचे पैसे घेतले जाणार आहेत. या कर्जाला एक ओझे न समजता स्वतःचा विकास करण्यासाठीची संधी हि महिलांनी समजावी असे देखील स्पष्ट करण्यात आले.
महिलांचा विकास करण्यासाठी सरकारने घेलेले एक साहसी पाऊल लाडकी बहीण कर्ज योजना असणार आहे. याचा लाभ घेऊन लाडक्या बहिणी स्वतःचा एक छोटा लघु उद्योग उभारू शकतात. तसेच स्वतःच्या परिवाराची , मुला बाळांची सर्व जबाबदारी उचलण्यास सक्षम बनू शकणार आहेत.
Read Also: Lakhpati Didi Yojana In Marathi। महिलांना मिळणार 5 लाख रुपये, लखपती दीदी योजनासाठी असा करा अर्ज
लाडकी बहीण कर्ज योजनाचा उद्देश
- राज्यातील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्याचा उद्देष सरकारने समोर ठेवला आहे.
- बेरोजगार महिलांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून देणे.
- उद्योग निर्मिती साठी आर्थिक मदत महिलांना देणे.
- महिलांना लघु उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे आणि लाडक्या बहिणींचा आर्थिक विकास होण्यास मदत करणे.
लाडकी बहीण कर्ज योजनेचे फायदे
- राज्यातील लाडक्या बहिणींना उद्योग सुरु करण्यासाठी कर्जासाठी कुठलीही संपत्ती गहाण/ तारण ठेवण्याची आवश्यकता पडणार नाही.
- जिल्ह्यातील सहकारी बँकांमधून सहज कर्ज उपलब्ध होईल.
- लवकर कर्ज मिळणार आहे त्यामुळे सर्व आर्थिक अडचणींना मात करता येईल.
- Ladki Bahin Karj Yojana चा लाभ घेतल्यानंतर महिलांना दुसऱ्याच्या भरोशावर जीवन जगण्याचे काम पडणार नाही. महिला स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकतील.
- उद्योग क्षेत्रामध्ये करियर बनवण्याचे स्वप्न बघणाऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेमुळे सुरुवात करत येईल.
- स्वतःचे आणि कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी छोटा उद्योग देखील महिला उभारू शकतील.
- येणाऱ्या युवा लाडक्या बहिणींना उद्योग करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
लाडकी बहीण कर्ज योजनेच्या लाभाचे स्वरूप
अधिकृत घोषणेच्या प्रमाणे लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या ज्या महिलांना दिला जात आहे, त्यांनाच लाडकी बाही कर्ज योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचा माहिती मिळते. अर्थात ज्या हि महिला मे महिन्याच्या हप्त्यापासून अपात्र करण्यात येतील त्यांना या योजने अंतर्गत 40 हजाराचे कर्ज मिळणार नाही.
तसेच लाभार्थी महिलांना कमीत कमी 30 हजार तर जास्तीत जास्त 40 हजर रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकेल. मिळालेल्या रकमेचा उपयोग महिला हव्या त्या पद्धतीने करू शकतील. या कर्जाची परतफेड करण्यासाठी लाभार्थी बहिणीला कुठलीही काळजी करण्याचे काम नसणार . कारण सरकार या कार्चची परतफेड लाडकी बहीण योजनेच्या येणारी हप्त्यामधूनच करून घेतील.
हे कर्ज पूर्णतः फिटे पर्यंत लाडकी बहिणीला खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. जेव्हा व्हा पूर्ण कर्ज निल होईल तेव्हा परत लाडकी बहिणीला दर माह येणारा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. अशा पद्धतीचे Ladki Bahin Karj Yojana च्या लाभाचे स्वरूप असणार आहे.
योजनेचे पात्रता निकष
राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र असतील किंवा लाभ घेत असतील त्या सर्वच Ladki Bahin Karj Yojana साठी पात्र असणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे जास्त काही पात्रात निकष लादण्यात आलेले नाहीत. लाडकी बहीण योजनेचे पात्रात निकष हेच या योजनेचे सुद्धा पात्रता निकष असतील.
लागणारी कागदपत्रे
अनु. क्र | कागदपत्रे |
---|---|
1) | लाडक्या बहिणीचे आधार कार्ड |
2) | रहिवासी पुरावा |
3) | बँकेचे खातेबुक |
4) | पासपोर्ट फोटो |
Ladki Bahin Karj Yojana Apply Online
लाडकी बहीण कर्ज योजनेचे अर्ज हे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने भरत येणे शक्य होणार आहे. या योजनेची फक्त घोषणा करण्यात आलेली आहे. योजनेचे अर्ज पुढील महिन्यामध सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तुम्हाला सुद्धा योजनेचा लाभ घेऊन कर्ज हवे असेल आणि स्वतःचा उद्योग उभारायचा असेल, तर आम्हाला इन्स्टा ला फोल्लो करा. आम्ही आमच्या इन्स्टा ला सर्व येणाऱ्या नवीन योजनांची उपडेट देत असतो.
निष्कर्ष
कशा पद्धतीने Ladki Bahin Karj Yojana सरकार राज्यात राबवणार आहे, त्याचा लाभ कसा दिला जाईल, कोण पात्र असेल आणि कोणाला लाभ मिळेल. याविषयी ची संपूर्ण माहिती माही या आर्टिकल मध्ये दिली आहे. मात्र अजून सुद्धा योजनेचे अर्ज सुरु न झाल्याने अर्ज प्रक्रिया तुम्हाला सांगण्यास आम्ही असमर्थ आहोत. धन्यवाद .
FAQs
-
Que: लाडकी बहीण कर्ज योजना मार्फत किती कर्ज मिळते?
Ans- अजित पवारांनी केलेल्या घोषणेनुसार लाडकी बाही कर्ज योजना मार्फत सरकार लाडक्या बहिणींना 30-40 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.
-
Que: कर्ज योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
Ans- लाडकी बहीण कर्ज योजना हि फक्त पात्र लाडक्या बहिणींकरीता राबविणेत येत असल्याची माहित अजित पवार यांच्या कडून देण्यात आलेली आहे.