Jaltara Yojana Maharashtra 2025: राज्यातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेता येण्याकरता खास महाराष्ट्र सरकार जलतारा योजाना प्रत्येक जिल्ह्यात राबवित असते. आता ते कसे? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच आला असेल. तर शेतकरी बांधवांनो या योजने अंतर्गत तुमच्या शेतातील विहीर, बोअरवेल चे पाणी वाढवण्यासाठी सरकार या योजनेमार्फत तुम्हाला मदत करणार आहे.
या सोबतच 4,800 रुपये अनुदान सुद्धा देण्यात येईल. मागच्या वर्षी हि रक्कम 4,600 रुपये एवढी देण्यात येत होती. यावर्षी 2025 मध्ये मात्र ह्याला वाढवण्यात आले आहे. हि योजना राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी लाभदायकच ठरणार आहे.
कारण तुमच्या शेताची भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि शेतीला पुरेल असे मुबलक पाणी करून शेतकऱ्याचे जीवन सुद्धा पाणीमय करण्यास मदत होणार आहे. Jaltara Yojana Maharashtra क्षयबद्धतीने राबवली जाते, आणि आपण कश्याप्रकारे याचा लाभ घेऊ शकू, याची माहिती खालील प्रमाणे बघा.
Read Also: शेतकऱ्यांसाठी विविध शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र 2025| Shetkari Sarakari Yojana In Marathi
Jaltara Yojana Maharashtra In Marathi: जलतारा योजना मराठी माहिती
शेती करत असतांना कुठल्याही शेतकऱ्यांना सर्वात महत्वाची गोस्ट म्हणजे सिंचनाची व्यवस्था असते. कारण पाणी असेल तर शेतकरी स्वतःचे उत्पन्न वाढवण्यास समर्थ होऊन जातो. सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी मागेल त्याला विहिर योजना सारख्या योजना राबवित असते.
त्यामुळे प्रत्येक शेतीमध्ये एक विहीर निर्माण झाल्यासारखेच झालेले आहे. अतिप्रमाणात विहिरीचे निर्माण झाल्या कारणांमुळे जमिनीमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत जातांनाचे चित्र आपण पाहतच आहोत. याच्यावरतीच उपाय म्हणून सरकारने Jaltara Yojana Maharashtra हा उपक्रम राबवण्यास हाती घेतला आहे.
ज्याचा फायदा असा कि भूजल पातळी वाढेल आणि शेतकऱ्यांच्या विहिरीला अधिक पाणी लागेल. शेतकरी मित्रांनॊ हि योजना प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेणे हि काळाची गरज बनलेली आहे. कारण आपल्याच महाराष्ट्राच्या काही भागामध्ये एक कळशी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा कोस भर दूर आजही जावे लागते.
Jaltara Yojana Maharashtra च्या माध्यमातून तुम्हला तुमच्या शेतामध्ये विहिरीच्या जवळ 1.5 मीटर बाये 1.5 मीटरचाच जलतारा खड्डा खोदावा लागणार आहे. जे तुम्ही आरामात एक दिवसात करू शकता. नंतर त्यामध्ये मोठे मोठे दगड भरून ते बुजवायचा आहे. जेणेकरून पावसाळ्यामध्ये येणारे पाणी हे त्याच्या मार्फत जमिनीच्या आत पर्यंत जाईल. याच्या मोबदल्यात सरकार तुम्हाला 4600 रुपयाचे अनुदान सुद्धा देऊ करणार आहे.
Read Also: Kanda Chal Anudan Yojana 2025| कांदाचाळ अनुदान योजनासाठी अर्ज झालेत सुरु, बघा संपूर्ण माहिती
जलतारा योजनेचा उद्देश
- भूजल पातळी वाढवून पाण्याचा दुष्काळ कमी करणे.
- शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याची उपल्बधता सुनिश्चित करून देणे.
- शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत करणे.
- रोजगार हमीचे जॉब कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यास रोजगार उपलब्ध करून देणे.
- पावसाळ्यातील पाण्याचे योग्य दिशेने वाटचाल करणे आणि पाण्याचा बचाव करून जमिनीत खोलपर्यंत पाणी जिरवणे.
जलतारा योजनेचे फायदे
👉 जमीनीतील जल पातळीत वाढ: जलतारा योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या शेषखड्यांमुळे पाणी जमिनीत खोलपर्यंत जाते आणि त्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ होते.
👉 सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था: शेतातील भूजल पाळीत होणाऱ्या वाढीमुळे शेतातील विहिरीच्या पाण्यात सुद्धा वाढ होते. त्याचा फायदा असा कि शेतकऱ्यांना सिंचन करतांना पाण्याचा तुटवडा होणार नाहि.
👉 जास्त उत्पादन: शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतातील पिकांना सुद्धा हवे तेवढे पाणी देणे शक्य होते. त्यामुळे पीक चांगले येऊन उत्पादन सुद्धा वाढण्यास मदत होते. विशेषतः खराप आणि रब्बी पिकांना मुबलक पाणी मिळते.
👉 पर्यावरणाचे रक्षण: शेतातील पाणी जात असेल तर त्या पाण्यासोबत शेतातील सुपीक असलेली माती सुद्धा वाहून जात असते. परंतु तेच जल जर आपण आपल्याच शेतात चिरवले तर मातीची सुपीकता अधिक वाढण्यास मदत होईल. तसेच पर्यावरणाची हानी सुद्धा होणे टळेल.
👉 रोजगाराची संधी: जे शेतकरी अल्पभादरक आहे,त्यांना शेतीव्यतिरिक्त रोजगार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, अशा शेतकऱ्यांना रोजगार हमी योजना अंतर्गत रोजगार निर्मिती सुद्धा होते. म्हणजेच स्वतःच्या शेतातील भूजल पातळी तर वाढेलच सोबतच रोजगार सुद्धा दिला जातो.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
अनु. क्र | जलतारा योजनेसाठी लागणारे कागदपत्र |
---|---|
1) | शेतकऱ्याच्या शेतीचा 7/12 उतारा |
2) | 8- अ |
3) | अर्जदाराचे आधार कार्ड |
4) | मनरेगाची जॉब कार्ड |
जलतारा योजनेची अर्जपद्धती
जलतारा योजना साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो. हि योजना रोजगार हमी आणि कृषी विभागामार्फत राबविली जाते. जर तुम्हाला खर्च सरकारच्या या उपक्रमात सहभागी होऊन अधिक उत्पन्न वाढवायचे असेल, तसेच भूजल संवर्धन कार्याचे असेल तर तुमच्या गावातील कृषी सहायक किंवा रोजगार सेवकासोबत संपर्क साधा. त्यांच्या कडेच Jaltara Yojana 2025 चा अर्ज भरावा लागेल.
निष्कर्ष
जलतारा योजना हि जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी एक रामबाण उपाय बनली आहे. या योजनेमध्ये जर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला तर राज्यातील पाण्याचा दुष्काळ कमी होण्यास नक्कीच मदत होईल. आम्ही सांगितलेली जलतारा योजनेची संपूर्ण माहिती नक्की आपणाला आवडली असेल, हीच अपेक्षा. अशाच माहिती साठी आमच्यासोबत सोशियल मीडियाला फोल्लो करा, धन्यवाद.
FAQs
-
Que: जलतारा प्रकल्प काय आहे?
Ans- शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न काढण्यासाठी जलतारा योजनेपासून उपयोग होतो. योजनेअंतरंगात निर्माण करण्यात येणाऱ्या शोषखड्याने जमिनीतील भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता सोयीचे होते. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाकरिता अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प आहे.
-
Que: जलतारा म्हणजे काय?
Ans- जलतारा हि एक योजना आहे. जी कृषी विभाग आणि रोजगार हमी अंतरंगात राबविण्यात येते. या योजनेमुळे पर्यावरण स्थिर राहण्यास मदत होते. तसेच जल जमिनीमध्ये जिरवले जाते, ज्यामुळे पाण्याचा तुटवडा कमी होण्यास सुद्धा मदत होते.
-
Que: जलतारा योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
Ans- ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर आहे सोबतच जर त्याच्या कडे जॉब कार्ड आहे असेच शेतकरी जलतारा योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचे सरकारी अनुदान मिळवू शकते. तसेच शेतातील विहिरींची जल पातळी सुद्धा वाढवू शकते.