Electric Vehicle Subsidy Yojana: वाढत्या महागाईच्या काळात अन्नापासून ते सर्वच महाग झाले आहे. अशा वेळेला देशातील सामान्य नागरिक हा महागाई सोबत जणू मोठी झुंजच खेळतो आहे. अशा वेळेला कार्याचे तरी काय? हेच सुचत नाही. मार्केट मध्ये बाजार आणला गली घेऊन जातो बोलले तर बाजाराच्या किमतीचं पेट्रोलच आता वाहनांमध्ये लागत.
अश्या या महागाईला अक्षरशः देशोबातच महाराष्ट्रातील जनता सुद्धा कंटाळलेली आहे. हि बाब लक्षात आल्यावर सरकारने Electric Vehicle Subsidy Yojana राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत इलेकट्रीक वाहनावर जास्तीत जास्त 40% पर्यंतचे अनुदान हे सरकार आहे देणार आहे. कुठलीही गोस्ट हि महाग तेव्हाच होते जेव्हा त्या गोष्टीचा तुटवडा होत असेल आणि मागणी वाढती असेल.
देशभर वाहनांची संख्या हि वाढतच राहणारी आहे, मात्र पेट्रोल चा पुरवठा हा कमी पडतो आहे. म्हणून देशातील जास्तीत जास्त नागरिक हे इलेकट्रीक वाहन खरेदी करतील या अनुषंगाने हि योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक नागरिकांना इलेकट्रीक वाहन घेण्यास प्रोत्साहित केलं जातंय. इलेकट्रीक वाहनाचे अनेक चांगले चांगले फायदे आहेत . त्यापैकी सर्वात मोठा फायदा होईल म्हणजे कमी पैशात जास्त प्रवास.
Electric Vehicle Subsidy Yojana 2025 Maharashtra: इलेकट्रीक वाहन अनुदान योजना काय आहे?
याच वर्षी Electric Vehicle Subsidy योजनेला हिरवा कंदील महाराष्ट्र शासनाने दाखवला आहे. मी महिन्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इलेकट्रीक वाहन धोरण 2025 मध्ये नवीन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदूषणावर कंट्रोल ठेवण्यासाठी वाहनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे सरकारला वाटते. त्यामुळे हे एक मोठे धाडसी पाऊल सरकारने उचलल्याची माहिती मिळते आहे.
इलेकट्रीक वाहन पर्यावरणाचे संतुलन टिकवण्यासाठी अतिशय फायदेमंत ठरू शकते. तसेच महागले पेट्रोल सुद्धा नागरिकांना परवडत नसल्याने हे एक अतिशय चांगलं पर्याय ठरू शकते. त्यामुळेच सरकारी तिजोरीवर ताण येत असला तरी सुद्धा Electric Vehicle Subsidy Yojana मार्फत इलेकट्रीक वाहन खरेदीदारांना अनुदान योजनेमार्फत लाभ देण्याचे धोरण यावर्षी पास करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत इलेकट्रीक टू व्हीलर पासून ते इलेकट्रीक बसेस आणि मोठे इलेकट्रीक माल वाहू वाहनांवर सुद्धा अनुदान दिले जाणार आहे. सरकारने 23 मे 2025 रोजी घेतलेल्या शासननिर्णयानुसार वाहनांप्रमाणे किमान अनुदान 10,000 रुपये ते कमाल अनुदान हे 20,00,000 रुपयांपर्यंत दिले जाणार. हि योजना मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अतिशय लाभदायक ठरणारी आहे.
Read Also: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर Pink E Rickshaw Yojana Maharashtra मार्फत मिळणार इलेकट्रीक रिक्षा.
Electric Vehicle Subsidy Chart
इलेकट्रीक वाहने | अनुदानाची रक्कम | वाहनांची अनुदान वाटप संख्या |
---|---|---|
1) दुचाकी 🛵 | 10 हजार रुपये प्रति वाहन | 1 लाख वाहन |
2) रिक्षा 🛺 | 30 हजार प्रति वाहन | 15 हजार वाहन |
3) तीनचाकी मालवाहक 🛻 | 30 हजार प्रति वाहन | 10 हजार वाहन |
4) चारचाकी 🚗 | 1.5 लाख प्रति वाहन | 10 हजार वाहन |
5) परिवहन चारचाकी 🚐 | 2 लाख प्रति वाहन | 25 हजार वाहन |
6) हलके मालवाहू वाहन 🚚 | 1 लाख प्रति वाहन | 10 हजार वाहन |
7) बसेस 🚌 | 20 लाख प्रति वाहन | दीड हजार वाहन |
8) मोठे मालवाहक वाहन 🚛 | 20 लाख प्रति वाहन | 1 हजार वाहन |
9) ट्रॅक्टर/ हार्वेस्टर 🚜 | 1.5 लाख प्रति वाहन | – |
सरकारी धोरणाचे उद्देश
राज्यातील वाढते प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंग ला नियंत्रित अन्यन्यसाठी हे धोरण आणले गेले आहे. ज्याचा फायदा पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासोबतच मानवाचे आरोग्यास सुद्धा होणार आहे. Electric Vehicle Subsidy Yojana धोरण मांडण्याचे काय उद्देश आहे ते पुढीलप्रमाणे.
Read Also: Annasaheb Patil Karj Yojana। अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, असा करा ऑनलाइन अर्ज.
- इलेकट्रीक वाहन उत्पादन क्षमता मजबूत करणे.
- इलेकट्रीक क्षेत्राच्या माध्यमातून सुद्धा अर्थव्यवस्थेला चालना देणे.
- इलेकट्रीक वाहनांमुळे पर्यावरणासोबत मानवाचे आरोग्य चांगले ठेवणे.
- जास्तीत जास्त प्रमाणात इलेकट्रीक वाहन खरेदी करण्यासाठी अनुदान देऊन नागरिकांना प्रोतसाहित करणे.
- सार्वजनिक वाहातून म्हणजे परिवणास इलेकट्रीक वाहनाच्या माध्यमातून आरामदायक बनवणे.
- सार्वजनिक वाहतुकीच्या विद्युतीकरणास चालना देणे.
- इलेकट्रीक वाहनासोबतच वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देणे.
- इलेकट्रीक वाहनाच्या अधिक अत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे.
- 2030 पर्यंत राज्यातील वाहतुकीला पर्यावरनाशी अनुकूल बनवण्याचे उद्देश महाराष्ट्र शासनाचे आहे, हे या धोरणातून स्पष्ट होते.
इलेकट्रीक वाहन अनुदान योजनेचे फायदा
📢 पहिलाआणि सर्वात मोठा फायदा म्हणजे सरकार दोन चाकी इलेकट्रीक स्कूटी पासून ते मोठी मालवाहक गाडी पर्यंत ऐकून किंमतीच्या 10% ते 40% पर्यंत अनुदान देणार आहे.
📢 Electric Vehicle Subsidy Yojana मार्फत पात्र ग्राहक लाभार्थ्याला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
📢 गाडी चालवण्यासाठी महागड्या पेट्रोलची गरज पडणार नाही. कमी पैश्या मध्ये गली चार्ज करून जास्त प्रवास करता येणे शक्य होईल.
📢 इलेकट्रीक वाहनाने कुठलंही प्रदूषण होणार नाही त्यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि ताजे ऑक्सिजन मिळेल.
पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी इलेकट्रीक वाहनांमुळे होणार नाही.
📢 कमी प्रदूषण आणि स्वच्छ ऑक्सिजनमुळे नागरिकांना आरोग्यास लाभ होईल.
📢 स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पात्र नागरिक अनुदान मिळवून कमी पैशात वाहन करू शकतील आंबी स्वयंरोजगार निर्माण होतील.
📢 नवीन उद्योगांना चालना मिळेल आणि नवीन रोजगाराच्या संधीसुद्धा वाढतील.
📢 जर परिवहन वाहन खरेदी केले तर रोडचे टॅक्स सुद्धा त्यांना माफ असणार आहेत.
Electric Vehicle Subsidy Apply Online Maharashtra
सध्या Electric Vehicle वरती अनुदान योजनेचे धोरणच मांडण्यात आले आहे. अजून तरी या योजनेचे अर्ज सुरु करण्यात आलेले नाही. लवकरच योजनेचे पोर्टल सरकार सुरु करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. योजनेचे अर्ज हे ऑनलाईन भरावे लागतील त्यानंतरच पात्र अर्जदारांना अनुदान डायरेक्ट खात्यामध्ये टाकण्यात येईल. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांनासुद्धा ट्रॅक्टर खरेदीसाठी होणार आहे.
Electric Vehicle Subsidy GR
सरकारी धोरणाचा अधिकृत जीआर | Click Here |
निष्कर्ष
अतिशय नवीन आणि कल्याणकारी अशी हि योजना असणार आहे. ज्याचा फायदा हा राज्यातील नागरिकांना नक्कीच होईल. जर तुम्हालासुद्धा इलेकट्रीक वाहनावर अनुदान हवे असेल तर अर्ज सुरु होताच अनुदानाकरिता अर्ज करा. जेणेकरून वाहन अनुदान वाटपाच्या यादी मध्ये तुमचे नाव येईल. काही अडचण येत असेल किंवा अधिक माहिती हमी असेल तर आम्हाला इन्स्टा ला फोल्लो करा. नवीन योजनांची वेळोवेळी सर्व अपडेट तुम्हाला तिथेच दिली जाईल, धन्यवाद.