Shabari Awas Yojana 2025: आदिवासी बांधवांना मिळणार 2 लाखाचे घरकुल, अर्ज करण्यासाठी लागणार हि कागदपत्र.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shabari Awas Yojana 2025: आदिवासी समुदायाला स्वतःच्या मालकीचे पक्के घर देऊन त्यांना आपल्या विकसनशील समाजच्या मुख्य प्रवामध्ये सामील करून घेण्याचं सरकारचा प्रयत्न आहे. कारण त्यांना जंगलामध्ये वावरत असतांना अन्नासाठी सुद्धा वन वन भटकावे लागत असायचे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये त्यांचा जीवन जगण्यासाठीचा संघर्ष कधीही संपत नव्हता. परंतु आता Shabari Awas Yojana सारख्या योजना राबवून सरकार त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेत आहे.

Read Also: जिल्हा परिषदेची अपंगांसाठी घरकुल योजना, १ लाख २० हजार मिळणार अनुदान। Apanga sathi Gharkul Yojana

Shabari Awas Yojana 2025 Maharashtra: शबरी घरकुल योजना मराठी

आदिवासी बांधव हे सुद्धा आपल्या देशाचा राज्याचा एक अविभाज्य घटक आहेत. परंतु अनेक वर्षांपासून त्यांच्या पर्यंत सरकारी योजना आणि सुविधा ह्या पोहोचतच नसल्यामुळे, त्यांचा विकास जणू खंडावला गेला आहे. शबरी घरकुल योजना हि आदिवासी कुटुंबांसाठी एक आशेचे किरण आहे. हि योजना महाराष्ट्र सशासनाकडून अनुसूचित जमाती असलेल्या जिल्ह्यांमध्ये राबविली जात असते. योजनेमार्फत गरीब कुटुंबांना 269 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या जागेमध्ये स्वतःचे मालकीचे पक्के घर बांधून दिले जाणार आहेत.

योजनेचे उद्देश

आपल्या देशात लोकशाही शासनप्रणाली आहे, त्याप्रमाणे सर्वांना समानतेचा अधिकार आहे. अनुसूचित जमातीतील नागरिकांचा सामाजिक दर्जा उंचावावा, त्यांचा सर्वांगीण आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी सरकार दरवर्षी हि योजना राबवित असते.

Read Also: पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र 2025: Pantpradhan Aawas Yojana Gramin Maharashtra

लाभाचे स्वरूप

शबरी घरकुल योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्याला 2 लाखांपर्यंतचे अर्थी अनुदान वेगवेळ्या क्षेत्रानुसार दिले जाते. ग्रामीण भागातील रहिवासी लाभार्थ्यांना 1 लक्ष 32 हजार रुपयाचे अनुदान देण्यात येत. जर अर्जदार नगरपालिका मधील रहिवासी असेल, तर 1 लक्ष 50 हजारांचे अनुदान आणि महापालिका मधील लाभार्थ्यांना 2 लाख रुपयांचे आर्थिक अनुदान मिळणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या स्वच भारत मिशन अंतर्गत आवास योजनेतील लाभार्थ्यांना सौचालाय बांधण्यासाठी 12 हजाराचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे.

योजनेचे वैशिष्ट

शबरी घरकुल योजना हि महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत राज्यातील आदिवासी जमातीकरिता राबविली जाते. पात्र अर्जदारांना पक्के आणि मजबूत घर सरकार बनवून देणार आहे. योजनेमुळे आदिवासी प्रवर्गातील नागरिकांच्या उन्नतीची दिशा ठरवेल.

योजनेचे पात्रता निकष

अर्जदार हा अनुसूचित जमातीतील असेल आणि महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी असेल तरच त्याला आवास योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्जदार हा झोपडीमध्ये किंवा कच्च्या घराचा रहिवासी असायला हवा. तसेच अर्जदार हा किमान पंधरा वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची घर बांधण्यासाठी जमीन असावी किंवा शासनाने दिलेली जमीन असावी. ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न कमी असेल त्यांनाच लाभ दिला जाईल.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. रहिवासी दाखला
  2. सातबारा उतारा
  3. नमुना आठ-अ
  4. जातीचा दाखला
  5. शाळा सोडल्याचा दाखला
  6. उत्पन्नाचा दाखला
  7. जागा असल्याचा पुरावा
  8. ग्रामसभेचे शिफारस पत्र

असा करा योजनेचा अर्ज

शबरी आवास योजनेचा अर्ज हा तुमच्या क्षेत्रातील ग्रामसभा कार्यालयामध्ये किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये करता येणार आहे. तेथे तुम्हाला अर्जासोबत सांगण्यात आलेले सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करायचा आहे.

निष्कर्ष

पात्र अर्जदारांना एक चांगले पक्के आणि स्वच्छ स्वतःचे घर बनवून देण्याचा सरकारचा संकल्प आहे. जर तुम्ही अनुसूचित जमातीमधील आहेत तर हि योजना खास तुमच्यासाठी आहे. तुमचे कंसाचे घर असेल तर लवकरात लवकर अर्ज करून स्वतःचे पक्के घर बनवून घ्या, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

2 thoughts on “Shabari Awas Yojana 2025: आदिवासी बांधवांना मिळणार 2 लाखाचे घरकुल, अर्ज करण्यासाठी लागणार हि कागदपत्र.”

Leave a Comment