ग्राम पंचायत अपंग योजना: Gram Panchayat Apang Yojana 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gram Panchayat Apang Yojana: राज्यातील प्रत्येक नागरिकांकरिता कुठली ना कुठली योजना निर्माण केलेली आहे. ज्यांना जीवन जगण्याकरिता अत्यंत योजनांची गरज असते ते म्हणजे दिव्यांग बांधव आहेत. म्हणून सरकारने ग्राम पंचायत अपंग योजना मार्फत अपंग बांधवांना जीवन जगण्यास सहाय्य्य करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.

Gram Panchayat Apang Yojana च्या माध्यमातून प्रत्येक गावात अपंग बांधव लाभ घेऊन या स्वावलंबी जीवन जगू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्था च्या स्वयंउत्पन्नातील काही टक्का निधी हा अपंग योजना करीत राखीव ठेवण्यात येत असतो. तर चला मंग ग्राम पंचायत अपंग योजना काय आहे, योजनेच्या अटी आणि योजनेचा लाभ कसा घ्यायांचा या विषयी संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये बघुयात.

Read Also: श्रावण बाळ योजना

Gram Panchayat Apang Yojana Maharastra-ग्राम पंचायत अपंग योजना माहिती

2001 च्या शासनाच्या अपंग कल्याण कृती आराखड्यातमधील क्रमांक नऊ च्या सूचनेनुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इनकम मधील 3% निधी हा हद्दीतील विविध गावातील दिव्यांग व अपंग व्यक्तीनांना ग्राम पंचायत अपंग योजना मार्फ़त कल्याण आणि पुनर्वसन करीता खर्च करण्यात यावा. या निधी बाबत मंत्रालयाच्या ग्रामविकास विभागाने देखील 1 ते 5 आणि 6 च्या आदेशानुसार शासन निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सारख्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत अपंग बांधवांना ग्राम पंचायत अपंग योजना सारख्या योजना साठी स्वयं उत्पन्नातील 3% निधी राखून ठेऊन उपयोग करण्यात येत असतो. या निधी मधून ग्रामपंचायत मधील असहाय्य आणि दिव्यांग व्यक्तींना जीवन जगण्यात सोपे जाणाऱ्या आवश्यक वस्तू चे वाटप केले जाते. तथा काही निधी त्याच्या बँक खात्यात देखील टाकल्या जातो. काही खेड्यामध्ये हि योजना न राबवता अन्य काम करीत वापरला जातो, जे चुकीचे आहे. आपणाला जर योजनेचा लाभ ग्याचा असेल तर संबंधित ग्रामपंचायती मधून अधिक माहिती मिळवावी.

Read Also: लाडकी बहीण योजना

ग्रामपंचायत अपंग योजना निधी वाटपाच्या काही अटी

सरकारच्या ग्रामपंचायत अपंग योजना च्या लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याकरिता 2015 च्या शासनाने काढलेल्या जी आर मध्ये काही अटी प्रसारित करण्यात आल्या आहेत. ते खालील प्रमाणे विस्तारपूर्वक बघूया.

  • शासनाने निर्णय घेतलेल्या आखलेल्या नमुन्यातील अर्ज ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी निवड केलेल्या दिव्यांग लाभार्थी कडून भरून घेण्यात यावे.
  • सरकारचा निर्णय सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्ज मिळाल्या नंतर अर्जातील दिलेल्या वस्तू आणि साहित्यांची वस्तू ची किंमत ठरवलेल्या पद्धतीने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरवावी.
  • संबंधित स्थानिक स्वराज्ज्य संस्थानतील सक्षम प्राधिकरणांच्या मान्यता देखील घेण्यात यावी.
  • प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर वस्तू आणि साहित्यांची खरेदी न करता ठरवण्यात आलेल्या रकमेचे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थांनी योजनेच्या लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे.
  • ग्रामपंचायत अपंग योजना चा लाभ घेतलेल्या संबंधित ग्रामपंचायतीतील ग्रामसचिवणे संपूर्ण लाभाबाबत संपूर्ण अहवाल आणि माहिती जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये सादर करावी.

निष्कर्ष

आज आपण या आर्टिकल मध्ये ग्रामपंचायत अपंग निधी योजना विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. आम्हाला आशा आहे कि आम्ही दिलेली माहिती मुले तुम्हाला काहीतरी मदत झाली असेल. अशाच नवीन नवीन योजनांचा लाभ घेण्याकरिता येणाऱ्या नोटिफिकेशन ला “होय” करा. जेणेकरून सर्व नवीन योजनांचा लाभ लवकरात लवकर तुम्हाला घेता येईल.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment