Yashwantrao Holkar Mahamesh Yojana: शेतकरी हा ज्या परिस्थिती मध्ये जीवन जगात आहेत त्याच्याशी आपण सर्वच अवगत आहोत. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना हे जीवन मान सुधारण्याचा एक मह्तवपूर्ण प्रयत्न सरकारचा आहे. शेती करत असताना कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी हमी भाव कमी असल्यामुळे उत्पन्न जास्त होऊन सुद्धा निराशाच हाती लागत असते.
शेतकऱ्याने शेतीला जोड धंदा सुरु केला तरच शेतकरी आर्थिक दृष्ट्या प्रबळ आणि समृद्ध होईल.महाराष्ट्राची पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहे. ज्यामुळे मागास प्रवर्गातील आणि भटक्या जमातीतील नागरिकांना विशेष लाभ मिळणार आहे.
या योजनेने स्वतःचा व्यापार ते सुद्धा सरकार मार्फ़त सुरु केलेल्या अनुदान योजनेवर सुरु करून जीवन जगण्याचा दर्जा उंचावू शकतात. योजने मार्फ़त शेळी पालन, मेंढी पालन, आणि मुकुट पालन व्यवसारायाकरिता हा निधी दिल्या जाणार आहे. Yashwantrao Holkar Mahamesh Yojana मधून लाभ कसा घ्याचा, योजनेचा उद्देश, पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये विस्तारपूर्वक बघणार आहोत.
महत्वाची माहिती: Ladki Bahin Yojana पैसे कधी जमा होणार, याबद्दल मंत्री अदिती तटकरेने दिली माहिती
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना काय आहे
महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढणारे बेरोजगारीचे प्रमाण बघत महाराष्ट्र सरकारने वर्ष 2017 प – असून राज्यभर राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यास सुरु केली आहे. ज्यामुळे मागास समाजातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास फार मोठी मदत होत आहे.
मुख्यतः जर पहिले तर धनगर समाज हा जास्त शेळी व मेंढी पालन करत असतो. ते सुद्धार ऋतू नुसार आपल्या सर्व शेळ्या आणि मेंढ्या चे प्रस्थान करत असतात. आज बघितले तर राज्यभर जवळपास दोन लाख नागरिक मेंढी पालन व्यवसाय करून चांगलीआहे. ज्यामुळे राज्याच्या आर्थिक शुद्ध सुधारण्यास मदत होत असते. परंतु वाढत्या विकास सोबत मेंढीपालन व्यवसाय देखील कमी कमी होत चालला आहे.
यालाच चालना देण्याकरिता सरकार Yashwantrao Holkar Mahamesh Yojana राबून 75% अनुदान देत आहे. ज्यामुळे नवीन नवीन युवा या व्यापाराकडे वळतील आणि त्यांना रोजगार प्राप्त होईल. या व्यापारापासून अनेक रोजगाराच्या तथा उत्पन्नाच्या संधी प्राप्त होत असतात. जसे मेंढी पासून त्यांचे केस विकले जातात, मांस विकले जाते, दूध सुद्धा विकले जाते. हे सर्व करून मेंढीपालची चांगली कमी देखील होते. हि योजना राज्यातील भटक्या आणि मागासलेल्या जमातीकरिता राज्यसरकार ने सुरु केली आहे.
महत्वाची माहिती: पोखरा योजना महाराष्ट्र मार्फत मिळणार 100% अनुदान: Pokhara Yojana Maharashtra
योजनेचा लाभ खालील प्रकारे मिडेल
- कुक्कट पालन अनुदान: अर्जदाराला राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेमार्फत चार आठवडे म्हणजेच एक महिना वयाचे स्युधारित प्रजातीचे खरेदी आणि संगोपनाकरिता कमाल 9000/- पर्यंत झालेल्या ऐकून खर्चाच्या 75% अनुदान देण्यात येणार आहे.
- मेंढ्यासाठी चराई अनुदान: ज्या व्यक्तीकडे अथवा कुटुंबाकडे किमान एक मेंढ्यानार आणि वीस मेंढ्या असतील त्यांना पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यात प्रति महिना 6000/- देण्यात येईल. ऐकून सर्व रक्कम प्रति वर्ष 24000/- रुपये मिळणार.
- मेंढी शेळी पालनाकरिता जागा अनुदान: भूमिहीन असलेल्या कुटुंबाला अथवा कुटुंबातील व्यक्तीला अर्ध बंदिस्ती किंवा पूर्ण बंधिस्त मेंढी शेळी पालन करीत जागा खरेदी करण्यासाठी ऐकून किमतीच्या 75% अनुदान किंवा तीस वर्षासाठी जागा भाड्यावर घेण्याकरिता ऐकून भाडयाच्या रकमेच्या 75% मिळणार. एक डचे एकरकमी आर्थिक मदत म्हणून जास्तीत जास्त 50000/- चे अनुदान राजे यशवंतराव होळकर महामेष योजना मार्फ़त दिले जाणार आहे.
महामेष योजना साठी पात्रता निकष
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजना फक्त भटक्या जमाती (भज क) प्रवर्गातील जनतेसाठी आहे.
- योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जकर्त्याचे वय 18-60 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.
- एक कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- लाभ घेणारी जर महिला असेल तर तिला तीस टक्के आरक्षण असेल.
- अपंग अर्जदाराला तीन टक्के आरक्षण देण्यात येते.
- जो हि अर्जदार कुकुटपालन अनुदान मिळण्यासाठी अर्ज करेल त्याला स्वतःची जागा असणे गरजेचे आहे.
- पात्र उमेदवाराला मेंढ्याचे जाती व निवड करण्याकरिता सोबत नेण्यात येणार.
महामेश योजना साठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक (आधार कार्डशी संलग्न असावे)
- जातीचा दाखला
- अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- पशुधन विकास विभाग अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- अपत्य स्वयंघोषणापत्र (बंधपत्र नमुना क्र.२ नुसार)
- स्वयंमघोषाना पत्र (बंधपत्र नमुना क्र.५ नुसार)
- शेळी मेंढी पालनासाठी जागा खरेदी करण्याकरिता प्रमाण पत्र
- कुक्कुट पालन योजनेसाठी स्वतःची जमीन लागेल आणि पशुधन विकास विभाग अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
असा करा ऑनलाईन अर्ज
- मोबाईलवरून अर्ज भरण्याकरिता सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत साइट ला भेट द्या. त्यासाठी खालील Click Here बटनावर क्लिक करा.
Online Apply Now – Click Here |
- नंतर तुमचा पुढे एक डॅशबोर्ड ओपन होईल.
- तेथे अर्जासाठी करा असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
- नवीन अर्जदार नवीन अर्जदार पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या पुढे अर्ज भरण्याकरिता एक ओपन होईल
- तेथे वैयक्तिक, बचत गट, FPO असे तीन पर्याय दिसतील.
- आपण वैयक्तिक अनुदानासाठी अर्ज करत असाल तर वैयक्तिक पर्यायावर क्लिक करा
- ओपन झालेल्या अर्जावर मागण्यात आलेली सर्व माहिती ना चुकता भरा
- संपूर्ण माहिती अचूक आहे कि नाही ते प्रत चेक करा
- नियम व अटी मान्य आहेत या चेक बॉक्स वर क्लिक करा.
- शेवटी सबमिट बटनावर क्लीक करून आपण अर्ज सबमिट करा
- आपण जो मोबाईल नंबर नोंदणी केला आहे त्यावर तुमचा अर्ज यशस्वी झाल्याचा एक मॅसेज येईल
- नंतर तुमि भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून
निष्कर्ष
महामेश योजना म्हणजेच राजे यशवंतराव होळकर महामेश योजना होय. जी सध्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि फायद्याची योजना बनलेली आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून शेतकरी विविध उद्योग करू शकत आहे. सोबतच सरकार लाभार्थ्याला अनुदान सुद्धा देत आहे.
शेळी पालन असो व कुक्कुट पालन असो योजनेच्या माध्यमातून अतिशय मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक खर्च करण्याची गरज भासणार नाही. आपण सुद्धा शेतकरी असाल तर योजनेचा लाभ घेऊन शेतीला पूरक असा जोडधंदा सुरु करा, धन्यवाद.
FAQs
-
Que: राजे यशवंतराव होळकर महामेष योज़न काय आहे?
Ans: महाराष्ट्र्रातील शेतकऱ्यांना शेती अतिरिक उत्पन्नासाठी उद्योग करण्याकरिता 75% अनुदान मदत स्वरूपात मिळणार. ज्यामध्ये लाभार्थी कुक्कुट पालन, शेळी पालन आणि मेंढी पालन सारखे लघु उद्योग करू शकणार आहे.या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील हजारो तरुणांनी व्यवसाय सुरु करून स्वतःला रोजगार उपलब्ध करून घेतला आहे. तसे चांगले उत्पन्न करत आहेत.
-
Que: महामेष योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
Ans: महामेष योजना हि राज्य सरकारने राज्यातील शेतकरी बांधवानाकरीत सुरु केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रहिवासी असलेला नागरिकच योजनेचा लाभ घेऊ शकतो. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे अठरा पेक्षा अधिक आणि साथ पेक्षा कमी असल्या हवे, त्याच्याकडे योजनेचा लाभ घेण्यासाठी जागा असणे गरजेचे आहे. सोबत त्यांना योजनेसाठी अर्ज केला असला पाहिजे आणि सोबत आवश्यकता कागदपत्रे सुद्धा जोडलेली असायला हवी. तेव्हाच योजनेचा लाभ मिळू शकेल.
-
Que: महामेष योजनांमधून किती रुपये अनुदान मिळते?
Ans: पात्र लाभार्थ्यास कुक्कुट पालन, मेंढी पालन किंवा शेळी पालन करण्याकरिता विविध पद्धतीने अनुदान दिले जाते.जर आपणाला कुक्कुट पालन करायचे असेल तर नऊ हजार रुपयांपर्यंत खरेदी आणि संगोपन करण्याकरिता अनुदान मिळेल. जर शेळी पालन करायचे असेल तर शेळी चराई व संगोपनाकरिता चार महिने प्रति माह सहा हजार रुपये देण्यात येईल आणि जर मेंढी/शेळी पालन करायचे असेल तर पन्नास हजार रुपयाचे अनुदान खरेदी आणि पालन करण्याकरिता मिळणार आहेत.