Shetila Tar Kumpan Yojana: शेतकरी म्हंटले कि अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तार कुंपण योजना हि त्या समस्यांपैकी एक समस्यांचे समाधान आहे. ज्याने शेतकऱ्याला थोडा का होईना आनंदाचा श्वास घेता येतो. शेतात उत्पादन घेताना पिकाची पेरणी केल्यापासून ते पीक घरी येई पर्यन्त पिकाची अतिशय काळजी घ्यावी लागत असते.
या गोष्टीचा अनुभव आपण सर्वांनी घेतलाच असेल. जेव्हा शेतातील पीक चांगल्या प्रकारे घेता येईल तेव्हाच देशातील नागरिकांना जीवन जगण्यासाठी अन्नधान्य प्राप्त होणार. आणि शेतकरी देखी आनंदी आणि समृद्ध बनेल.
यासाठी सरकारने जंगली जनावरापासून पिकाच्या सरंक्षण करता यावे म्हणून Shetila Tar Kumpan Yojana मार्फत 90% अनुदानावर शेताला कुंपण घेऊन पिकांना सुरक्षित ठेवण्याचा उपाय शेतकऱ्यांना दिला आहे. आज आपण शेती कुंपण योजनेचा लाभ कसा घ्यावा, लागणारे कागदपत्रे, पात्रता निकष आणि होणारे फायदे या विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.
Read Also: शेततळे अनुदान योजना मार्फ़त 2025 मध्ये मिळणार Magel Tyala Shettale, असा करा अर्ज.
शेती तार कुंपण योजना काय आहे?

शेती तयार कुंपण योजना हि महाराष्ट्र सरकारद्वारे संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच भरावा लागते. राज्यातील हेक्टर नुसार या योजनेचा लाभ शेतकऱ्याला मिळणार आहे. जर शेतकऱ्याकडे एक ते दोन हेक्टर पर्यंत शेती असेल तर त्यांना 90% अनुदानाचा लाभ मिळणार.
जर दोन ते तीन हेक्टर शेती असेल तर त्या शेतकऱ्यास 60% अनुदान, जर तीन ते पाच हेक्टर शेती असेल तर 50% अनुदान आणि पाच हेक्टर पेक्षा अधिक शेती असेल तर 40% अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आणि जे बाकीची रक्कम असेल ते अर्जदार शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.
शेती तार कुंपण योजनाचे पात्रता निकष
तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला शेतातील पिकांना संरक्षण द्यायचे आहे. तर सरकारी योजनामार्फ़त तर कुंपण दिले जाणार आहे. फक्त खालील प्रमाणे सांगण्यात आलेल्या पात्रात निकषांमध्ये तुम्ही बसता कि नाही ते बघा, जर तुम्ही निकषांनुसार पात्र झाले तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी असावा.
- जो शेतकरी या योजनेसाठी अर्ज करेल तोच कायदेशीर पद्धतीने त्या शेत जमिनीचा मलिक असला पाहिजे. अथवा भाडेतत्वाने शेती करणारा असायला हवा.
- ज्या जमिनीसाठी शेतकरी अर्ज करणार आहे ती शेती अतिक्रमणाची नसावी.
- शेतकऱ्याची शेती हि वन्य जनावरांच्या भ्रमण हद्दीत अथवा वर्गात असली तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही.
- शेतातील पिकाचे जनावरांकडून नुकसान झाल्याचा पुरावा.
- शेती तार कुंपण योजनेमार्फ़त पात्र शेतकऱ्यांना ९०% अनुदान दिले जाणार परंतु बाकीची जी उर्वरित रक्कम असेल ते शेतकऱ्याला स्वतः भरावी लागणार आहे.
तार कुंपण योजनेचे फायदे
- शेतीला तार कुंपण घेतले तर वन्य जनावरापासून शेतातीळ पिकांचे संरक्षण होईल आणि नुकसानाला आळा बसेल.
- शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.
- शेतीला तार कुंपण योजना मार्फत शेतीला अनुदान स्वरूपाची आर्थिक मदत सरकार करणार आहे.
- शेतीला चारी बाजून मजबूत कुंपणाने शेती तीळ पीक जनावरांपासून आणि चोरट्यांपासून देखील सुरक्षित राहणार.
- शेतीला वारंवार कुंपण घेण्याचे काम राहणार नाही. त्यामुळे खर्च देखील कमी होईल.
- कमी खर्चात शेतीच्या पिकाचे चांगल्या प्रकारे जनावरांपासून संरक्षण करता येईल.
शेती तार कुंपण योजनेचे उद्दिष्ट
Read Also: सरकार देणार कडबा कुट्टी मशीन साठी अनुदान,आत्ताच करा अर्ज। Kadba Kutti Machine Yojana 2025
जगाचा पोशिंद्याचे पीक जर सुरक्षित असेल तरच जगाला सुखाने खायला मिळणार आहे. परंतु आजकारलं शेतकऱ्याची पिके हि अधिक तर जंगली जनावरे खात राहतात. स्वतःचे पिके वाचवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना चोवीस तास सुद्धा पिकांची रखवाली करावी लागते. रात असो किंवा दिवस शेतकऱ्याला शेतामध्येच मुक्काम करावा लागतो. त्यामुळे सरकारने शेतकऱयांच्या हिताकरिता अनुदानावर तार कुंपण योजना सुरु केली आहे.
ज्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचे उदिष्ट ठेऊन हि योजना राज्यभर राबविली जात आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना कुंपणामुळे पिकाच्या संरक्षणाकरिता अधिक मेहनत करण्याची गरज पडू नये आणि शेतकऱ्याचा विकास होईल अशे नियोजन या योजने मार्फ़त केले जाणार आहे.
लागणारे आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधारकार्ड
- शेतीचा सात बारा
- सदरील आठ अ
- अर्जदाराचा जातीचा दाखला
- संबंधित ग्राम पंचायतीचा दाखला
- समितीचा ठराव
- वन अधिकाऱ्याचा दाखला
- बँकेचे पासबुक
शेताला तार कुंपण योजनासाठी असा करा अर्ज
शेती तार कुंपण योजना हि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फ़त राबविण्यात येत असते. त्यामुळे योजनेसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीनेच भरावा लागणार आहे.
- सर्वप्रथम तर कुंपण योजनेचे पात्रता निकष व्यवस्थित बघून घ्यावे, जर आपणास वाटत असेल कि तुम्ही पात्र आहेत तर, सांगितल्या प्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करून घ्यावीत.
- नंतर तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये जाऊन शेती कुंपण योजना चा अर्ज घ्यावा.
- त्या प्राप्त केलेल्या अर्जावर सर्व माहिती नचुकता बरोबर भरावी.
- आर्जवर विचारण्यात आलेले सर्व प्रश्नाची उत्तरे भरावी.
- सर्व अर्ज भरन झाल्यावर परत एकदा चेक करावा जर काही राहिले असेल तर ते भरावे आणि जर काही चूक झाली असेल तर दुसरा अर्ज घ्यावा आणि तो भरावा.
- मागितल्या गेलेल्या सर्व कागदपरांची झेरॉक्स लावावी.
- सर्व कागदपत्रे बरोबर आहेत का याची स्वतः शहा निशा करून घ्यावी.
- नांतर तेथीलच संबंधित अधिकाऱ्याकडे हा अर्ज सबमिट करावा. आणि अर्ज सबमिट झाल्याची पोचपावती घेणे विसरू नका.
- अशाप्रकार शेतीला तर कुंपण घेण्याकरिता अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही योजनेचा अर्ज करू शकता.
निष्कर्ष
अशा प्रकारे आपण आज या आर्टिकल मध्ये शेतीला तार कुंपण योजना चा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष, योजनेतून होणार फायदा आणि अर्ज कश्याप्रकारे भरायचा याची देखील संपूर्ण माहिती बघितली आहे.
ज्याच्या फाभ घेऊन शेतकरी स्वतःचे उत्पन्न वाढून स्वाच्या परिवाराचे चांगल्या प्रकारे पालन पोषण करू शकतात. जर तुमाला किंवा तुमच्या नातेवाईकांना जनावरांचा त्रास होत असेल तर त्यांना हि माहिती नक्की शेयर करा, काही अडचण आल्यास कॉमेंट्स मध्ये नक्की विचारा.
FAQs
-
Que: तार कुंपण योजना काय आहे?
Ans- तार कुंपण योजनेमार्फ़त शेतकऱ्याला सरकार अनुदान रूपात शेतीला तर कुंपण घेण्याकरिता मदत देणार आहे. ज्यामध्ये पात्र शेतकऱ्याला शेतीनुरूप अनुदान दिले जाणार.
-
Que: तार कुंपण योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
Ans- जर तुम्हाला खरंच तर कुंपणच आवश्यकता असेल, तुमचे पीळ जंगली जनावर खात असतील तर तुमच्या पंचायत समिती मध्ये जाऊन तुम्ही योजनेचा अर्ज करू शकणार आहे. कारण अर्ज प्रक्रिया हि ऑफलाइन पद्धतीनेच असणार आहे.
-
Que: तार कुंपण योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
Ans- जे शेतकरी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत. शेतकऱ्याच्या नावाने जमीन असायला हवी, शेतकऱ्याच्या पिकाचे जनावरांच्या भ्रमनामुळे नुकसान होत असेल आणि वन विभागाकडून नुकसान होत असलेले प्रमाणपत्र दिले जाईलअसेच शेजारी तार कुंपण योजनेसाठी पात्र होणार आहेत.
-
Que: तार कुंपण योजनेमार्फ़त किती लाभ मिडणार?
Ans- योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याकडे जर दोन हेक्टर शेती असेल तर त्याला योजनेमार्फ़त ९०% अनुदान, जर दोन पेक्षा जास्त ती हेक्टर पर्यंत शेती असेल तर ६०% अनुदान, तीन ते पाच हेक्टर च्या मध्ये शेती असेल तर ५०% अनुदान आणि पाच हेक्टर पेक्षा जास्त शेती असेल तर ४०% अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळेही योजना अप्लभुदरक शेतकऱ्यांसाठी वार्डांस्वरूप ठरणार आहे.






Tar campaund
Seti sathi yaojana
Shetkari tar kupan yojana