या योजनेमार्फत मुलीच्या लग्नासाठी मिळणार 51 हजार। Bandhakam Kamgar Vivah Yojana साठी असा कर ऑनलाइन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhakam Kamgar Vivah Yojana: बांधकाम कामगार विवाह योजना हि कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्यसरकारने सुरु केलेल्या कामगार योजनांचा एक भाग आहे. राज्यातील नागरिक हे भीषण महागाईच्या संकटात आहे. जिकडे तिकडे महागाई चा उच्चांक वाढत आहे. अशा वेळेला जे कामगार आपले कुटुंब हातावर चालवतात त्यांना फार काहीच पर्याय उरलेलानाही.

याचीच दखल घेत महाराष्ट्र्र सरकार गरीब नागरिकांना आर्थिक मदत म्हणून राज्यभर विविध योजना राबवित आहेत. त्यामधीलच एक महत्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार विवाह योजना (Bandhakam Kamgar Vivah Yojana) आहे. ज्या मार्फ़त राज्यातील बांधकाम कामगाराला स्वतःच्या लग्नासाठी राज्यसरकारकडून नोंदीत बांधकाम कामगाराला ३०,००० हजार रुपये दिले जाणार आहे.

जर नवोदित बांधकाम कामगाराला त्याच्या मुलीचे लग्न करायचे असेल तर त्यासाठी देखील राज्यसरकार आर्थिक मदत म्हणून ५१,००० रुपये देणार आहे. आता हि योजना काय आहे, योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, पात्रात अटी, योजेचा लाभ आणि अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

Read Also: बांधकाम कामगार घरकुल योजना| Bandhkam Kamgar Gharkul Yojana 2025

बांधकाम कामगार विवाह योजना काय आहे? Bandhakam Kamgar Vivah Yojana 2025

Bandhakam Kamgar Vivah Yojana 2025
Bandhakam Kamgar Vivah Yojana 2025

महाराष्ट्र्र सरकारने सुरु केली एक कल्याणकारी योजना बांधकाम कामगार विवाह योजना (Bandhakam Kamgar Vivah Yojana) आहे. ज्यामुळे राज्यातील कामगार आणि कामगार मुलीना त्याच्या लग्नासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्यातील कामगार मुलींकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आणि मुली ह्या ओझे असते हा समज निघून जावा या करीता हा प्रयोग सरकारने सुरु केला आहे.

ज्यामुळे मुलीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांना जास्त काळजीओ करण्याचं गरज पडणार नाही आणि तिच्या लग्नासाठी सरकारच ५१ हजार रुपये देणार आहे.कामगार म्हटले कि त्याला त्याच्या वेतनामधून फक्त घर सांभाळणं होऊ शकते बाकी कुठलीही बॅच त्यांच्या कडे राहत नाही.

आणि लग्न म्हण्टले कि, आदीच गरीब जनतेला कर्ज काढावे लागते. जे भरणं नाही झाले तर त्यांना आत्महत्येचा पर्याय देखील सोपा वाटत असतो. सरकारच्या या योजनेने राज्यातील सक्रिय कामगाराना या योजनेतून फार मोठी मदत होणार आहे. जे कि १००% अनुदानावर सरकार देणार आहे.म्हणून कामगारांना कोणाकडूनही कर्ज काढण्याची देखील गरज पडणार नाही आहे.

Read Also: Bankam Kamgar Yojana। बांधकाम कामगार योजना। Online Apply 2025

योजनेचा कामगारांना होणार असा फायदा

  • बांधकाम कामगारांना त्याच्या मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या पैशाची काळजी निर्णयही गरज भासणार नाही.
  • लग्नासाठी कोणाकडून कर्ज काढावे लागणार नाही.
  • कामगारांना सरकार विवाह करण्यासाठी ५१ हजार देणार त्यामुळे ते आत्मनिर्भर बनतील.
  • पात्र अर्जेदारच्या योजनेचे मिळाले पैसे डायरेक्ट बँकेच्या खात्यात जमा केले जाणार आहे. त्यामुळे कुठेही चकरा मारायचे काम पडणार नाही.
  • गरीब कामगार आपल्या मुलीला स्वतःवर ओझं समजणार नाही आणि त्यांना चांगली वागणूक देतील.
  • बांधकाम कामगाराला स्वतःच्या कामे मधून मुलीचा लग्नाकरिता अधिक पैसे बचत करण्याची गरज पडणार नाही.
  • लग्नामध्ये कामगार देखील मनमोकळ्या मानाने खर्च करू शकेल.
  • योजनेमार्फ़त मिळालेली रकम परत करण्याचे टेन्शन सुद्धा राहणार नाही. कारण योजनेमार्फ़त १००% अनुदान स्वरूपात लाभ मिळणार आहे.

बांधकाम कामगार विवाह योजना साठीच्या अटी आणि पात्रता

Bandhakam Kamgar Vivah Yojana Patrata
Bandhakam Kamgar Vivah Yojana Patrata

जो हि बांधकाम कामगार खालील अटी आणि पात्रता निकषां पूर्ण करेल, त्याला Bandhakam Kamgar Vivah Yojana मार्फ़त लग्नासाठी मिळणाऱ्या अनुदान योजनेसाठी पात्र करण्यात येणार आहे. त्यामुळेच ह्या अटी पूर्णपणे माहित असणे सुद्धा गरजेचे आहे.

  • अर्ज करणारा व्यक्ती हा राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगार अथवा त्याच्या पत्नीने मागील ३ वर्षात किमान १८० दिवस काम केलेलं असावे.
  • या योजने साठी पात्र कुटुंबातील फक्त एक मुलगी असणार आहे.
  • मुलीचा विवाह झाला असल्याचे नोंदणी दाखला
  • बांधकाम कामगाराच्या नोंदणीकृत आयडी मध्ये परिवाराच्या त्या तपशिलात त्या मुलीचे नाव असणे बंधनकारक आहे.
  • ज्या मुलीचे लग्न झाले आहे तिचे वय १८ वर्षा पेक्षा अधिक असावे तरच या योजनेसाठी पात्र होऊन लाभ घेता येईल.
  • मुलीचे शिक्षण कमीत कमी १० वि पर्यंत झालेले असावे

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

मुलीचे लागणारे कागदपत्रे:

बांधकाम कामगाराच्या मूळच्या लग्नाकरिता योजनेमार्फ़त अनुदान मिळवायचे असेल, तर खालील प्रमाणे सांगण्यात आलेले कागदपत्र आवश्यक लागणार आहेत.ती व्यवस्थित बघून घेऊन ते गोळा करावीत.

  • बांधकाम कामगाराच्या मुलीचे विवाह झाल्याचे प्रमाणपात्र / लग्नपत्रिका/ लग्नच फोटो
  • अर्जदाराच्या कामगार आयडी मधील सादर तपशिलात नाव असल्याचा दाखला
  • मुलीचे वय १८ वर्ष असल्याचा दाखला/ बोनाफाईड/ शाळेची टी.सी/ जन्माचा दाखला

बांधकाम कामगारांचे कागदपत्र:

  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • रहिवासी दाखला
  • मूळचा रहिवासी पुरावा
  • आधार कार्ड शी संलग्न मोबाईल नंबर
  • सध्या ज्या ठिकाण काम करतोय त्या ठिकाणाचा पत्ता
  • पासपोर्ट फोटो ३
  • अर्जदाराचे बँक पासबुक
  • जन्माचा दाखल अथवा शाळेची टी.सी
  • मागील वर्षात ९० दिवस काम केले असल्याचा ठेकेदार किंवा इंजिनियर चा दाखला
  • बांधकामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • स्वयंघोषणापत्र
  • बांधकाम कामगार आयडी
  • नोंदणी अर्ज

योजनेचा लाभ घेण्याकरिता असा करा अर्ज

बांधकाम कामगार विवाह योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे. त्यासाठी खालील पद्धतीने तुमि अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम वर सांगितलेल्या प्रमाणे योजनेचे सर्व पात्रता निकषांमध्ये आपण बसता का हे जाणून घयावे.
  • नंतर लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करावीत.
  • खाली अर्जाची PDF Download बटन दिले आहे त्यावर क्लिक करून तेथून अर्ज डाउनलोड करावा.
  • नंतर अर्जावर जे माहिती मागितली ती व्यवस्थित न चुकता पूर्ण भरावी.
  • अर्ज भरन झाल्यावर परत एकदा चेक करून बघावे, जर पाहिलं माहहती भारताची सुटली असेल तर ती व्यवस्थित भरावी.
  • अर्ज सोबत सांगितलेले सर्व कागदपत्र जोडावीत
  • अर्ज आणि कागदपत्र तुमच्या जिल्याच्या किंवा तालुक्याच्या बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करावी.
  • अशाप्रकारे आपण या योजनेचा अर्ज करू शकणार आहोत.
योजनेचा फॉर्म PDF

निष्कर्ष

बांधकाम कामगार विवाह योजनेचा (Bandhakam Kamgar Vivah Yojana) लाभ कशाप्रकारे घेता येईल, या विषयी संपूर्ण विस्तारित माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघितली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र आणि पात्रता निकष सुद्धा बघितली आहे.

जर आपणास योजनेचा लाभ घ्याचा असेल तर लवकरात लवकर योजनेचा अर्ज करा. आणि जर तुमच्या परिसरात बांधकाम कामगार असेल तर त्यांच्यापर्यंत हि माहिती नक्की पोहोचवा. तसेच योजनेचा अर्ज भरत असताना काही अडचणी आल्या असतील तर कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

FAQs

  1. Que: बांधकाम कामगार विवाह योजनेचा लाभ कोणाला मिळेल?

    Ans- Bandhakam Kamgar Vivah Yojana चा लाभ हा फक्त बांधकाम कामगार आणि त्याच्या मुलीच्या लग्नासाठीच मिळणार आहे. अर्थात जर एखाद्या बांधकाम कामगाराला लग्न करायचे असेल तर तो योजनेमार्फत अनुदान प्राप्त करू शकतो. तसेच जर एखाद्या बांधकाम कामगार मुलीचे लग्न करायचे असेल तर ती मुलगी सुद्धा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.

  2. Que: बांधकाम कामगार विवाह योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळते?

    Ans- जर बांधकाम कामगाराची मुलगी असेल तर तिच्या लग्नाकरिता ५१ हजार रुपये अनुदान स्वरूपात मिळणार आहे. जर का स्वतः बांधकाम कामगारांचे विवाह असेल तर त्याला योजनेमार्फ़त ३० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

  3. Que: महाराष्ट्र कामगार नोंदणीसाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत?

    Ans- कामगार नोंदणी करण्याकरिता जन्माचा दाखला, ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, अर्जदाराचा रहिवासी दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो एवढे कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. यापकी जर एखादे कागदपत्र नसेल तर तुमचे रजिस्ट्रेशन होऊ शकणार नाही.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment