Bandhakam Kamgar Laptop Yojana 2025: बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार फ्री लॅपटॉप, बघा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhakam Kamgar Laptop Yojana : अशी कुठलीहि इमारत नसेल जी बांधकाम कामगाराच्या योगदानाशिवाय तयार होऊ शकली. बांधकाम कामगारांचे काम हे जीव धोक्यात घालून त्यांना करावे लागत असते. केव्हा कुठली दूरघटना होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यांची मेहनत हि त्यांना मिळणाऱ्या रोजंदारी पेक्षा अतिशय अधिक असते.

कुठल्याही ऋतू मध्ये त्यांना आपले कुटुंब चालंवण्यासाठी कामावर्ती जावेच लागते. येवडा मोठा संघर्ष असून सुद्धा त्यांना समाजामध्ये मात्र योग्य स्थान आणि योग्य वागणूक दिली जात नाही. याच गोष्टीचा विचार करून राज्य सरकार Bandhakam Kamgar Laptop Yojana 2025 मध्ये राबवून त्यांच्या पाल्यांना फ्री लॅपटॉपची वाटप करत आहेत. ज्यामुळे त्यांच्या पाल्यांना भविष्यामध्ये योग्य दिशा मिळेल.

Read Also: Bandhakam Kamgar Silai Machine Yojana: बांधकाम कामगारांना 2025 मध्ये मिळणार शिलाई मशीन, बघा संपूर्ण माहिती

Maharashtra Bandhakam Kamgar Laptop Yojana 2025: बांधकाम कामगार फ्री लॅपटॉप योजना

आजच्या या डिजिटल युगामध्ये मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉप सारख्या वस्तू असणे काळाची गरज बनली आहे. राज्यसरकारने कामगाराच्या पाल्यासाठी योजनेचे अर्ज हे 1 जून पासून भरण्यास सुरुवात केली आहे, शेवटची तारीख हि 31 जुलै आहे.

बांधकाम कामगारांच्या पाल्याचा विकास होण्यासाठी राज्यसरकार त्यांच्यासाठी अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर त्यांना जणू सर्व शिक्षण हे मोफतच मिळणार आहेत. ज्याचा लाभ घेऊन कामगारांचे मूल/मुली ह्या मोठे मोठे उच्च पदे गाठतील आणि स्वतःच्या पुढील पिढयांना सुधरवतील. चला तर बघूया लॅपटॉप कोणाला आणि कशापद्धतीने मिळेल.

योजनेचे उद्देश

बांधकाम कामगार पाल्यांना त्यांचे शिक्षण घेताना कुठल्याही अडचणी येऊ नये. लॅपटॉपचा वापर करू ते त्यांचे ऑनलाइन शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच जर ऑनलाइन कोचिंग क्लासेस त्यांना करायचे असेल तर ते मिळालेल्या लॅपटॉप च्या मदतीने करू शकतील. तसेच कामगार पाल्यांना चालू घडामोडी चा आढावा सुद्धा स्वतःच्या लॅपटॉप वरून घेता येईल, ज्याचा लाभ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल.

Read Also: Free Scooty Yojana 2025 Maharashtra: या योजनेअंतर्गत मुलींना मिळणार मोफत स्कुटी, बघा योजनेची संपूर्ण माहिती

योजनेचे होणारे फायदे

योजनेचा लाभ घेऊन बांधकाम कामगार पाल्य मिळणाऱ्या लॅपटॉपचा चांगला उपयोग करतील. लॅपटॉप चा उपयोग करून कामगारांच्या पाल्यांना स्वतःचे शिक्षण ऑनलाईन पूर्ण करण्यास मदत होईल.

शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांना विकत घेण्याची गरज पडणार नाही आणि लॅपटॉपरच ते पुस्तक ऑनलाईन वाचू शकतील. लॅपटॉप मध्ये आवश्यक असलेली अभ्यासक्रमाची ऍप्स घेऊन त्यावरून चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतील.योजनेअंतर्गत राज्यसरकार बांधकाम विभागामार्फत एकदम फ्री लॅपटॉप पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.

योजनेचे पात्रता निकष आणि अटी

Bandhakam Kamgar Laptop Yojana साठी नोंदणीकृत बांधकाम कामगार महाराष्टातील असणे आवश्यक आहे. योजनेचा अर्ज फक्त कामगारांचे पाल्यच करू शकतात. अर्जदार हा महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी असायला हवा. मित्रांनो योजनांचा लाभ हा दहावी उत्तीर्ण असलेल्या अर्जदारांना पुढील शिक्षण घेण्याकरिता मिळणार आहे.

विद्यार्थ्याला दहावीत 50% गुण असेल तरच मोफत लॅपटॉप मिळेल. ज्या अर्जदाराच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा जस्ट असेल त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. योजनेचा लाभ एक कामगार परिवारातीक फक्त दोनच पाल्यांना दिला जाणार आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • बोनाफाईड सर्टिफिकेट
  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • कामगारांचे आणि त्याच्या पाल्याचे आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला

असा करा अर्ज

Bandhakam Kamgar Laptop Yojana साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे. त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून तुम्ही योजनेचा अर्ज मिळवू शकता. अर्ज मिळवा आणि ते आदी व्यवस्तीत वाचून घ्या. नंतर बांधकाम कामगार आणि त्याच्या पाल्याची सर्व माहिती भरावी लागेल.

अर्ज सोबत मागण्यात आलेले आवश्यक कागदपत्र सुद्धा तुंगाला जोडावे लागतील आणि ते फाईल घेऊन तुमच्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करावे लागेल. नंतर तुमच्या अर्जाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाणार आहे. तुम्ही जर पात्र असला तर तुम्हाला नाकी मोफत लॅपटॉप दिला जाईल.

बांधकाम कामगार फ्री लॅपटॉप योजना अर्ज
PDF

निष्कर्ष

Bandhakam Kamgar Laptop Yojana 2025 हि कामगारांच्या पाल्यांच्या प्रकाशमय भविष्यासाठीची अतिशय मोठी योजना आहे. कामगारांना व्यवस्थित जेवण सुद्धा मिडटा नाही अशा वेडीला त्यांच्या पाल्यांचे शिक्षण पूर्ण करणे फारच लांब होते. मात्र आता सरकारी योजनांतून मोफत शिक्षणासोबत त्यांच्या पाल्यांना मोफत लॅपटॉपसुद्धा मिळणार असल्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारणे निश्चित आहे. याच क्रांतीचा एक भाग अन्य कामगार बनण्यासाठी सविस्तर माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघितली आहे., धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment