Bandhkam Kamgar Home Loan Yojana: बांधकाम कामगार आहेत तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी या आर्टिकल मध्ये असणार आहे. कारण आता तुम्हाला स्वतःचे मजबूत आणि पक्के घर बांधण्याकरिता सरकारी कर्ज दिले जाणार आहे. सोबतच त्या कर्जावर अनुदान सुद्धा दिले जाईल. तुम्हाला योजनेचा लाभ घ्याचा असेल तर खाली दिलेली माहिती संपूर्ण बघा.
Bandhkam Kamgar Home Loan Yojana Maharashtra- बांधकाम कामगार होम लोन योजना माहिती
बांधकाम कामगार मित्रांनो आजच्या वाढत्या महागाई मध्ये स्वतःच्या कमाईने घर निर्माण करणे साधारण बाब नाही आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मात्र महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगार घरकुल योजना मार्फत पक्के घर बांधण्यासाठी 2 लाखांपर्यंत अनुदान देत आहे.
2 लाखांमध्ये घर बनवणे कामगारांना शक्यच नाही. या वर सुद्धा उपाय म्हणून गरजूं नोंदणीकृत कामगारांसाठी Bandhkam Kamgar Home Loan Yojana सुद्धा सुरु केली आहे . या योजनेमार्फत 6 लाखाचे कर्ज राज्य सरकार देणार आहे. खुशखबर तर हि आहे कि, या कर्जावर सुद्धा सरकार 2 लाख अनुदान देणार आहे. म्हणजे 6 लाखाचे कर्ज मिळवा आणि परत फक्त 4 लाख रुपयेच भरावे लागतील.
Read Also: Bandhkam Kamgar Pension Yojana 2025: बांधकाम कामगारांना मिळणार 12 हजार रुपये पेंशन, अर्ज झाले सुरु.
योजनेचा उद्देश
इमारत बांधकाम कामगार ज्यांना आपण कुठेही छोटेसे पाल मांडून राहतांना बघतो. जी कि त्यांची रोजगारासाठीची एक मजबुरी राहते. अशा या मेहनती कामगारांचे सुद्धा स्वतःचे पक्के घर बनवून देण्यासाठी आणि त्यांना मजबूत घर निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्र शासनाने हि योजना सुरु केली आहे. योजनेचा लाभ मिळणारी मजुरांच्या डोक्यावरील आर्थिक ताण कमी व्हावा आणि त्याच्या परिवाराच्या डोक्यावर एक पक्के चाट असावे हेच या योजनेमागील उद्देश आहे.
योजनेचे पात्रता निकष
अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा सोबतच तो एक नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे बंधनकारक आहे. अर्जदाराचे वय हे किमान 18 ते कमाल 60 असले तरच तो लाभास पात्र असेल. मागील वर्षांमध्ये त्यांने किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे. तसेच राष्ट्रीयकृत असलेल्या कुठल्याही बँकेने तुमचे लोण मंजूर केल्याचे प्रमाण असावे. इत्यादी पात्रता अटी मध्ये तो बसत असेल तरच्या त्याला लाभ मिळू शकेल.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- कामगार आयडी
- नोंदणी प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- 90 दिवस कामावर असल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- स्वयंघोषपात्र
- बँकेचे खातेबुक
- पासपोर्ट फोटो
- राष्ट्रीकृत बँकेने कर्ज मंजूर केल्याचा पुरावा
योजनेचे होणारे फायदे
पहिला आणि मोठा फायदा म्हणजे कर्ज काडून स्वतःचे इच्छेप्रमाणे चांगले घर कामगार आपल्या कुटुंबकरीत बंधू शकतील. कर्जावर व्याज नाही राहणार तसेच 2 लाख सूट मिळणार आहे. कामगारांना मोठी आर्थिक मदत होईल. त्यांचा सामाजिक परिस्थिती मध्ये सुधार येईल. कामगारांचे आणि त्यांच्या परिवाराचे राहणीमान सुधारेल आणि समाजाचा त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोण सुद्धा सुधारेल.
असा करा अर्ज
सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमच्या कर्जाची शिफारस करावी लागेल, अर्ज द्यावा लागेल सोबत तुमचे कामगार असल्याचे पुरावे आणि कागदपत्र सुद्धा जोडावी लागतील. बँकेने तुमचे कर्ज मंजूर केल्यानंतर आपल्याला mahabocw.in वेबसाइट वरती जाऊन कर्जही सर्व माहिती भरून सोबत त्याचे प्रमाण कागदपत्र सुद्धा अपलोड कार्याची आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर अनुदानाची रक्कम हि तुमच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल.
निष्कर्ष
बांधकाम कामगाराच्या अनेक योजना सरकार राबवत आहेत, त्यापैकी अतिशय महत्वाची Bandhkam Kamgar Home Loan Yojana आपल्याला म्हणता येईल. कारण जो मानवाचा मूलभूत प्रश्न असतो निवाऱ्याचा त्याला निर्माण करण्यासाठी मदत दिली जाणार आहे. हि योजना अधिकतर कामगारांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हि योजना पोहोचावा आणि स्वतः सुद्धा लाभ घ्यावा, धन्यवाद.