Best Post Office Scheme For Women In Marathi: महिलांचा विकास होण्याकरता त्यांना आत्मनिर्भर करण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे.माझी लाडकी बहीण योजना असो किंवा लेक लाडकी योजना ह्यामुळे महिलांना एक मोठा आधार तर सरकारने मिळालाच सोबत त्यांचा सामाजिक दर्जा उंचावयाला मदत सुद्धा झाली आहे.
हे आपल्याला नाकारता येत नाही. कारण महिला ह्या फक्त घरकाम करण्यासाठी आहेत असा समज लोकांचा होता, जेव्हा पासून महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला लागले आहेत, तेव्हापासून पुरुषांनी सुद्धा घराचा कारभार त्यांच्याच हाती दिला आहे.
शेतात स्वतः कष्ट करून मिळणारे पिकाचे, उत्पन्नाचे पैसे सुद्धा शेतकरी घरातील महिलेच्या हातामध्ये देऊ लागले आहेत. परंतु अजून सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांना ते पैसे कुठे गुंतवायचे ज्यामुळे जास्त लाभ मिळणार हेच कळत नाही.
म्हणून महिला आपल्या बँकेच्या बचत खात्यामध्ये बचत करतात. त्यामुळे ते पैसे जेवढे होते तेवढेच राहत असतात. आज तुम्हाला या पोस्ट ला Best Post Office Scheme For Women In Marathi माहिती डिटेल बघायला मिळेल. ज्यामुळे तुमचे पैसे बचत तर राहतीलच सोबत चांगला व्याजदर मिळवून तुम्ही मोठा नफा सुद्धा मिळवू शकणार आहेत.
Read Also: Mahila Udyogini Yojana Maharastra| महिला उद्योगिनी योजना डिटेल In Marathi
Best Post Office Scheme For Women In Marathi 2025 Inforamation: चांगला व्याजदर देणाऱ्या पोस्टाच्या योजना
महिलांना कुटुंब चालविण्याकरिता आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. अर्थातच जवळ असलेला पैसे कुठे गुंतवणूक करायचा याचे ज्ञान असेल तर अटीचा चांगल्या प्रकारे कुटुंबातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. त्याकरिता काही महत्वपूर्ण Best Post Office Scheme For Women In Marathi आम्ही खालील प्रमाणे व्यवस्थित मांडणी करून समजावून सांगणार आहो. ज्याचा लाभ घेऊन महिला चांगला नफा करून घेत आहेत.
- महिला सन्मान बचत पत्र
- राष्ट्रीय बचत पत्र योजना
- सुकन्या समृद्धी योजना
- मासिक इनकम स्कीम
- पोस्ट ऑफिस ची पीपीएफ योजना
महिला सन्मान बचत पत्र
या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकणार आहेत. त्यामुळे सरकारने महिलांना चांगला व्याजदर देऊ केला आहे. पोस्ट ऑफिस मार्फ़त हि योजना भारत सरकारने 31 मार्च 2023 पासून राबवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत लाखो महिलांनी महिला सन्मान बचत पत्र योजनेचा लाभ घेऊन स्वतःची आर्थिक परिस्थिती सांभाळली आणि बळकट केली आहे.
योजनेमार्फ़त लाभ घेण्याकरिता कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवणूक करू शकणार आहेत. जे कि दोन वर्षकरिताच करता येईल. एकदा केलेली गुंतवणून हि पूर्णपणे दोन वर्षानंतर काढता येईल. जर अतिआवश्यक कामाकरिता एक वर्ष झाल्यावर ऐकून रकमेचे 40% पर्यंतची रक्कम तुम्हाला काढता येणे शक्य होईल.
तसेच तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंट ला पोस्ट ऑफिस मार्फत प्रतिवर्ष 7.50% व्याज देत असते. जे कि दर तीन महिन्याला चक्रवाढ व्याज दर पद्धतीने प्राप्त होणार आहेत. मुदतीआधीच पैसे काढण्यासाठी काही अटी सुद्धा दिल्या आहे.
लाभार्थीचे मनोगत:
प्रिया धामणे- मी एक मिडल क्लास परिवारातील एक महिला आहे. माझे पती हे शेतामध्ये काम करतात आणि कुटुंबाचे पालनपोषण चालते. बाकीचे बचत राहिलेले पैसे आमी बँक मध्ये टाकून ठेव असायचो, मात्र त्याला कुठलेही जास्त व्याज मदत नव्हते.
त्यामुळे जेव्हडी रक्कम आम्ही बँकेत ठेवली तेवडीची चार- पाच वर्षाने सुद्धा मिळत असे. मात्र जेव्हा आम्हाला या cmwaliyojana या वेबसाईट वरून महिला सन्मान बचत पत्र योजनेची माहिती मोडली तेव्हा मंग आम्ही बँकेतील पसे काढून या योजनेमध्ये गुंतवले नंतर जेव्हा दोन वर्ष नंतर काढले तर आम्हाला चक्रवाढ व्याजासहित चांगला नफा भेटला आहे. तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन चांगले व्याज मिळवू शकता.
Read Also: New Schemes Only For Women 2025: फक्त महिलांसाठी शासनाच्या विविध योजना, बघा संपूर्ण माहिती
राष्ट्रीय बचत पत्र योजना
भारत सरकार द्वारे गरीब आणि मध्यमवर्गीय गुंतवणुकीकरिता एक उत्तम व सुरक्षित पर्याय असणारी हि एक योजना आहे. ज्यामध्ये कमीत कमी एक व्यक्ती 1000 रुपये, तर जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकतो. म्हणजेच कुठली हि मर्यादा हि दिलेली नाही.
योजनेचा हा कालावधी पाच वर्षा करीत असणार आहे.अधिकृत माहितीनुसार 7.7% दार वर्षी चक्रवाढ व्याज तुमच्या रकमेवर देण्यात येत असल्याची माहिती आहे.
योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या किंवा तालुक्याच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्यावे लागणार आहे. तेथे जात असताना सोबत स्वतःचे ओळखपत्र, रहिवासी दाखला आणि दोन फोटो घेऊन जावे लागेल. या योजने अंतरागत केलेली गुंतवणूक हि अतिशय सुरक्षित असेल, कारण हि सरकार केंद्रसरकार मार्फत राबविली जाते.
सुकन्या समृद्धी योजना
दाम्पत्याला मुलगी जन्माला आली तर ती त्यांना ओझं वाटू नये, शिक्षणाला जास्त खर्च पालकांचा होऊ नये हा उद्देश समोर ठेऊन सरकारने मुलींकरिता सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. योजनेचा लाभ लाभ हे फक्त दहा वर्षाखालील मुलीला मिळू शकणार आहे.
योजनेमार्फ़त तुम्हाला मुलीच्या पालकाच्या नावाने खाते उघडता येते. त्यामध्येप्रति वर्ष 250 रुपये पासून ते 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकणार आहेत. मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होईल तेव्हाच तिच्या शिक्षणाकरिता हि रकम काढू शकता. योजने अंतर्गत पोस्ट ऑफिस मधून तुम्हाला 8.2% व्याजदर वार्षिक चक्रवाढ मिळणार आहे.
मासिक इनकम स्कीम (MIS)
पोस्ट ऑफिस च्या सर्वात मोठ्या आणि लाभदायक योजनांपैकी एक योजना मासिक इनकम स्कीम म्हणजे MIS हि योजना आहे. या योजनेअंतर्गत महिला आणि पुरुष देखील स्वतःचे खाते उघडून निवेश करू शकतात. यामध्ये कमाल गुंतवणूक 9 लाख रुपये करता येते.
जर संयुक्त खाते असेल तर अधिकाधिक गुंतवणूक15 लाख करता येणार आहे. या योजनेचा लावधी कमल पाच वर्षाचा असणार आहे. लाभार्थ्याने गुंतवलेल्या रकमेवर 7.4% टक्के प्रति वर्ष व्याज मिळत असते. या योजनेला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद दिवसेंदिवस मिळत आहे.
पोस्ट ऑफिस ची पीपीएफ योजना (PPF)
पोस्ट ऑफिस ची पीपीएफ योजना दीर्घकाळासाठी बचत करण्याकरिता अतिशय चांगली आहे. सांगायचे झाल्यास तर हि योजना पंधरा वर्ष करीत असणार आहे.
योजनेअंतर्गत लाभार्थी किंवा खातेदार कमीत कमी 500 रुपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये सुद्धा प्रति वर्ष गुंतवू शकता. गुंतवलेल्या रकमेवर 7.1% व्याज मिळेल. खास गोस्ट तर हि आहे कि, तुमचे व्याज हे दार वर्षी चक्रवाढ व्याज पद्धतीने दार वर्षी वाढणार आहे.
गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याज हे टॅक्स फ्री असेल. त्यामुळे निष्काळजी पणे मिडलकलास परिवार स्वतःचे पैसे गुंतवून चांगला नफा घेऊ शकतात.
एवढेच नाही तर योजनेअंतर्गत पोस्टात खाते उघडले तिथून तीन वर्ष नंतर व सहाव्या वर्षाच्या आदी सरकार तुम्हाला पीपीएफ कर्ज सुद्धा देऊ करणार आहे. तसेच खातेधारकार जर इतर कोणी नॉमिनी ठेवायचे झाल्यास ते देखील ठेवण्याची सुविधा ह्या योजनेमार्फत मिळणार आहे.
टीप: वरील प्रमाणे सांगण्यात आलेल्या सर्व योजना ह्या सरकार पोस्ट ऑफिस अंतर्गत राबवत असते. त्यामुळे योजनांची संपूर्ण सविस्तर माहिती साठी जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट नक्की द्या.
निष्कर्ष
ह्या योजना मध्यमवर्गीय परिवरासाठी व महिलांसाठी अतिशय लाभदायक ठरू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर तुमची गुंतवणूक करा आणि जास्तीत जास्त व्याज सरकारकडून मिळवा, हि योजना राज्यातील आणि देशातील महिलांना चांगला कामे चा स्रोत बानू शकते. म्हणून जास्तीत जास्त हि माहिती शेअर करा. काही अडचण असेल तर कंमेंट्स करायला विसरू नका.
FAQs
-
Que: महिलांसाठी पोस्ट ऑफिस योजना कोणत्या आहेत?
Ans- महिलांसाठी अतिशय लाभदायी आणि जास्त नफा मिळणारी योजना हि महिला सन्मान बचत प्रमाणपत्र हि आहे. तसेच राष्ट्रीय बचत पत्र योजना, सुकन्या समृद्धी योजना, मासिक इनकम स्कीम आणि पीपीएफ योजना मध्ये गुंतवणूक करून सुद्धा महिला चांगला व्याजदर घेऊन स्वतःचा फायदा नफा करू शकतात.
-
Que: पोस्ट ऑफिसमध्ये मासिक उत्पन्नासाठी कोणती योजना सर्वोत्तम आहे?
Ans- जर तुम्हाला मासिक उतपन्न घ्यायचे असेल तर तुमच्या साठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS) हि आहे. हि एक सुरक्षित आणि उत्तम अशी गुंतवणूक असल्याचे लाभार्थी सांगत आहेत. योजनेमार्फत गुंतवणुकीवर 7.5% व्याजदर मिळत असतो.