Birsa Munda Krushi Kranti Yojana: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सत्यात एक मोठी क्रांती आहे. शेतकऱ्यांना शेती करण्याकरिता लागणारी सर्वच गोष्टी चा लाभ या योजनेद्वारे घेता येणार आहे. ते सुद्धा अनुदानांमधून. त्यामुळे आटा शेतकऱ्यांना शेती साठी अतिरिक्त खर्च करण्याची गरज भासणार नाही आणि शेत करणे देखील सुलभ होणार आहे.
खास तर अति मागास समजले जाणारे अनुसुचित जमातीचे आदिवासी बांधवनसाठी हि योजना कुठल्या हि वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण आदीच प्रत्येक गोष्टी साठी आता पर्यंत संघर्ष करत आलेला हा समाज आहे. ज्याला अशा कल्याणकारी योजनांची अत्यंत आवश्यकता आहे. तेवहा तो देखील सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहाचा हिस्सा बानू शकणार आहे.
महत्वाचे बघा: मागेल त्याला विहीर योजना मार्फत मिळणार 4 लाख रुपये अनुदान
Birsa Munda Krushi Kranti Yojana In Marathi: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
Birsa Munda Krushi Kranti Yojana हि फक्त महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील शेकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन कडून राबविण्यात येणारी कल्याण करी योजना आहे. जी आपल्या राज्यात १९९२ पासून राबविण्यात येत आहे. परंतु ती आम जनतेपर्यंत एवढ्या सहजरित्या पोहोचत नव्हती त्यामुळे हा मोठा समुदाय लाभापासून वंचितच राहत होता.
त्यामुळेच आज देखील अनेक आदिवासी बांधव आर्थिक दृष्ट्या सक्षम व प्रबळ झालेलं नाही आहेत. Birsa Munda Krushi Kranti Yojana मार्फ़त सरकार शेतकऱ्यांना १००% अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळीसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाईप आणि जुनी विहीर दुरुस्ती चा लाभ प्रदान करते.
ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आवश्यक सर्व संसाधन मोफत मिळतात. याचा योग्य वापर केला तर पात्र लाभार्थ्यांचा उत्पन्न कमालीचे वाढणार यामध्ये काही शंकाच नाही आहे. आपण देखील अजून योजनेचा अर्ज केला नसेल लगेच करा.जेणेकरून आपणस देखील या सर्व बाबींचा लाभ घेता येईल.
Birsa Munda Krushi Kranti Yojana चा लाभ असा मिडेल
- शेतकऱ्याला जर नवीन विहीर खोदायची असेल तर त्याला Birsa Munda Krushi Kranti Yojana मार्फ़त २,५०,०००/- रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
- जर जुन्याच विहिरीला दुरुस्त करायचे असेल तर पात्र अर्जदाराला ५०,००० रुप्याचे अनुदान मिडेल.
- शेतातील विहिरी मध्ये बोअरिंग करायची असेल तर त्यासाठी देखील २०,००० रुपया पर्यंत अनुदान भेटणार.
- शेतात वीज जोडणं करायचं तर त्याला १०००० रुपये.
- शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण करावयाचे असल्यास पात्र अर्जदाराला १,००,००० रुपये अनुदान भेटणार आहे.
- शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी जे ठिंबक सिंच आणि तुषार सिंचन वापरतात त्यासाठी देखील पात्र अर्जदाराला २५ ते ५० हजारापर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.
- फवारणी पापं साठी २०००० रुपये मिळणार
- तर पीव्हीसी पाईप साठी ३०००० रुपया पर्यंतचा लाभ अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना Birsa Munda Krushi Kranti Yojana मार्फ़त दिला जाणार आहे.
योजनेची पात्रता आणि अटी
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर खालील पात्रता निकषांमध्ये बसने अत्यंतगरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला योजनेचे मिळणारे असंख्य लाभांपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे सर्व निकष व अटी व्यवस्तीत समजून घ्यावेत.
- सर्वप्रथम Birsa Munda Krushi Kranti Yojana लाभ घेण्यासाठी किव्वा पात्र होण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- अर्ज करणारा शेतकरी हा असूचित जमाती मधील असावा.
- पात्र अर्जेदारकडे स्वतःचा जातीचा दाखला असावयाचा हवा.
- अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न १,५०,००० रुपया पेक्षा अधिक असू नये.
- शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा आणि आठ अ हे त्याच्याच नावाने असावे
- पात्र अर्जदाराकडे किमान ०.४० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.
- शेतकऱ्याने याआधी कुठल्याही सरकारी लाभ योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच अनुदानाकरिता तो पुढील कमान ५ वर्ष पात्र राहणार नाही.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे उद्दिष्ट
बिरसा मुंडा यांना आजही आदिवासी समुदायातील लोक देव मानतात. त्यामुळेच त्यांच्याच नावाने सरकाने योजना सुरु केली आहे. आजच्याआधुनिक युगात सुद्धा आदिवासी समाजाची काय दुर्दशा आहे, हे आपल्या पासून लपलेले नाही आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा विकासाच्या मुख्य प्रवाह मध्ये आणण्यासाठी राज्यसरकार नेहमी तत्पर राहत असते.
त्याचाच एक भाग म्हणजे हि योजना आहे. हि योजना राबवून राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना अनेक सुविधा देण्यात येत आहे. यांच्या शेतीचा विकास करण्यात येत आहे. ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल. समाजातील आतला घटकांप्रमाणे ते देखील एक चांगले आणि उत्तम दर्जाचे जैवनमान जगू शकतील.
आवश्यक लागणारी कागदपत्रे
योजनेसाठी पात्र होण्याकरिता खालील प्रमाणे सांगण्यात आलेले कागदपत्र असणे अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे ते सर्व तुमच्या जवळ असणे बंधनकारक आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- सात बारा व आठ अ
- दारिद्र्य रेषेचे कार्ड (जुनी विहीर दुरुस्थी, बोअरिंग साठी)
- दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचे शंभर रुप्याच्या स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र
- पाणी उपलब्धतेचा दाखला ( विहिरीसाठी)
- तलाठ्याच्या ०.४० हेक्टर शेती असल्याचा दाखला, शेतात विहीर नसल्याचा दाखला, ५०० फुटाच्या अंतरावर कुठचीही विहीर नसल्याचा दाखला (विहिरीसाठी)
- कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारस पत्र
- संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र
- जागेचा फोटो
- ग्रामसभेचा ठराव
Birsa Munda Krushi Kranti Yojana Apply Online- असा भर अर्ज
- सर्वप्रथम वरती सांगितलेले सर्व कागदपत्र गोळा करून घ्यावीत. म्हणजे जेव्हा आपण बिरसा मींड कृषी क्रांती योजनांचा अर्ज करू तेव्हा गडबड होता काम नये.
- महाराष्ट्र शासनाने प्रसारित केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
- नंतर तुमाला तेथे शेतकरी योजना नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
- नंतर तुमाला Birsa Munda Krushi Kranti Yojana नावाचा पर्याय दिसेल त्याला ओपन करायचे आहे.
- संपूर्ण माहिती वाचा आणि समजून घ्या.
- जर आपण या आधी कुठल्या योजनेचा लाभ घेतला नसेल कव्वा खाते ओपन केले नसे तर लोक इन करून तुला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- नंतर नवीन अर्जदार या पर्यायावर क्लीक करून तिथे तुमचे नाव आणि पासवर्ड टाकावे.
- नंतर परत पासवर्ड टाका व नंतर त्याचा उत्प हा तुमच्या मोबाईल वर येईल.
- नंतर परत लॉग इन केल्यावर आपणास आपली सर्व वयक्तिक माहिती भरायची आहे.
- मागण्यात येणारे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत. सर्व झाल्यावर शेवटी सबमिट बटनावर क्लीक करून अर्ज यशस्वी सबमिट करायचा आहे.
Birsa Munda Krushi Kranti Yojana | Apply Online |
निष्कर्ष
आज आपण या आर्टिकल मध्ये आदिवासी बांधवांसाठी वरदान समजण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना विषयी सविस्तर माहिती पहिली आहे. जर आपला कोणी सहकारी अथवा मित्र हा अनुसूचित जमाती मध्ये मोडत असेल तर त्याला हि माहिती नक्की पाठवा. ऑनलाईन अर्ज भारत असताना जर कुठलीही अडचल येत असेल तर बिनसंकोच कंमेंट्स करून सांगा. आमची टीम आपणाला पूर्ण सहयोग करेल, धन्यवाद.
FAQs
Que: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना काय आहे?
Ans- राज्यातील आदिवासी समुदायातील शेतकरी बांधवांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ शेतीचा विकास आणि शेतीतून आदिक उत्पन्न काढण्याकरिता दिला जाणार आहे.
Que: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे कोणते फायदे आहे?
Ans- आदिवासी शेतकऱ्यांना शेतीमध्ये विहित बांधण्यासाठी, जुनी विहीर असेल तर तिच्या दुरुस्तीसाठी, बोअर वेळ साठी, शेततळे साठी, सिंचन संसाधन विकत घेण्यासाठी आणि फवारणी पम्प घेण्यासाठी मदत या योजनेमार्फ़त मिळणर आहे. तसेच पाईपलाईन साठी सुद्धा अनुदान दिले जाणार आहे.
Que: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनासाठी कोण पात्र आहे?
Ans- योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करणार व्यक्ती हा महाराष्ट्राचा नागरिक असावा, विशेषतः तो शेतकरी हा आदिवासी समुदायातील असणे आवश्यक आहे, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा अधिक नसावे, शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर तरी शेती असावी आणि पाच वर्षात कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जो शेतकरी हे सर्व निकषांमध्ये बसत असतील ते लाभासाठी पात्र राहणार आहेत.