Borewell Yojana Maharashtra: पाण्यालाच पृथ्वीवरील अमृत म्हणून सुद्धा संबोधले जाते. परंतु हेच अमृत आपल्या महाराष्ट्रातील काही भागात कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेको समस्या उध्दभवत असतात. बोरवेल हा एक जमिनीमधून पाणी काढण्याचा उत्तम स्रोत आहे.
कमी वेळेत आणि कमी जागेमध्ये तुम्ही स्वतःचे जीवन पाणीमय करू शकता. शेतकरी सुद्धा स्वतःच्या शेतात बोर करून आपल्या शेतीचे चांगल्या प्रकारे सिंचन करू शकेल. शेतात विहीर खोदायची विचार केला तर जवळपास पाच ते सहा लाख रुपये खर्च येऊ शकतो. परंतु जर Borewell Yojana Maharashtra चा लाभ घेऊन बोर केला तर सरकार 80% अनुदान देणार आहे.
Read Also: Pashusavardhan Yojana Maharashtra 2025| शेळी- मेंढी, गायी-म्हशी आणि कुक्कुट वाटप योजना
Borewell Yojana Maharashtra 2025- बोरवेल अनुदान योजना माहिती
राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये दरवर्षी पाण्याचा दुष्काळ आपल्याला बघायला मिळतो. काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मोठा संघर्ष नागरिक करत असतात. दुष्काळाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि पाणी उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारने Borewell Yojana Maharashtra राबवण्यास सुरु केली आहे. ज्यामुळे तेथील शेतकऱ्यांना सुद्धा पाण्याचा सदुपयोग घेता येईल.
बोरवेल अनुदान योजना हि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तर जणू वरदानच बनली आहे. या योजनेमुळे अल्पभूदारक शेतकरी सुद्धा लाखो रुपयांचे पीक काढतांना दिसत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. जर तुम्ही योजनेसाठी पात्र झालात तर बोरवेल अनुदानाची रकम हि डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे.
Read Also: शेततळे अनुदान योजना मार्फ़त 2025 मध्ये मिळणार Magel Tyala Shettale, असा करा अर्ज.
बोरवेल अनुदान योजनेचा उद्देश
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाकरिता पाण्याची कमी होणार नाही याची काळजी घेणे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना Borewell Yojana Maharashtra सुरु करून शेती करीत पाणी उपलब्ध करून देण्यास मदत करणे. तसेच अल्पभूदारक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सिंचनाचे स्रोतची उपलब्धता वाढवणे, ज्यामुळे शेतकरी सुदखाऊ आणि णानदी जीवन जगू शकतील.
योजनेचे पात्रता निकष
बोरवेल अनुदान योजनेसाठी पात्र फक्त महाराष्ट्र राज्यातीलच शेतकरी असतील. जर शेतकऱ्याकडे आधीच योजनेतून मिळालेली विहीर असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्जदार शेतकऱ्याकडे किमान 20 गुंठे ते कमल 6 हेक्टर पर्यंत शेती असणे बंधनकारक आहे. शेतकरी हा गरीब आणि मध्यमवर्गीय असावा.
योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
योजनेचा अर्ज भरण्यासाठी अधिकृत माहितीनुसार अर्जदाराच्या शेतीचा सातबारा आणि आठ अ-उतारा, उत्पन्नाचा दाखला, शेतात विहीर नसल्याचे प्रमाणपत्र, शेतामध्ये जल उपलब्ध असल्याचा अहवाल,कृषी अधिकाऱ्याचे शिफारसपत्र, बोरवेलच्या जागेचाफोटो आणि जर अर्जदार हा अनुसूचित जातीचा किंवा जमातीचा असेल तर जातीचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.
लाभाचे स्वरूप
पात्र अर्जदार शेतकऱ्याला शेतामध्ये भूजल उपलब्धतेची तपासणी महाराष्ट्र शासनाच्या भूजल विभागाअंतर्गत करावी लागेल. तसेच तुम्ही खोदलेली बोरवेल हि कमाल 120 मीटर पर्यंतच खोल असावी, या पेक्षा जास्त खोल करण्याची या योजनेमार्फत परवानगी दिली जाणार नाही. तसेच पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची ऐकून लागलेल्या खर्चाची 80% रक्कम जमा केली जाईल.
असा करा योजनेचा अर्ज
बोरवेल अनुदानासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषिविभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तेथे अर्ज भरत असतांना सर्व माहिती भरावी आणि सोबत मागण्यात आलेले काही कागदपत्रे सुद्धा उपलोड कारवी लागतील. नंतर सर्व प्रक्रिया झाल्यावर अर्ज सबमिट करा. तुमच्या अर्जाची संबंधित अधिकारी तपासणी करून तुम्ही पात्र झालात तर कृषी विभाग तुम्हाला कळवेल.
निष्कर्ष
या आर्टिकल मध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार बोरवेल अनुदान योजनेअंतर्गत कश्याप्रकारे लाभ देईल, या विषयीची संपूर्ण आवश्यक माहिती बघितली आहे, धन्यवाद.