Dnyanjyoti Savitribai Phule Yojana In Marathi: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना जिला सावित्रीबाई फुले आधार योजना सुद्धा बोलले जाते. हि योजना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे कारण हि महाराष्ट्र सरकारने शिक्षण घेत असलेले युवक आणि युवतींना आर्थिक मदत करण्याकरिता सुरु केली आहे.
मागील वर्षांपर्यंत हे ओबीसी समाजातल्या विध्यार्त्यांना वसतिगृह नव्हते. तसेच ज्या प्रकारे अनुसुचित जाती मधील विध्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळतो तसा लाभ देखील मिळत नव्हता. मात्र आता सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत राज्यभर Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana राबविण्यास सुरुवात केली आहे.त्यामार्फत राज्यातील ओबीसी विध्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी वसतिगृह निर्माण करून दिले गेले आहे.
जर त्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यंला प्रवेश नाही मिळाला तर Dnyanjyoti Savitribai Phule Yojana योजनेमार्फ़त विध्यार्थ्यांना प्रति वर्ष 60,000/- हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. हि योजना नेमकी काय आहे, योजनेसाठी कोण पात्र होणार, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना यादी, पात्र विध्यार्थ्यांना लाभ कसा मिळणार आणि जर अजून कोणी अर्ज केले नसती तर ते कशाप्रकारे करू शकतील. या सर्व विषयांवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत.
महत्वाचे बघा: रोजगार संगम योजना मार्फत महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार बाहेर देशात नोकरी?
Dnyanjyoti Savitribai Phule Yojana In Marathi: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025
ज्या प्रकारे अनुसूचित जातीमधील शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना आहे त्याच प्रकारे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना Dnyanjyoti Savitribai Phule Yojana राज्य सरकार राबवित आहे. या वर्षी या योजनेचे अर्ज ज्या विद्यार्थ्यांनी भरले असतील त्यांच्या नावाच्या याद्या ह्या त्या त्या जिल्यानुसार लावण्यात सुद्धा आल्या आहेत.
या योजनेणंतर्गत एक जिल्ह्यातील कमाल 600 ओबीसी विध्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.परंतु राज्यातील बहुतांश ओबीसी पालकांना आणि विद्यार्थ्यांना या योजनेवीषयी माहिती नसल्यामुळे बऱ्याच विध्यार्थी या वर्षी लाभ पासून वंचितच राहू शकणार आहेत. हि योजना विध्यार्थ्यांच्या आर्थिक मदती मदती करीत राबविण्यात येत आहे.
त्यामार्फ़त सरकार पात्र अर्जदारास प्रति वर्ष 60,000/- हजार रुपये देऊन आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. योजनेमुळे आता ओबीसी विद्यार्थ्याला सुद्धा चांगले आणि उगाच शिक्षण घेतला आर्थिक संतांशी संघर्ष करण्याची गरज पडणार नाही आहे. जे विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडत होते, त्यांना सुद्धा आता निसंकोच चांगले शिक्षण घेता येईल.
महत्वाचे बघा: राज्यातील तरुणांना मिळणार प्रतिमाह 10,000/- रुपये, अर्ज झाले सुरु.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे उद्दिष्ट
राज्यातील बहुसंख्य असलेला समाज म्हणजे ओबीसी होय. इत्तर समाजाप्रमाणे हा समाज देखील पुढे जावा आणि विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे हाच उद्देश समोर ठेऊन सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु केली आहे.
कारण आजकाल महागाई च्या वाढत्या प्रमाणाने चांगले आणि उच्च शिक्षण जर बाहेर ठिकाणी घेण्याचा विचार जरी केला तरी अंगाला काटे येतील. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि शिक्षण अर्ध्यावरच सोडून देतात. परंतु आता मात्र हि वेळ येणार नाही आहे, ओबीसी समाजातील मूळ आणि मुली हे देखील हवे तेवढे उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे करियर बनवू शकणार आहे. आणि सरकारे उद्देश सार्थक ठरणार आहे.
महत्वाचे बघा: बेरोजगारी भत्ता योजना 2025। Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra
असा मिळणार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ
Dnyanjyoti Savitribai Phule Yojana चा लाभ पात्र अर्जदारांना त्यांच्या शिक्षण घेत असलेल्या ठिकाण्यानुसार मिळणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागरूर सारख्या मोठ्या शहरात वेगळा आणि जिल्हा, तालुका ,महापालिका असलेल्या ठिकाणे वेगळा लाभ दिला जाणार आहे जे आपण खालील प्रमाणे सविस्तर बघुयात.
1) मोठ्या शहरातील लाभ: जर विद्यार्थी हा मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर सारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये शिक्षण घेत असेल. तर साहजिकच त्याला तिथे राहण्यासाठी आणि खाण्या पिण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतातच. म्हणून Dnyanjyoti Savitribai Phule Yojana अंतर्गत पात्र विद्यार्थ्यास भोजन भत्ता हा 32000 रुपये मिळतो, निवास भत्ता हा 20000 रुपये मिळतो आणि निर्वाह भत्ता 8000 रुपये मिळत असतो. असे ऐकून प्रति वर्ष 60,000/- हजार रुपये सरकार देणार आहे.
2) महापालिका क्षेत्र: ज्या कॉलेज मध्ये विध्यार्थी शिक्षण घेत असेल, ते कॉलेज जर महापालिका क्षेत्रांमध्ये मोडत असेल. तर त्या पात्र ओबीसी विद्यर्थ्याला भोजन भत्ता 28000 हजार रुपये, निवास भत्ता हा 8000 हजार रुपये आणि निर्वाह भत्ता हा 15000 हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे. असे ऐकून संपूर्ण 51,000/- हजार रुपये प्रति वर्ष लाभ मिळणार आहे.
3) जिल्हा आणि तालुक्याचा लाभ: जिल्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जर का ओबीसी समाजातील युवक आणि युवती अकरावी, बारावी चे किंवा यापेक्षा पिढीला शिक्षण घेत असतील तर त्यांना सुद्धा Dnyanjyoti Savitribai Phule Yojana मार्फ़त भोजन भत्ता 25000 हजार रुपये, निवास भत्ता12000 हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 6000 हजर रुपये दिला जाणार आहे. असे ऐकून 43,000/- हजार रुपयाचा लाभ जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठीचे पात्रता निकष
योजनेसाठी अर्ज करण्याआधी खालील पात्रता निकष माहित असणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला अर्ज करतांना अडचणी सुद्धा येऊ शकतील.
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी पात्र होण्याकरिता अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा राहवासी असणे आवश्यक आहे.
- इतर राज्यातील मुलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदार विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हि ओबीसी असणे गरजेचे आहे. कारण हि योजना मुख्यत्वे ओबीसींसाठीच सुरु करण्यात आलेली आहे.
- अर्जदार जर अपंग असेल तर त्याच्याकडे 40% अधिक अपंग असल्याचे प्रमाणपत्र देखील असावे.
- जरा अर्जदार अनाथ असेल तरी सुद्धा अनाथ असल्याचे प्रमाणपत्र हे त्या विद्यार्थ्या सादर करणे आवश्यक राहणार आहे.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे कमाल अडीच लाख असावे. किमान कितीही असले तरी चालेल.
- दहावी पास झाल्यानांतच्या शिक्षणासाठीच योजनेचा लाभ मिळणार आहे.
- विद्यार्थ्यांच्या बँक खात्यास आधार लिंक असणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थी दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असेल, तर त्याला तेथील वास्तव्याचे, भाड्यानं राहण्याचे काही प्रमाण दाखवावे लागणार आहेत.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी लागणारी कागदपत्रे
- विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खातेबुक
- पासपोर्ट फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला
- दहावी आणि बारावीची मार्कशीट
- सुरु असलेला मोबाईल नंबर
Dnyanjyoti Savitribai Phule Yojana Apply: असा करा योजनेचा अर्ज
योजनेचा लाभ घ्याचा असेल तर योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने कशाप्रकारे करायचा, याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला खाली प्रकारे बघत येईल. याच प्रकारे अर्ज केल्यावर तुम्हाला लाभ मिळू शकणार आहे.
- सर्वप्रथम तुम्ही वरती सांगितलेले पात्रता निकषांमध्ये बसता का ते बघा.
- जर बसत असाल आणि तुम्ही बाहेर ठिकाणी सेक्शन घेत असाल, तर तुम्हाला त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तेथील समाजकल्याण कार्यालयात जावे लागणार आहे.
- तेथे जाऊन शिष्यवृती संबंधित कार्यालयात जाऊन संबंधित अधिकार्याकडून योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- पहिले तर तो अर्ज नीट पूर्णपणे वाचून घ्याचा आहे.
- त्यात विचारण्यात येणारी माहहती हि व्यवस्थित निळ्या किंवा काळ्या पेनानाने भरावी लागणार आहे.
- जे कागदपत्रे जोडायला सांगण्यात आली आहेत ती नीट अर्जासोबतच जोडायची आहेत.
- नंतर संबंधित विभागातील अधिकाऱ्याकडे हा अर्ज सबमिट करावा लागणार आहे.
- नंतर समाजकल्याण अधिकारी तुमचा अर्ज चेक करतील, तुम्ही पात्र झालात तर तुमचे नाव पात्रता यादी मध्ये टाकण्यात येणार आहे. जे समाज कल्याण बाहेर लावण्यात येत असते.
- जर त्यात तुमचे नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात जमा केले आहेत.
- अशा अतिशय साध्या आणि सरळ पद्धतीने Dnyanjyoti Savitribai Phule Yojana चा अर्ज तुम्ही करू शकणार आहेत.
निष्कर्ष
ओबीसी समाजातील उच्च शिक्षण घेण्यासाठी धडपड करत असलेल्या युवक आणि युवतींकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना फार महत्वपूर्ण बनलेली आहे. योजनेचे विषयीची संपूर्ण माहिती आपण आज या आर्टिकल मध्ये बघितली आहे. हि माहिती ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचवणे हे अनिवार्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त हि माहिती शेअर करावी हि विनंती. काही अडचण आल्यास आम्हाला नक्की कंमेंट्स मध्ये कळवा, धन्यवाद.
FAQs
-
Que: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना काय आहे?
Ans- हि योजना मुख्यतः ओबीसी विद्यार्थ्यंसाठी राज्यसरकार ने सुरु केलेली योजना आहे. योजने अंतर्गत सरकार उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रति वर्ष साठ हजार रुपये शिष्यवृत्ती स्वरूपात देणार आहे.
-
Que: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनासाठी कोण पात्र आहे?
Ans- हि योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे, त्यामुळे योजनेसाठी अर्ज फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थी करू शकणार आहेत. खास म्हणजे जे दहावी आणि बारावी चे शिक्षण पूर्ण करून पुढील उच्च शिक्षण घेत आहे आणि ते ओबीसी समुदायातील असतील तरच या ते पात्र ठरणार आहेत.
-
Que: सावित्री बाई फुले आधार योजनेचा लाभ किती मिळतो?
Ans- राज्यसरकारने योजनेचा लाभ लाभ देण्याकरिता तीन टप्पे पडलेले आहेत. जर युवक किंवा युवती हि पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक यांसाख्या मोठ्या शहरात शिक्षण घेत असतील तर त्यांना 60 हजार रुपये मिळेल, जर तेच महापालिका असलेल्या शहरात शिक्षण घेत असतील तर त्यांना 51 हजाराचा लाभ मिळेल आणि जर जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी जरराहून सेक्शन घेत असतील त त्यांना 43 हजार रुपयांचा लाभ मदत स्वरूपात सरकार देऊ करत आहे.