Electric Truck Subsidy 2025: मित्रांनो, या योजनेअंतर्गत किमान 5,600 इलेक्ट्रिक ट्रक रस्त्यावर सुरु करण्याचे शासनाचे उद्देश आहे. या योजनेचा सुद्धा 5,600 लाभार्थ्यांना डायरेक्ट Electric Truck Subsidy मधून मिळणार आहे. या योजनेकरिता शासमार्फत अंदाजे 100 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. दिल्ली मधील वाढते प्रदूषण लक्षात घेता फक्त दिल्ली साठीच 1100 इलेक्ट्रिक ट्रक इलेक्ट्रिक सबसिडी योजना मार्फत देणार असल्याची माहिती सुद्धा उद्योग मंत्र्यांनी दिली आहे. आता या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक ट्रक वर अनुदान किती मिळेल आणि ते कसे मिळवायचे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे बघावी लागेल.
Electric Truck Subsidy: किती मिळणार अनुदान?
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जितचे ट्रक ला चाक जास्त तेवढे अनुदान सुद्धा जास्त मिळणार आहे. आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितिच्या आधारे जास्तीत जास्त एक ई-ट्रक वर 9,60,000 एव्हडी सबसिडी लाभार्थ्याला दिली जाणार आहे. हि सबसीडी पीएम ई-ड्राइव्ह पोर्टलद्वारे डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
योजनेचे उद्देश
आता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रदुशम कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.मंग ते इलेक्ट्रिक स्कुटर असो वा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर यावरती अनुदान देऊन नागरिकांना खरेदीसाठी प्रोत्साहित केले जाते. त्याच प्रमाणे अवजड वाहन म्हणजे इलेक्ट्रिक ट्रक सुद्धा मार्केट मध्ये आले आहेत, हे सुद्धा उद्योजकांनी खरेदी करून प्रदूषण कमी करण्यास मदत होण्यासाठी Electric Truck Subsidy योजना राबविण्याचा शासनाचा उद्देश आहे.
डिजेल, पेट्रोल च्या वाहनाने किती हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रधूशन होते हे आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही. कारण हिवाळ्यामध्ये जे दिल्ल्ली आणि मुंबई सारख्या शहरांचे प्रदूषणामुळे हाल होतात त्यांच्याशी आपण चांगलेच परिचित आहोत. त्यावर उपाययोजना चा एक भाग म्हणून सरकारचा अनुदानाचा निर्णय आहे.
योजनेचे फायदे
या अनुदानाच्या माध्यमातून ट्रक खरेदीदाराला फार मोठी आर्थिक मदत होणार आहे. तसेच इलेक्ट्रिक ट्रक ची जी बॅटरी असणार आहे तिची पाच वर्षापर्यंत वारंटी किंवा पाच लाख किलो मीटर पर्यंत चाले पर्यंतची वारंटी सुद्धा सरकारने जाहीर केली आहे. एवढेच नाही तर वाहन मोटार जी असणार आहे त्याची सुद्धा पाच वर्षाची वारंटी मिळणार आहे, ज्यामुळे पाच वर्षापर्यंत लाभार्थ्याला मेंटेनन्स ची सुद्धा काळजी करण्याची गरज राहणार नाही. अर्जदार हा व्होल्टो आयशर, अशोक लेलँड आणि महिंद्रा सारख्या मोठं मोठ्या कंपन्यांच्या तरुकावर हे अनुदान मिळवू शकते.
योजनेची पात्रता
ज्या उद्योजकाकडे डिझेल किंवा पेट्रोलचा ट्रक आधीच असेल, त्याला मात्र या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम ई-ड्राइव्ह पोर्टल वर अर्ज करणे बांधकारक आहे, तसेच यादी जर जुने डिझेलचे ट्रक आहेत तर ते रद्द करणे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला Electric Truck Subsidy दिली जाईल. हि योजना फक्त भारताचे नागरिक किंवा रहिवासी असलेल्या उद्योजकांसाठी सुरु करण्यात आली आहे.
निष्कर्ष
याआधी आपण इलेक्ट्रिक वाहन सबसिडी योजनेचे नाव नक्कीच ऐकले असलं, त्यामध्ये इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर चा समावेश होता. आत्ता मात्र केंद्र सरकारने अवजड वाहनांसाठी हि नवीन योजना राबवण्यास हाती घेतली आहे. जी नवीन सिमेंट, पोलाद आणि ट्रान्सपोर्ट उद्योजकांसाठी मोठी संधी आहे, धन्यवाद.