ELI Yojana 2025: मित्रांनो आपल्या देशात कुठल्याही गावामध्ये गेले तर कमीत कमी 50-60 तरुण हे आपल्याला सुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरतांना दिसतात. यामध्ध्ये त्यांची सुद्धा काही चूक नाही आहे, कारण शासनणे आतापर्यंत ज्याप्रकारे तात्यांची दाखल घ्यायला हवी होती ते घेतलेली नाही आहे. त्यामुळे आपल्या देशाला आज बेरोजगारी नावाची सर्वात मोठी कीड लागली आहे. याच किडीला कमी करण्यासाठी आता केंद्र सरकारने ELI Yojana 2025 सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे. ते किती प्रभावी ठरेल ते खालीलप्रमाणे बघुयात.
What Is ELI Yojana 2025? – एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेन्टिव्ह योजना काय आहे?
वाढत्या बेरोजगारीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रसरकारने ELI Yojana 2025 ला मंजूर केले आहे. मित्रांनो या योजनांतर्गत संपूर्ण देशातून ऐकून साडेतीन कोटी नवीन खासगी नौकऱ्याचे निर्माण केले जाणार असल्याचे सुद्धा स्पष्ट होते. हि योजना खासगी क्षेत्रातील नौकरदार वर्गासाठी अतिशय मोठे गिफ्ट असणार आहे. या योजनेचा लाभ हा नॊकरी करणारा आणि नौकरी देणारा या दोघांनाही मिळणार आहे.
या योजनेसाठी शासनणे 1 लाख कोटी रुपयाच्या निढाईला सुद्धा मंजूरी दिलेली आहे. हि योजना दोन वर्षाकरिता देशभर राबवण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. हि योजना 1 आगस्ट 2025 सुरु होणार असून 31 जुलै 2027 पर्यंत राबवण्यात येणार आहे. या योजनेची नेमकेच घोषणा झाली अजून अजून पात्रता निकष ठरवण्यात आलेले नाहीत. ते ठरवल्या नंतर सर्व आम्ही तुम्हाला नक्की सांगू.
योजनेच्या लाभाचे स्वरूप
पहिल्यांदाच घराच्या बाहेर जॉब करण्यासाठी जाणाऱ्या युवकांना 15,000 रुपया पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. एक लाख रुपये पगार असणाऱ्या नोकरदाराला सुद्धा याचा लाभ मैदानात आहे. परंतु हे लक्षात ठेवा कि हे अनुदान दोन टप्प्यामध्ये मिळणार असून त्याचा दुसरा टप्पा हा सहा महिन्यांनी मिळणार आहे. हा लाभ दोन वर्षाकरिता असणार आहे.
तसेच जे नोकरी देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा ELI Yojana 2025 मार्फत दोन तरुण नौकरीला ठेवल्यास प्रत्येकी 3000 रुपयांपर्यंत लाभ प्रत्येक महिन्याला देण्यात येईल, जे कि दोन वर्षासाठी असेल. जर कंपनी हि मॅनिफॅक्चरिंग करणारी असेल तर मात्र त्याला हा लाभ चार वर्षाकरिता देण्यात येणार आहे.
योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे
योजनेची अर्ज पद्धती अजून सुरु झालेली नाही. ELI Yojana ची रजिस्ट्रेशन करण्याची संपूर्ण प्रक्रिया हि 1 आगस्ट 2025 सुरु होणार असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी बेरोजगार तरुण आणि त्यांना नोकरी देणाऱ्या कंपनीला सुद्धा रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असेल.
निष्कर्ष
वेगवेळ्या राज्याची सरकारे राज्यातील तरूणानाच्या हाताला काम लावून देण्यासाठी अनेक रोजगार निर्मितीच्या योजना राबवत असते. मात्र आता हा प्रश्न केंद्र शासनाने हाती घेतला आहे, त्यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये बेरोजगारीचा वाढत दार नसून थांवरच नाही तर अर्ध्यापेक्षा जास्त घटेल अशी अपेक्षा शासनाची आहे. योजनेच्या येणाऱ्या सर्व अपडेट ची माहितीसाठी आम्हाला व्हाट्स अप ला जॉईन नक्की करा, धन्यवाद.