Farmer ID Maharashtra 2025: फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र हे सर्व शेतकऱ्यांना काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्याप्रकारे देशात आधार कार्ड आवश्यक झाले आहे त्याच प्रकारे आता शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र असणे महत्वाचे आहे. जर एखाद्या शेतकऱ्याकडे हे कार्ड नसेल तर त्याला सरकारच्या विविध योजनांपासून वंचितच राहावे लागणार आहे.
Farmer ID हे कार्ड शेतकऱ्या ला भविष्यात मिळणाऱ्या सर्व योजनेकरिता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे कार्ड कसे काढायचे? या कार्डचे फायदे काय? कार्ड मार्फ़त कोणत्या योजनेचा लाभ मिळणार? लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण एकाच आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत. सोबतच घरी बसून मोबाईल वरून हे Farmer ID Maharashtra 2025 मध्ये कसे काढता येईल हे सुद्धा बघणार आहोत.
महत्वाचे बघा: मागेल त्याला विहीर योजना मार्फत मिळणार 4 लाख रुपये अनुदान।
Farmer ID Maharashtra 2025: फार्मर आयडी नसेल तर नाही मिळणार योजनेचा लाभ, मोबाईल वरूनच करा रजिस्ट्रेशन
शेतकरी ओळखपत्र हे जर असेल जर पुढील ज्या हि योजना सरकार सुरु करणार आहेत त्याच लाभ घेणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी हे 2025 मध्ये नवीन नियम सुरु केला आहे. जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना सर्व नवीन नवीन योजनांचा चांगला लाभ मिळणार आणि ज्यांना योजनेची गरज नाही त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या कार्ड द्वारे शेतकऱ्याची संपूर्ण माहिती सरारकडे जमा असेल. कार्ड द्वारे शेतकऱ्याकडे किती शेती आहे, कोणते पीक घेतो, कुतहल्या योजनांचा लाभ घेतला आहे, कुठले कर्ज आहे, आणि शेती साठी कोणती संसाधने उपलब्ध आहेत. या विषयी संपूर्ण माहिती जमा असेल. त्यामुळेच हे Farmer ID Card सरकारने बंधनकारक केले आहेत.
महत्वाचे बघा: शेततळे अनुदान योजना मार्फ़त 2025 मध्ये मिळणार Magel Tyala Shettale, असा करा अर्ज.
फार्मर आयडी महाराष्ट्र चे उद्दिष्ट
Farmer ID कार्ड ने शेतकऱ्याचे डिजिटलीकरण केले जाणार आहे. शेतकऱ्याची माहिती नेहमी नेहमी गोळा करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि संपूर्ण माहिती या Farmer ID मधेच मिळून जाईल. शेतकऱ्याला कुठल्याही योजनेचा अर्ज अतिशय सोप्या पद्धतीने मोबाईल वरूनच भरणे शक्य होईल.
नेहमी कुठल्या पण योजनेचा अर्ज भरायचे असले तर प्रत्येकवेडेला कागदपत्रे उपलोड कारवी लागतात, आता हे कार्ड आले तर नेहमी कागदपत्रे द्याचे काम देखील पडू नये. शेतकऱ्यांना सरकारी कर्ज अथवा अनुदान मिळण्यास सोयीस्कर होईल असे अनेक चांगले उद्दिष्ट ठेऊन Farmer ID आणण्यात आले आहे.
फार्मर आयडी कार्डचे फायदे
देशातील सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या नवनवीन योजनांचा लाभ घेणे सहज शक्य होईल. शेतकरी सुद्धा डिजिटल पद्धतीने पीक विमा आणि पीक कर्ज सारख्या योजना चा फायदा घेऊ शकते. शेतकऱ्याला शेतीला आवश्यक असलेले संस्थाने सहज मिळवता येऊ शकतील.
हवामानातील बदल आणि त्यानुसार पिकाची व्यवस्था कशी करावी लागेल याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार. सरकारी योजनांसाठी अर्ज करण्यासाठी नेहमी नेहमी अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करण्याची गरज पडणार नाही. पीएम किसान योजनांचे संपूर्ण हप्ते प्राप्त करता येईल.
महाडीबिडी मार्फ़त लाभ मिळणाऱ्या सर्व योजना या फार्मर आयडी कार्ड द्वारेच मिळणार. विविध क्षेत्रातील बाजारभावाची माहिती देखील शेतकऱ्याला वेळोवेळी मिळणार. अनुदान योजना, किसान सन्मान निधी, पीक विमा सारख्या योजनांचा लाभ Farmer ID असेल तेव्हाच मिळणार आहे. आणि डिजिटल इंडिया सोबत देशातील शेतकरी देखील डिजिटल बनेल.
फार्मर आयडी रजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्रे
फार्मर आयडी साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँकेचे खातेबुक, मोबाईल नंबर, मेल आयडी, 7/12 उतारा, सहीचा संपूर्ण तपशील, शेतकऱयांचे पासपोर्ट फोटो आणि अन्य काही कागदपत्रे आवश्यक लागणारी आहेत. हि सर्व कागदपत्रे असतील तरच तुमाला Farmer ID Card मिळू शकणार आहे.
फार्मर आयडी कार्ड रजिस्ट्रेशन ऑनलाइन
सर्वप्रथम मोबाईल वरून शेतकरी ओळखपत्र म्हणजेच Farmer ID Card काढण्यासाठी तुम्हाला सरकारची अधिकृत वेबसाईट agristack.gov.in याला गुगल मध्ये शेअरच करायचे आहे.
- नंतर तुमच्या पुढे साईटचा डॅशबोर्ड येईल, तेथे तुमच्याकडे जरcsc id व password असेल तर log in with csc या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- नंतर तेथे लॉग इन असा पर्याय दिसेल तेथे तुमचा csc पासवर्ड आणि आयडी टाकून लॉग इन करून घ्याचे आहे.
- नंतर तुम्हाला आधार कार्ड ऑथोराईस करायचे आहे, तेथे तुमचे आधारकार्ड नंबर टाकायचे आहे. जर आधार ला लिंक मोबाईल नंबर असेल तर तर तुमच्या मोबाईल ला एक otp येईल तो तेथे वाकून वारिफिकेशन करायचे आहे.
- नंतर तुमाला तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल टाकायचे आहे. प्रत एक otp येईल तोच टाकून व्हेरिफाय करा.
- नंतर फार्मर डिटेल टाकावे लगेल, तेथे तुमचं संपूर्ण व्यक्तीत माहिती भरायची आहे.
- नंतर पत्ता ची माहिती आणि शेतीची माहिती देखील भरायची असेल.
- अशाप्रकारे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा आणि काही आवश्यक कागदपत्रे अपलोड कारवी लागतील ते करा.
- शेवटी सर्व झाल्यावर सबमिट करता येईल. हा फॉर्म भरन झाल्यावर काही दिवसाने तुमचा अर्ज अप्रू केला जाईल आणि तुमच्या शेतकरी आयडी देखील तुम्हाला बघायला मिळेल.
निष्कर्ष
शेतकऱ्यांना अतिशय सुलभ असे Farmer ID Card राहणार आहे. त्यामार्फत सरकारच्या योजनांचा लाभ घेणे सोपे होईल आणि स्वतःचे उत्पन्न वाढवता येणार आहे. आपण सुद्धा जर शेतकरी असाल तर Farmer ID Card रजिस्ट्रेशन नक्की करा. जेणेकरून पीक विमा, अनुदान, कर्ज माफी सारख्या मोठं मोठ्या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येईल.
तुम्ही जर अजून सुद्धा शेतकरी ओळखपत्र खाढले नसेल तर लवकरात लवकर वरती सांगितलेला पद्धतीनुसार अर्ज करा आणि स्वतःचे ओळखपत्र मिळावा. जर ओंजळीने अर्ज करता असतांना कुठलीही अडचण येत असेल तर आम्हाला नक्की कंमेंट्स मध्ये सांगा आम्ही तुमच्या अडचणींचे निवारण नक्की करू, धन्यवाद.
FAQs
-
Que: फार्मर आयडी म्हणजे काय?
Ans- फार्मर आयडी हे एक आधार कार्ड सारखे ओळखपत्रच आहे, परंतु ते फक्त देशातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. म्हणून याला शेतकरी ओळखपत्र सुद्धा म्हंटले जाते. या ओळखपत्र वरून शेतकऱ्याला कुठल्याही योजनेचं लाभ घेता येणार आहे. नेहमी नेहमी योजनेचापूर्ण फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे हे फार्मर आयडी कार्ड नसेल तो सरकारी योजनांपासून वंचित राहील.
-
Que: शेतकरी नोंदणी अनिवार्य आहे का?
Ans- शेतकऱ्याला जर सरकारी सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे. अन्यथा, पीक विमा, पीक कर्ज माफी, आणि योजनांचा लाभ शेतकऱ्याला घेता येणार नाही, म्हणून शेतकरी नोंदणी करून फार्मर आयडी कार्ड काढणे अनिवार्य आहे.
-
Que: शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील?
Ans- जर शेतकरी ओळखपत्र काढायचे असेल तर तर तुम्हाला रजिस्टेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड,बँकेचे खातेबुक, मोबाईल नंबर, मेल आयडी, 7/12 उतारा , शेतकऱ्याचे पासपोर्ट फोटो आणि शेतकऱ्याचे स्वयंघोषनामात्र देखील लागणार आहे.
-
Que: शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे?
Ans- फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करण्यासाठी सरकारच्या अधिकृत साइट Agristack.gov.in या वर जावे लागेल. तिथे तुम्हाला आवश्यक सर्व माहिती भरावी लागेल आणि नोंदणी करावी लागेल.
-
Que: फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी कोणत्या वेबसाईट वर जावे लागेल?
Ans- जर शेतकरी रजिस्टरशान ऑनलाईन केले असेल तर खालील लिंक ला ओपन करून तुम्ही तुमचे फार्म आयडी कार्ड डाउनलोड करून घेऊ शकणार आहेत.
Farmer Id Download : Click Here