Free Tablet Yojana Maharashtra 2025: दहावी पास विध्यार्थ्यांना सरकार देणार मोफत टॅबलेट आणि सोबत 6GB नेट दररोज.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Tablet Yojana Maharashtra 2025: आजच्या आधुनिक युगात इलेकट्रीक उपकरणाचा वापर हा जास्तच होताना आपल्याला दिसतो आहे. आज आपण घरी बसून कुठलेही वस्तू एक मोबाईलच्या माध्यमातून ऑर्डर करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आता शिक्षणाने सुद्धा या डिजिटल आधुनिकीकरणामध्ये उडी घेऊन डिजिटल दुनियेत स्वतःचा सहभाग नोंदविला आहे.

covid च्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम सोबतच शिक्षणसुद्धा ऑनलाइनच घरी बसून करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता हे सर्व शक्य झालं ते फक्त या डिजिटल क्रांती मुळे. आर्थिक अडचणीमुळे त्यांचे पालक त्यांना त्या क्षेत्राकडे वाली देत नाहीत किंवा पालकांना याचा खर्च झेपावत नाही. मात्र आता दहावी पास झालेल्या विध्यार्थ्यांना काळजी करण्याची अजिबातच गरज नाही. कारण राज्यसरकार Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2025 राज्यभर राबवत आहेत. ज्याचे अर्ज आता सुरु झालेले आहेत.

Read Also: बेरोजगारी भत्ता योजना 2025। Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra

Free Tablet Yojana Maharashtra In 2025– मोफत टॅबलेट योजना मराठी

Free Tablet Yojana Maharashtra In 2025
Free Tablet Yojana Maharashtra In 2025

टॅबलेट सोबतच ऑनलाईन प्रशिक्षण आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रति दिवस 6GB नेट सुद्धा मोफत दिले जाणार आहे. ज्याचा फायदा मुलांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी होणार आहे. गरीब इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त प्रजाती मधील पालक हे मुलांच्या शिक्षणासाठी येवडा खर्च करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या मुलांना सुद्धा चांगले शिक्षण मिळावे.

त्यांचे मुलं/ मुली सुद्धा खूप शिकून डॉक्टर, इंजिनियर सारख्या मोठ्या पदावर पोहोचावे हा उद्देश समोर ठेऊन राज्यभर Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra प्रत्येक वर्षी राबविला जात असते. योजनेचे अर्ज भरणे सुरु झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख मुदतवाढ देऊन 20 जून 2025 करण्यात आली आहे. अर्ज केल्या नंतर कमाल 8 महिन्यांमध्येच टॅब वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे लवकर अर्ज करून योजनेसाठी पात्र व्हा आणि मोफत टॅब मिळवा.

Read Also: Free Laptop Yojana Maharashtra: विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप,हे लागणार कागदपत्र, लवकर करा अर्ज.

फ्री टॅबलेट योजनांचा उद्देश

🎯 राज्यातील आर्थिक बाबतीत कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET सारखया परीक्षेची तयारी करण्यास प्रोत्साहित करणे.

🎯 दहावी नंतर विज्ञान शाखेमदे प्रवेश घेऊन चांगला करियर मार्ग निवण्याची प्रेरणा देणे.

🎯 दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी मध्ये विज्ञान मध्ये प्रवेश घेतला आहे, त्यांना अभ्यास करण्यासाठी आणि ऑनलाईन कोचिंग साठी या योजनेमार्फ़त मदत करणे.

🎯 विद्यार्थ्यांना डिजिटल क्रांती मध्ये सहभागी करून घेणे.

🎯 लाभार्थ्यांचे या योजनेचा नंतर जीवनमान सुधारणे.

🎯 मुलांना डिजिटल शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करून, घरूनच शिक्षण प्रदान करणे.

🎯 बाहेर ठिकाणी कोचिंग साठी राहून विद्यार्थ्यांचा होणारा इतर खर्च वाचवणे.

Read Also: Best Post Office Scheme For Women In Marathi: महिलांसाठी पोस्ट ऑफिस च्या महत्वपूर्ण योजना

फ्री टॅबलेट योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी/ विद्यार्थिनी हि महाराष्ट्राची रहिवासी असावा.
  • अर्जदार हा इत्तर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती नाहीतर विशेष मागास प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदार नॉनक्रिमिलियर मधील असावा.
  • हि योजना 2025 या वर्षाकरिता राबविण्यात येत आहे त्यामुळे जे हि विध्यार्थी किंवा विद्यार्थीनी या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, ते या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. परंतु दहावी नंतर त्या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत पुरावा हा अर्ज सोबत अपलोड करावे लागेल.
  • अर्ज नंतर योजनेसाठी दहावीच्या गुणांनुसार आणि समांतर आरक्षणानुसार केली जाणार आहे.
  • अर्जदार जर ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल तर त्याला दहावीमध्ये 60% पेक्षा जास्त गन असणे आवश्यक असेल, जर भागातील असेल तर 70% गुणांपेक्षा जास्त गुण असायला हवे तेव्हाच करू शकता.

फ्री टॅबलेट योजनेचे फायदे

👍🏻 पात्र दहावी पास विध्यार्थ्याला एकदम फ्री एक टॅब दिला जाणार. विद्यार्थ्याला JEE/NEET/MHT-CET सारख्या मोठ्या परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण कोर्स सुद्धा मोफत मिळणार आहे.

👍🏻 ऑनलाईन परीक्षेची तयारी करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता राहणारच, त्याची सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे. दररोज 6GB हे दिले जाणार आहे.

👍🏻 स्वतःचा एकही रुपया खर्च न करता तुम्ही हा टॅबलेट मिळू शकणार आहेत.

👍🏻 मिळालेल्या टॅबलेट मधून तुम्ही ओनाईन प्रशिक्षणसोबत इतरही कामे करू शकता.

फ्री टॅबलेट योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

अनु. क्रकागदपत्रे
1)अर्जदाराची दहावीची गुणपत्रिका
2)अकरावी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा/ बोनाफाईड
3)अर्जदाराचे आधारकार्ड
4)रहिवासी दाखला/ डोमेसाइल
5)जातीचा दाखला
6)नॉनक्रिमिलियर प्रमाणपत्र
7)दिव्यांग असल्याचं त्याचे प्रमाणपत्र
8)अनाथ असल्याचे त्याचे प्रमाणपत्र

सामाजिक आरक्षण

प्रवर्ग आरक्षण टक्केवारी
1) OBC59%
2) VJ-A10%
3) NT-B8%
4) NT-C11%
5) NT-D6%
6) SBC6%

राखीव समांतर आरक्षण

1) प्रवर्गानुसार महिलांसाठी 30%
2) अनाथ विध्यार्थ्यांसाठी 1%
3) दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी 4%

अर्ज करण्याची शेवटची तारीख

आम्हाला मिळालेल्या अधिकृत जीआर च्या माहितीनुसार Free Tablet Yojana Maharashtra ची अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मे 2025 ठेवण्यात आली होती. मात्र हि योजना अधिकाधिक दहावी पास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नसल्याकारणाने अर्ज सुद्धा कमी आले होते. त्यामुळे सरकारने मुदत वाढ करून अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 जून 2025 केली आहे. या मुलांनी किंवा मुलीनी अजून अर्ज केले नसतील त्यांच्या साठी अजून एक चान्स दिला गेला आहे.

योजनेचे दिलेले काही नियम आणि अटी

  1. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज हा मुदतीच्या आतच करावा.
  2. पोस्टाने किंवा ई मेलने केलेल्या अर्जाला ग्राह्य धरल्या जाणार नाही.
  3. अर्ज स्वीकारण्याचे आणि पात्रता ठरवण्याचे सर्व अधिकृत अधिकार हे व्यवस्थांक व मह्ज्योतीचे संचालक यांच्याकडेच राहणार आहेत.
  4. अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक राहील.
  5. दहावी मध्ये नापास झालेले विद्यार्थी किंवा काही विषयात नापास झाल्यानं योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  6. अर्ज करत असतांना चुकीची माहिती भरली असता, त्याची सर्व जबाबदारी अर्जदाराचीच राहील.
  7. अर्ज फक्त विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच करावा, इत्तर शाखेतील अर्जदारांना अपात्र करण्यात येईल.

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्रसाठी असा करा अर्ज

  • महाज्योती योजनेच्या साईटच्या होम पेज वर MH-CET/JEE/NEET या परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी असा पर्याय बघायला मिळेल, त्यावर क्लिक करा .
  • आत्ता तुमच्यापुढे अजून एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल, त्यामध्ये Click Here For Registration हा पर्याय दिसेल त्यावर क्लीक करा.
  • आदी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्याचा आहे नोंदणी करायची आहे.
  • मग तुमच्यापुढे योजनेचा अर्ज येईल, त्यामध्ये आधी तुमची वयक्तिक माहिती भरावी लागेल.
  • नंतर तुमचे शिक्षणाची सर्व माहिती भरायची आहे. शेवटी कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी लागतील.
  • सर्व फॉर्म भरन झाल्यावर सबमिट बटनावर क्लीक करा.
  • आशा पद्धतीने महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा अर्जज तुम्ही मोबाईलवरून भरू शकता.

निष्कर्ष

महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण झालेल्या मुला, मुलींना मोफत टॅबलेट तर मिळणारच सोबत JEE/NEET सारख्या परीक्षांचा अभ्यास करून मेडिकल फिल्ड मध्ये करियर करायचे आहे, त्यांना ह्या परीक्षा क्रॅक करण्यासाठी मोफत पूर्ण प्रशिक्षण देण्याची हमी सुद्धा महाराष्ट्र शासनाने उचलली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दहावी पास विद्यार्थ्यांपर्यंत हि माहिती पोहोचवा. अशाच नवीन नवीन योजनेसाठी आम्हाला फोल्लो करा, धन्यवाद.

FAQs

Que: महाराष्ट्र सरकारकडून मोफत टॅबलेट कसा मिळवायचा?

Ans- मोफत टॅबलेट मिळवण्यासाठी राज्य सरकारची महाज्योती फ्री टॅबलेट योजना आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच योजनेअंतर्गत लाभ त्याच विद्यार्थ्यांना मिळतो ज्यांनी दहावी नंतर सायन्स अभ्यासक्रम निवडला आहे व त्यांना JEE/NEET/MH-CET सारख्या एक्सामची तयारी करायची असेल.

Que: महाज्योती टॅब्लेटसाठी कोण पात्र आहे?

Ans- नुकतेच 2025 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेले, OBC,VJ-A, NT-B, NT-C, NT-D आणि SBC प्रवर्गातील मुलं/मुली Free Tablet Yojana Maharashtra साठी पात्र आहेत. परंतु त्यांनी इयत्ता अकरावी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.

Que: महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची शेवटची तारिक?

Ans- फ्री टॅबलेट योजनेचे अर्ज भरणे सुरु झाले असून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार शेवटची तारीख हि 20 जून 2025 आहे.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

4 thoughts on “Free Tablet Yojana Maharashtra 2025: दहावी पास विध्यार्थ्यांना सरकार देणार मोफत टॅबलेट आणि सोबत 6GB नेट दररोज.”

Leave a Comment