Free Tokan Yantra Yojana: शेतकऱ्यांना टोकन यंत्रावर 10 हजाराचे मिळणार अनुदान, बघा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Tokan Yantra Yojana: आता पावसाळ्याचे दिवस सुरु झाले सोबतच पेरणीचे सुद्धा दिवस आले आहेत. पेरणी ज्या शेतकऱ्यांची वेळेवर होते, त्यांना वर्षभराचे व्यवस्थित नियोजन साधता येते. सोबतच भरघोस उत्पादन सुद्धा होते. मात्र गावामध्ये जा शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे, ते आधी स्वतःचे शेत पेरणी करून घेत असतात. त्यामुळे लहान आणि अल्पभूदारक शेतकऱ्यांना मात्र पेरणी करण्यासाठी विलंब होतो.

याचा तोटा त्यांच्या उत्पादनात होतो. तसेच कधी कधी तर पाऊस नसल्यामुळे आणि लेट पेरणी होते आणि तेव्ढ्याद पाऊस सुद्धा चाट मारतो. आणि मंग परत त्यांना पेरणी करावी लागते. अर्थात डबलचा खर्च होतो. अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊ नये, याकरिता राज्यशासनाने Free Tokan Yantra Yojana सुरु केली आहे.

Read Also: Pik Vima Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी खुशखबर..,पीक विमा जमा होण्यास सुरवात, बघा यादी मध्ये तुमचे नाव.

Free Tokan Yantra Yojana Maharashtra: फ्री टोकन यंत्र योजनेची संपूर्ण माहिती

शेतकरी बांधवांनो Free Tokan Yantra Yojana हि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत राबविली जाते. राज्यातील छोट्या आणि गरजू शेतकऱ्यांसाठी हि योजना कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण शेती करत असताना सर्वात महत्वाचा भाग हा पेरणीचा असतो. जर पेरणी हि वेळेवर आणि योग्य पद्धतीने झाली तर वर्षाच्या शेवटी उत्पादन सुद्धा तेवढेच चांगले होते. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण सोबत हि सुद्धा सुरु आहे. या योजनेमार्फत पात्र लाभार्त्याला जास्तीत जास्त 10 हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे.

Read Also: Free Kitchen Kit Yojana: बांधकाम कामगारांना मिळेल फ्री किचन किट आणि सुरक्षा किट, बघा संपूर्ण माहिती.

योजनेचा उद्देश

गरीब आणि अल्पभूदारक शेतकऱ्यांना या योजनेमार्फत आर्थिक मदत दिली जाईल. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत करणे. तसेच युवापिढी ला सुद्धा शेतीकरण्याकरता प्रोत्साहित होतील.

योजनेचे पात्रता निकष

शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराच्या स्वतःच्या नावाने शेती असावी. या आधी Free Tokan Yantra Yojana चा लाभार्थी नसावा. अल्पभूदारक शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.

लागणारे कागदपत्र

  • डिजिटल सातबारा उतारा
  • आठ- अ होल्डिंग उतारा
  • टोळकं यंत्राचा टेस्ट रिपोर्ट
  • यंत्राचे कोटेशन
  • विक्रेत्यांचे डिलरशिप असल्याचे प्रमाणपत्र

Read Also: Solar Favarni Pump Yojana 2025: शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदानावर सोलर फवारणी पंप, बघा योजनेची संपूर्ण माहिती.

पात्र झाल्यानंतर लागणारी कागदपत्र

  • ओरिजनल बिल
  • आरटीजीएस पावती
  • डिलिव्हरी चलान

योजनेचे फायदे

पहिला फायदा तर शेतकऱ्यांना या योजने मार्फत अनुदान स्वरूपात 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच लाभार्थी वेळेवर आपल्या शेतामध्ये पेरणी करू शकेल, दुसऱ्या वर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. मिळणाऱ्या टोकन यंत्राच्या साहाय्याने तूर, सोयाबीन, हरभरा सारख्या बियाणांची पेरणी एकटा शेतकरी करू शकेल.

अर्ज पद्धती

Free Tokan Yantra Yojana चा अर्ज शासनाचे अधिकृत पोर्टल महाडीबीटी पोर्टलवर भराव लागेल. त्यासाठी तुमचे त्या पोर्टलवर खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर तयार करून घ्यावे. पोर्टल वरती गेल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजना वर क्लीक करून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करतांना सोबतच कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. जेवहा तुम्ही पात्र व्हाल तेव्हाच सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

निष्कर्ष

आता टोकन यंत्राचे टेस्ट रिपोर्ट्स सुद्धा सप्लायर्स आणि विक्रेता देऊ करत आहेत. त्यामुळे गरज आहे ते अर्ज करण्याची आणि टोकन यंत्र घेऊन आपल्या उत्पादन वाढवण्याची, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment