Gai Gotha Yojana 2025: आता नेमकेच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. ज्याप्रकारे मानवाला राहण्यासाठी चांगले पक्के घराची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने जनावरांना सुद्धा एक पक्क्या छताची गरज हि पावसाळ्यात भासतेच असते. विशेषतः पाळीव प्राण्यांना. नुकतीच पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभर गायी, म्हशी, मेंढी, शेळी यांचे वाटप साठी अर्ज सुरु झाले होते.
योजनेअंतर्गत जर तुम्हाला मिळालेले किंवा तुमच्या जवळील गायी, म्हशी यांना ठेवण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत Gai Gotha Yojana 2025 राबविली जाते. या योजने अंतर्गत पात्र अर्जदारांना गोठा निर्मितीसाठी 100% अनुदानाची रक्कम दिली जाणार . या योजनेचे अर्ज भरणे सुरु झाले असून लवकरात लवकर अर्ज करून योजनेचे लाभार्थी बना.
कारण गायी किंवा म्हशी यांचे चांगले संगोपन केले तरच ते चांगले दूध देतील आणि तुमच्या उत्पादन वाढ होण्यास मदत होईल. प्राण्यांना विशेषतः पावसाळ्यामध्ये वेगळ्या वेगळ्या बिमाऱ्या येत असतात, त्यात जर त्यांना चांगला गोठा नसेल तर त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न सुद्धा तयार होण्यास वेळ लागणार नाही. सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आणि पैशाची आवक वाढवण्यासाठी हि योजना राज्यभर राबवत आहे.
Read Also: सरकार देणार कडबा कुट्टी मशीन साठी अनुदान,आत्ताच करा अर्ज। Kadba Kutti Machine Yojana 2025
Gai Gotha Yojana 2025 Maharashtra: गाय गोठा अनुदान योजना माहिती
आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकरी हे शेतीवरच अवलंबून असतात. कधी कधी अति पावसामुळे किंवा पाऊसच वेळेवर ना आल्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान होते. शेतकरी हा हवालदिल होऊन जातो. म्हणून राज्य सरकारने शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन तयार करून देण्यासाठी Gai Gotha Yojana 2025 आणली आहे. जी फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे.
या योजनेचा लाभ हा तुमच्याकडे असणाऱ्या गायी आणि म्हशींच्या संख्येनुसार दिला जाणार आहे. हि योजना अल्पभूदारक शेतकऱ्यांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि ते वाढवण्यासठीसाजही चांगली संधी आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील युवा पिढी सुद्धा दुग्ध व्यवसायाकडे वळून स्वतःचे करियर साठी चांगला पर्यंत तयार करू शकतात. गोठा बांधत असताना मनरेगा रोजगार हमी योजना मार्फत काम करून दिले जाणार आहे. Gai Gotha Yojana च्या लाभ हा तीन टप्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल.
योजनेतून मिळणारे अनुदान
1) किमान 2 आणि कमाल 6 गायी/ म्हशी साठी | 77,188 रुपयांचे अनुदान |
2) 6 किंवा त्यापेक्षा 18 पर्यंत गायी/ म्हशी साठी | 1,54,373 रुपयांचे अनुदान |
3) 18 पेक्षा जास्त गायी, म्हशी साठी | 2,31,564 रुपयांचे अनुदान |
गाय गोठा कसा असावा? (संपूर्ण आराखडा)
जर समजा तुमच्याकडे 2 ते 6 दरम्यान पाळीव जनावरे असतील तर 26.95 चौरस मीटर क्षेत्रफळाचा, 7.70 मीटर लांब आणि 3.50 मीटर रुंदी असलेला हवा. त्यामध्ये गव्हाण हि 7.7 मीटर × 2.2 मीटर × 0.65 मीटर आकार असलेली असावी. तसेच जनावरांचे मूत्र संचयटाकी हि 250 लिटर क्षमता असलेली बांधायला हवी. गुरांच्या पिण्याच्या पाण्याशी सुद्धा चांगली सोय व्हावी याकरिता किमान 200 मीटर क्षमतेची पाण्याची टाकी असणे बंधनकारक आहे.
Read Also: Jaltara Yojana Maharashtra 2025| जलतारा योजनासाठी अर्ज करा आणि 4800 रुपये मिळवा.
योजनेचे पात्रता निकष
👉 अर्जदार हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील असावा.
👉 भटक्या विमुक्त जमातीतील शेतकरी बांधवांना सुद्धा योजनेचा लाभ मिळतो.
👉 इत्तर दारिद्रयरेषेखालील कुटुंब सुद्धा योजनेसाठी अर्ज करू शकतात.
👉 महिलाप्रधान असलेले कुटुंब
👉 शारीरिक बाबतीत अपंग असलेले कुटुंब/ शेतकरी
👉 ज्यांनी भूसुधार योजनेचा लाभ घेतला ते सुद्धा अर्ज करू शकतात.
👉 वन अधिकाऱ्याकडून मान्यताप्रापत असलेले अनुसूचित जमातीचे किंवा इतर परंपरागत वन्य निवासी असलेले नागरिक, अधिनियम 2006 अन्वये पात्र व्यक्ती सुद्धा लाभ घेऊ शकतात.
👉 किमान अडीच एक्कर आणि कमाल पाच एकर शेत जमीन असलेल्या शेतकरयांना सुद्धा Gai Gotha Yojana 2025 चा लाभ घेता येतो.
गायी गोठा अनुदान योजनेच्या अटी
- छतविरहित गोठा निर्मितीसाठी अनुदान मिळवायचे असल्यास कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 50 फळझाडे लागवड केलेली असावी.
- छत असलेल्या गोठयासाठी अनुदान मिळवायचे असल्यास 50 पेक्षा अधिक फळ झाडे लावणे अनिवार्य राहील.
- जरा 100 दिवस अर्जदाराने सार्वजनिक कमी केले असल्यास त्याला छतसहित गाय गोठा अनुदानासाठी पात्र करण्यात येईल.
- योजनेचा लाभ घेण्याकरिता किमान दोन जनावरे असणे बंधनकारक राहणार आहे.
- पशुधन अधिकाऱ्याने पशुपालन करत असल्याचा दाखल दिलेला असावा.
- रोजगार हमीचे प्रमाणपत्र असायला हवे.
- गोठा निर्मितीसाठी जागेचा 7/12 उतारा आणि 8-अ जोडावे लागेल.
- तुमचा सरपंच किंवा पोलिसपाटलाचा रहिवासी दाखला लागेल.
- कुठल्याही राष्ट्रीयकृत बँक मध्ये अर्जदाराचे खाते असावे.
- ग्रामपंचायतीकडून तुम्हाला शिफारस पात्र देण्यात यावे.
- अर्जदाराला पशुपालनाचा सर्व ज्ञान असणे बंधनकारक आहे.
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
गाय गोठा अनुदान योजनेचे उद्देश
- पशु साठी एक उत्तम गोठा तयार करण्यासाठी अनुदान देऊन आर्थिक मदत करणे.
- शेतकऱ्याचा आर्थिक विकास होण्यासाठी गायी किंवा म्हशीचे दूध, गोबर आणि मूत्र विकून मदत होईल.
- राज्यातील तरुण शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे वाळण्यास प्रोत्साहित होतील तसेच इत्तर बेरोजगार नागरिक सुद्धा याकडे आकर्षित होऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध वयास मदत होईल.
- गोठ्यामुळे जनावरांचा हवा, ऊन, पाऊस आणि थंडी पासून संरक्षण करण्यास मदत करणे. ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि भरघोस दूध तुम्हाला मिळेल.
लागणारी अतिआवश्यक कागदपत्रे
अनु.क्र. | कागदपत्रे |
---|---|
1) | पशुपालक/ शेतकऱ्याचे आधारकार्ड |
2) | शेतकऱ्याचा रहिवासी पुरावा |
3) | जातीचा दाखला |
4) | असलेल्या जनावराचे टॅनिंग प्रमाणपत्र |
5) | कुटुंबाचे मनरेगाची ओळखपत्र, जॉब कार्ड. |
6) | स्वतःच्या जमिनीचा 7/12 उतारा , 8-अ आणि नमुना 9 चा उतारा |
7) | बँकेचे खातेबुक |
8) | ग्रामपंचायतीकडून मिळाले शिफारसपत्र |
9) | गोठ्यासाठी निवलेल्या जागेचा आराखडा सोबत ग्रामसेवकाचा फोटो, नरेगा तांत्रिक सहायक/ पशुधन विभाग पर्यवेक्षक, लाभार्थी सोबत सहीचा स्थळ पाहणीचा अहवाल. |
10) | अर्जदाराचा सुरु असलेला मोबाईल नंबर |
11) | स्वतःची मेल आयडी |
12) | पासपोर्ट फोटो |
13) | स्वयंघोषणापत्र |
योजना मंजूर नंतर चे स्वरूप
खालील प्रमाणे सांगण्यात आलेले सर्व फोटो हे तुमच्या संबंधित प्रस्तावासोबत सात दिवसात जमा करणे बंधनकारक आहे.
🟢 गोठ्यासाठी असलेल्या जागेमध्ये बांधकाम सुरु करण्याधीच त्या जागेचा फोटो काढून घ्या . नंतर ते अधिकाऱ्याकडे सबमिट केल्यावर तुमचा पाहायला टप्पा जमा होईल.
🟢 नंतर दुसऱ्या टप्प्यासाठी गाय गोठ्याचे काम सुरु असतांनाच फोटो काढून सबमिट करायचा असतो. ज्यामध्ये तुमच्या नियोजित जागेतच काम सुरु असल्याचे स्पस्ट ओळखला यायला हवे.
🟢 गोठ्याचे बांधण्याचं संपूर्ण काम पूर्ण होईल, तेव्हा एक शेवटचा फोटो हा संबंधित अधिकाऱ्यांसोबत काढावा लागणार आहे. तेव्हा तुम्हाला तिसरा टप्पा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार.
गाय गोठा अनुदान योजनेची अर्ज पद्धती
सध्या राज्यसरकारने Gai Gotha Yojana साठी अर्ज सुरु केले आहेत. त्यासाठी सरकारने फॉर्म भरण्याच्या दोन पद्धती दर्शविल्या आहेत. एक ऑनलाईन आणि दुसरी ऑफलाईन पद्धतीने शेतकरी आणि अर्जदार हे अर्ज करू शकतात.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही ज्या गावामध्ये राहता तेथील ग्रामपंचायत मधून योजनेचा फॉर्म घेऊन तिथेच भरून सर्व कागदपत्रांसह ग्राम सचिवाकडे सबमिट करावा लागणार आहे.
जर ओनलाईन पद्धतीने घरी बसून लाभ घ्यायचा असेल तर सरकारच्या अधिकृत साईट वर जाऊन तुम्ही ओनलाईन फॉर्म भरू शकता आणि तुमचे कागदपत्रे देखील अपलोड करू शकता. त्यासाठी पाहिलं Apply या बटनावर क्लिक करा.
Gai Gotha Yojana 2025 | Onlline Apply |
निष्कर्ष
राज्यसरकारने अप्लभुदर शेतकऱ्यांचा विकास होण्याकरिता, नवीन उत्पनाचे साठां तयार करून देण्याकरिता हि योजना सुरु केली आहे. जी शेजाऱ्यांना अतिशय लाभदायक ठरणारी आहे. दरवर्षी लाखो शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या जनावराचे संरक्षण करतात. ते सुद्धा कुठलेही जवळचे पैसे खर्च न करता. तुम्ही सुद्धा पशुंपालन करत असाल तर हि या वर्षीची एक चांगली संधी तुमच्यासाठी धावून आली आहे.
FAQs
-
Que: गाई गोठा योजना म्हणजे काय आणि या योजनेअंतर्गत कोणती मदत मिळते?
Ans: जर तुम्ही शेतकरी आहेत आणि सोबतच पशुपालन सुद्धा करत असाल, परंतु तुमच्या पशूंसाठी एक चांगला गोठा तुमच्याकडे नसेल तर हि गे गोठा अनुदान योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेमार्फ़त सरकार तुम्हाला अनुदानावर गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणार आहे.
-
Que: गोठ्याचे कोणते प्रकार आहेत?
Ans: पशुपालन करत असाल तर गोठ्याचे दोन प्रकार ,माहित असणे आवश्यक आहे. एक गोठा असतो मोकळा निसर्गरम्य वातावरणाचा तर दुसरा प्रकार म्हणजे पारंपरिक गोठा . त्यावरती छत निर्माण केलेली असते.
-
Que: गाय गोठा योजनेचा अर्ज कुठे करावा?
Ans: सध्या सरकारकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. जर ऑनलाईन करायचा असेल तर त्याची लिंक वरती आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
गाय कोठा
गाय जनावर कोठा
5
जनावर
जनावरा साठी कोठा
5 गाय व 1म्हैस यांच्यासह 2बैल यांच्यासाठी गोठा बांधकाम करायचे आहे.
5 गाय व 1म्हैस यांच्यासह 2बैल यांच्यासाठी गोठा बांधकाम करायचे आहे.
आमच्या गोठ्यातील 2गायच्या बछड्याला बिबट्या ने खाली आहे.
आमच्या गोठ्यातील 2गायच्या बछड्याला बिबट्या ने खाली आहे.
आमचे अजूनही पैसे जमा झाले नाही
आमच्या 2 गाई आणि 2 म्हैस आणि त्याच्या 3 वासरांनसाठी गोठा बांधकाम करायच आहे.
तरी लवकरात लवकर आपली मदत मिळावी