आता विधानसभेमध्ये अधिवेशन सुरु आहे. दोन दिवस आदीच वर्ष 2025 चा आर्थिक बजेट सुद्धा राज्यचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांनी प्रस्तुत केला आहे. त्यावरती संपूर्ण राज्याचे लक्ष होते. राज्यात पंतप्रधान ग्रामीण आवास योजना हि चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे.
परंतु मागील सात वर्षांपासून घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रुपयाचेचे अनुदान दिले जात होते. आजकालची महागाई बघता सडे घर जरी बनवतो म्हटले तरी सुद्धा या रकमे मध्ये होणे शक्यच नाही आहे. हीच बाब लक्षण घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनुदानात 50 हजाराची वाढ करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळं चांगले घर बांधण्यासाठी थोडी अधिक मदत होणार आहे.
राज्यामध्ये नवीन 20 लाख घरकुले मंजूर
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत या वर्षी सुद्धा नवी 20 लाख घरकुले मंजूर करण्यात येणार आहेत. मागील 45 दिवसामध्ये ज्या नागरिकांनी अर्ज केले त्यांपैकी 100% अर्ज मंजूर करून सरकारने मोठा विक्रम घडवला आहे.
आतापर्यंत दहा लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये योजनेच्या पहिला टप्प्याचे पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले आहेत. बाकीचे जे दहा लाख आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकर पहिला टप्पा जमा करण्याचे संकेत सुद्धा सरकारने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने या पुढील वर्षाकरिता सुद्धा 20 लाख घरकुल निर्माण करण्याचे धोरण अर्थसंकल्पात सुद्धा जाहीर केले आहे.
Read Also: Aadhar Card Update करणे झाले सोपे, अश्याप्रकारे घरी बसून मोबाईल वरून करा उपडेट
असा होणार अनुदान वाढीचा फायदा
महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशामध्ये महागाई ने उच्चांक गाठला आहे. आणि आदी घरकुल योजनेमार्फ़त फक्त 1 लाख 20 हजार रुपयेच दिले जात होते. त्यामुळे आजच्या दिवशी एवढ्या रिकामे मध्ये चांगले पक्के घर बंधने शक्यच नाही आहे. परंतु आता अनुदानाची रकम वाढवल्याने एक राहण्यायोग्य घर बांधण्यास मदत होणार आहेत.
घरकुलाबाबतचे विशेष बदल
- ज्या ग्रामीण भागातीलव्यक्तीने अर्ज तर केला आहे मात्र तिथे त्याला घर बांधण्यासाठी जागा नाही आहे, त्यांना आता सरकार 50 हजाराच्या वाढी ऐवजी 1 लाख रुपये वाढीव रक्कम देणार आहे. ज्यामुळे अर्जदाराला नवीन जागा घेण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे.
- जर अर्जदाराने शबरी आवास योजनेकरिता अर्ज केला असेल आणि तो पात्र झाला असेल तर त्याला शबरी आवास योजनेअंतर्गत आता 2 लाख 50 हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे.
- प्रधानमंत्री आवास योजनेचं जो लाभ मिळतो आहे, त्यात सुद्धा वाढ करून 2 लाख 10 हजार रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि लवकरच अमलात देखील आणण्याचा विचार सुरु आहे.
निष्कर्ष :
स्वतःचे घर असणे किती महत्वाचे असंते हे आपणास चांगलेच माहित आहे. त्यामुळे गरीब ग्रामीण भागातील नागरिकांनाच विचार करून सरकारने घरकुल योजनेमार्फ़त मिळणाऱ्या लाभाच्या रकमेत वाढ केली आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि स्वतःचे पक्के घर बनवा.