जननी सुरक्षा योजना माहिती मराठी 2025| Janani Suraksha Yojana In Marathi

जननी सुरक्षा योजना माहिती मराठी मधे मिलने जरा कठीणच आहे. त्यामुळेच मराठी जनतेकडे ही योजना पूर्णता पोहचत नहीं आहे. मग योजनेचा लाभ घेणे तर दूरच राहते. थोडक्यात जननी सुरक्षा योजना हि गर्भवती महिलांकरिता सुरु केलेली एक प्रकारची मदतच आहे. हि योजना केंद्र सरकारच्या विध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात देखील राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने महिलेच्या प्रसूतीच्या तसेच बाळ जन्माला आल्यानंतर देखील त्या महिलेला आर्थिक मदत केली जात असते. जरा आपणाला या योजनेही लाभ घ्यायचा असेल तर संपूर्ण माहिती वाचावी. कारण आपण या आर्टिकल मध्ये जननी सुरक्षा योजना माहिती मराठी मध्ये विस्तारपूर्वक बघणार आहोत.

त्यामध्ये हि योजना कोणासाठी आहे? कोणती महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकते? योजनेचे प्रत निकष काय? लाभ घेण्याकरिता कोणते कागदपत्रे लागतील? तसेच योजनेच मागचे उद्दिष्ट आणि योजनेचा फॉर्म कसा भाराचा याची देखील माहिती बघणार आहोत.

हे सुद्धा बघा: Lakhpati Didi Yojana In Marathi। महिलांना मिळणार 5 लाख रुपये, लखपती दीदी योजनासाठी असा करा अर्ज

गर्भवती महिलांसाठी जननी सुरक्षा योजना माहिती मराठी- Janani Suraksha Yojana Information In Marathi

भारत सरकारची अतिशय महत्वाची योजना जननी सुरक्षा योजना हि आहे.ज्या मुले फक्त शहरी भागातीलच नाही तर ग्रामीत भागातील मागास महिलांना देखील या योजनेचा लाभ घेऊन सरकार कडून आर्थिक मदत घेता येणार आहे. हि योजना भारत सरकारने 12 एप्रिल 2005 रोजी संपूर्ण देशात राज्य आणि केंद्रशासित देखील सूरु केली होती.

पहिल्याच वर्षी हजारो महिलांनी या योजनेचा लाभ देखील घेतला होता. तेव्हापासून आत्तादेखील हि योजना नेशनल हेल्थ मिशन द्वारा देशभर राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे बाळ मृत्यू दर तर कमी झालाच आहे सोबतच सुरक्षित माता राहण्यासाठी देखील योजना सार्थक ठरलेली दिसते आहे. या योजनेने गर्भवती महिलेचे संपूर्ण टेस्ट, लागलेली सुविधा आणि गोळ्या औषधें देखील आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येत असते. जर ती महिला खेड्या असेल तर तेथे नियुक्त करून दिलेली आशा हि त्या महिलेपर्यंत सुविधा पोहोचवण्यास समर्थ असते.

हे सुद्धा बघा: Shravan Bal Yojana Form भरण्याकरिता लागणारे Documents आणि संपूर्ण Information In Marathi

योजना सुरु करण्यामागील उद्दिष्ट

सरकारचे जननी सुरक्षा योजना सुरु करण्या मागील उद्दिष्ये कोणती आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती मराठी मध्ये आपण खालील प्रमाणे बघुयात.

  • इथून वीस वर्ष आधी अधिकतर गर्भवती महिलां बाळाला जन्म ह्या घरीच देत असायच्या. त्यामुळे बाळा सोबतच त्या महिलेच्या जीवाला देखील धोका होऊ शकत होता. त्यामुळेच मातामृत्यूदर कमी करण्या करीत आणि वेळेवर उपचार होण्याकरिता सरकारने जजानी सुरक्षा योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
  • जर ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांपर्यंत सुविधा पोहोचल्या नाही तर बालकाचा मृत्यू हा पोटामध्येच होत होता. सोबतच त्या स्त्रीला देखील अतिशय वेदनांचा सामना करावा लागत होता. परंतु सरकाने हि योजना सुरु केली आणि बालकाचा मृत्युदर कमी कमी करण्या करीत सुविधा पुरवण्यात आल्या.
  • जननी सुरक्षा योजना हि देशातील गर्भवती महिलांना आर्थिक प्रोत्साहन देऊन जुन्या पद्धतणीने घरघुती बाळंतपण रोकण्यासाठी सारखाच हा प्रयत्न आहे. त्यामुळे आई आणि बाळाचे जीवन देखील सुरक्षित राहतील.

योजने मार्फत मिळणार ह्या प्रकारचा लाभ

जननी सुरक्षा योजना ही भारतातील सर्व महिलांसाठी अतिशय महत्वाची योजना मानली जाते. हि योजना गर्भवती महिला तसेच बाळांच्या आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे. योजनेचा लाभ दोन भागामध्ये मिळणार आहे. शहरी भागातील गरोदर महिलांना वेगळा आणि खेडेगावातील गरीब महिलांना देखील मिळणार आहे.

ग्रामीण भाग: घरामीं भागातील गर्भवती महिलांना 2000 रुपये मदत मिळणार आहे. त्यामधील 600 रुपये हे त्या ठिकाणावरील आशा सेविकेला मिळणार आहे.

शहरी भाग: शहरी भागातील गर्भवती महिलांना 1200 रुपये सरकार कडून मदत मिळणार आहे, त्यामधील 200 रुपये हे तेथील आशा सेविकेला मिडेल. अर्थात गर्भवती महिलेला 1000 रुपये मिळणार आहे.

शास्त्रकिया लाभ: गर्भवती महिलेला जर सरकारी हॉस्पिटल मध्ये काहीही शस्त्रक्रिया करायचे काम पडले असेल तर त्यासाठी देखील 1500 रुपये आर्थिक मदत जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता निकष

  • दारिद्र रेषे खालील सर्व गर्भवती महिला पात्र असतील.
  • मागासवर्गीय महिला जसे कि अनुसूचित आणि जमातीतील गर्भवती महिला ह्या दारिद्र रेषेखालील नसल्या तरी त्या जननी सुरक्षा योजनेकरिता पात्र राहतील.
  • महिलेचे वय हे नोंदणी करते वेळी 19 पेक्षा कमी असू नये.
  • महिला या योजनेचा लाभ दोन अपत्य पर्यांतच घेता येऊ शकतो.

योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करावा लागेल

जननी सुरक्षा योजना चा अर्ज जास्ती तर महिला ह्या ऑफलाईन च भारत असतात. आपल्याला जर त्याच प्रकारे भरायचा असेल तर सर्वप्रथम. सेतू मधून तुमाला एक अर्ज विकत आणावा लागेल अथवा अंगणवाडी केंद्रात जाऊन सुद्धा मिळवू शकता. त्या मध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे गोळा करून अर्ज ना चुकता पूर्ण भरावा लागेल. नंतर सर्व कागदपत्र त्या अर्जासोबत जोडून आरोग्य केंद्रामध्ये किव्वा अंगणवाडी केंद्रामध्ये देखील सबमिट करता येणार आहे.

Leave a Comment