कांदा रोजच्या जेवणात भारतातील लोक वापर असतात. कांद्याला जीवनावश्यक वस्तू मध्ये सुद्धा गणले तरी वावगे ठरणार नाही. कधी कांद्याचे भाव हे गगन भरारी घेतात तर कधी कधी मात्र मातीमोल भावाने सुद्धा कांडा शेतकऱ्यांना विकावा लागतो, जे आपण अनुभवलेच असेल.
कांद्याचे पीक काढल्यानंतर त्या पिकाचे संरक्षण करणे सुद्धा महत्वाचे असते. आजकाल ऋतू सुधास्तीर राहिलेले नाही आहे, कधी पावसाळ्यात पाऊस येते तर कधी हिवाळ्यात ऊन तापते. ज्यामध्ये मात्र भरडला जातो ते गरीब आणि मेहनती शेतकरी.
Kanda Chal Anudan Yojana या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी कांद्याला पाऊस, ऊन, हवा, यांपासून संरक्षित ठेऊ शकतो. तर चला मग बघूया नेमकी कांदाचाळ अनुदान योजना काय आहे आणि अधिकृत प्राप्त झालेली संपूर्ण माहिती.
हे सुद्धा वाचा: मागेल त्याला विहीर योजना मार्फत मिळणार 5 लाख रुपये अनुदान। Magel Tyala Vihir Yojana साठी असा करा अर्ज.
Kanda Chal Anudan Yojana 2025 Maharashtra: कांदा चाळ अनुदान योजना संपूर्ण माहिती मराठी
काढायचे पीक उत्पादन घेतल्यानंतर त्याला ठेवण्यासाठी काथ्याची किंवा बांबूची एक झोपडी बनवली जात असायची. आपल्याला तर माहीतच असेल जेव्हडी काळजी पीक जमिनीमध्ये असते तेव्हा करावी लागते तेवढीच हे कांदा पीक काढल्यानंतर घ्यावी लागते.
कारण कांद्याला ना जास्त ऊन चलन ना पाणी. कांद्याला जर पाणी लागले तर कांडा लवकरच सडून जातो आणि जर एक कांडा सडला तर तो सर्वच कांद्याला सडवतो असतो. अर्थातच इत्तर पिकांच्या तुलनेमध्ये कांद्याची जरा जास्तच जमवणूक करावी लागते.
कधी कधी कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याला दिवसेंदिवस कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजन करावे लागते. शेतकऱ्याचा जो जुना झोपडी बनून ठेवायचा जुगाळ होता तो जरा जास्त हवा, पाणी आले तर निस्तानाभूत होत होता. म्हणूनच शासनाने एक कांद्यासाठी मजबूत आणि पक्का असा निवारा तयार करण्यासाठी Kanda Chal Anudan Yojana 2025 सुरु केली.
ज्याचा लाभ घेऊन किती हि दिवस तुमचे कांदे सुरक्षित ठेवता येऊ शकतील. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन जवळपास 1,60,000 रुपयांचे अनुदान पात्र शेतकऱ्यांना देणार आहेत. एकदा का तुमची चाल उभी झाली कि, जेव्हा हि भाव वादळे तेव्हा कांडा विकून चांगला भाव मार्केट मधून मिळवून घेऊ शकता.
हे सुद्धा वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकार फळबागेसाठी देणार 100% अनुदान। Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana
कांदाचाळ अनुदान योजनेचा उद्देश
- कांद्याच्या साठवणुकीत पावसामुळे किंवा अटी उष्णतेमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान होते ते कमी करण्यास मदत व्हावी.
- कांद्याचे हवा, पाणी, उन्हापासून संरक्षण करणे.
- कांद्याचे भाव वाढे पर्यंत आणि चांगला महाग भाव मिळेपर्यंत कांद्याला निकोप ठेवण्यास शेतकऱ्याला मदत या योजनेमार्फत सरकार करणार आहे.
कांदा चाळ योजनेची पात्रता
- Kanda Chal Anudan Yojana साठी पात्र फक्त कांदा उत्पादक शेतकरीच असणार आहेत.
- जमिनीच्या 7/12 व 8-अ वरती अर्जदार शेतकऱ्याचे नाव नोंदणीकृत हवे.
- अर्जदाराच्या 7/12 वर कांदा पिकाची नोंद असणे असावी.
- तसेच वास्तविक शेतकरी कांदा पीक उत्पादक असणे सुद्धा आवश्यक आहे.
कोणाला मिळेल योजनेचा लाभ
अनु. क्र. | पात्र लाभार्थी |
---|---|
1) | कांद्याचे पीक घेणारे शेतकरी |
2) | शेतकरी/ स्वयंसहायता गट |
3) | कांदा शेतकरी महिला गट |
4) | शेतकरी उत्पादक संघ |
5) | नोंदणीकृत शेतकरी संस्था |
6) | शेतकरी सहकारी संस्था |
7) | सहकारी संघ |
योजनेमात मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप
कमीत कमी 5 मेट्रिक टन आणि जास्तीत जास्त 25 मेट्रिक टन क्षमतेसाठी कांद्याची लाच निर्माण करण्यासाठी येणाऱ्या ऐकून खर्चाच्या 50% रक्कम Kanda Chal Anudan Yojana अंतर्गत दिली जाणार आहे. म्हणजे या योजनेमार्फत सरकार 50% अनुदान पात्र शेतकऱ्याला मिळणार. अधिकृत प्रसारीत केलेल्या जी- आर अनुसार 3500/- रुपये प्रति मॅट्रिक टन अनुदान वाटप केले जाते.
कांद्याची चाळ उभारणी करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतरंगात मजूर लावावे लागते. त्याची मजुरीचा सर्व खर्च हे सरकारच देणार आहे. आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मजुरांसाठी 96 हजार 220 रुपये दिले जातील, तर 64 हजार 150 रुपये हे कांदाचाळ साठी लागणाऱ्या मटेरियल करीत मालकाच्या खात्यात महाडीबीटी द्वारे जमा केले जाते.
हे सुद्धा वाचा: पोखरा योजना महाराष्ट्र मार्फत मिळणार 100% अनुदान: Pokhara Yojana Maharashtra
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
अनु. क्रमांक | कागदपत्रे |
---|---|
1) | शेतकऱ्याचे आधारकार्ड |
2) | शेताचा सातबारा उतारा आणि आठ-अ |
3) | आधरसोबत लिंक असलेल्या खातेबुक ची झेरॉक्स |
4) | अर्जदार अनुसूचित जातीतील असेल तर जातीचा दाखला |
5) | नमुन्यातील हमीपत्र (२ ) |
कांदाचाळ अनुदान योजनेचे फायदे
- कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोक्यावरील ताण कमी होईल.
- शेतकऱ्याचा कांदा सुरक्षित आणि बेदाग राहील.
- शेतकऱ्याच्या कांद्याला पाउसापासून वाचवण्यासाठी अधिक कष्ट करायची गरजच पडणार नाही.
- कमी जागेच जास्त कांदा आणि सुरक्षित राहू शकेल.
- कमी खर्चात एकदम चांगले चाळ मंचांग बांधता येते.
- कांद्याचे नुकसान होणार नाही.
- शेतकरी चांगला भाव घेऊ शकेल.
- कांद्याचे चांगले उत्पन्न होईल, पैसा अधिक दिसेल आणि शेतकरी सुखी आणि समृद्ध बनेल.
Kanda Chal Anudan Yojana 2025 Apply Online- अर्ज प्रक्रिया
कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज हे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतो.
- जर का तुम्हाला कांदा चाळ योजनांचा ऑनलाईन अर्ज भरायचा असेल, तर गुगल वर महाडीबीटी पोर्टल ओपन करावे लागेल. तुमचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारआहे.
- नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करून स्वतःची नोंदणी करून घेऊ शकता.
- नंतर योजनेचा अर्ज भरण्यासाठी आदी तुम्हाला लॉग इन करावे लागेल.
- तुमचा आयडी आणि पास वर्ड टाकून लॉग इन झाल्यावर तुमच्या पुढे येक नवीन डॅशबोर्ड येईल, त्यामध्ये अर्ज करा असं पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लीक करा.
- पार्ट तुमच्या पुढे शेतकरी योजनांच्या काही याद्या येतील, त्या पैकी चार नंबरचा पर्याय फलोत्पादन वर क्लिक करा.
- नंतर तुमच्या पुढे काही महत्वपूर्ण रकाने येतील, त्या मध्ये व्यवस्तिथ वाचून आणि समजून माहिती भरणे गरजेचे आहे. नाहीतर तुमची एक चूक कांदा चाळ योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू शकते.
- तसेच तुम्हाला तुमच्या उत्पन्नासाठी किती मॅट्रिक टन क्षमतेची कांदा चाळ आवश्यक आहे, ते सुद्धा इथेच निवडावे लागेल.
- खाली जतन करा असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून पुढील प्रक्रियेवर जायचे आहे.
- पुढील टप्पा हा पेमेंट्सचा असेल. जेव्हा अर्ज सबमिट होतो त्या नंतर मागे येऊन परत अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा.
- खाली मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला Kanda Chal Anudan Yojana ची फी 24 रुपये टाकावी लागेल.
निष्कर्ष
या आर्टिकल मध्ये कांडा चाल अनुदान योजनेसाठी लागणारे कागद्पत्रापासून ते ऑनलाईन अर्ज कसा करायचा, इथपर्यंत संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये बघितली आहे., धन्यवाद.
FAQs
-
Que: कांदा चाळ उभारणीसाठी कोणत्या अनुदान योजना आहेत?
Ans- जर का तुम्ही शेतकरी असाल आणि कांद्याचे उत्पादन घेत असाल तर सरकारच्या कांदा चाळ अनुदान योजनाअंतर्गत कांदा चाल उभारणीसाठी सरकारकडून 50% अनुदान मिळवू शकता.
-
Que: कांदाचाळ अनुदान योजनांसाठी कोणती कागदपत्रे लागते?
Ans- योजनेचा अर्ज भरतांना शेतकऱ्याचे आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ-अ, बँक खात्याची झेरॉक्स, नमुनामधील हमीपत्र, अनुसूचित जाती मध्ये मोडत असेल तर जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
-
Que: कांदा चाळ अनुदानासाठी अर्ज कुठे करावा ?
Ans- कांदा चाळ साठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडीबीटी पोर्टल वरती करू शकता. जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुमच्या तालुक्याच्या कृषी विभागात संबंधित कार्यालयात अर्ज भरू शकता.