Ladki Bahin Binvyaji Karj Yojana: लाडक्या बहिणींना मिळणार 1 लाख रुपयाचे कर्ज, बघा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Binvyaji Karj Yojana: राज्यसरकार तसेच केंद्रसरकार सुद्धा राज्यातील महिलांना आर्थिक बळकट करण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे त्यापैकीच एक योजना आहे. ज्या अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना प्रति माह आर्थिक मदत दिली जाते. आता आणखी एक खुशखबर लाडक्या बहिणींसाठी राज्यसरकार घेऊन आले आहे. ते म्हणजे Ladki Bahin Binvyaji Karj Yojana होय. या योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे.

Read Also: Mofat Gas Cylinder Yojana: आता फक्त याच महिलांना मिळणार वर्षाला 3 सिलेंडर मोफत, नवीन नियम लागू.

Ladki Bahin Binvyaji Karj Yojana 2025: लाडकी बहीण बिनव्याजी कर्ज योजना काय आहे?

मागील दोन दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांना 1 लाख रुपयाचे कर्ज मिळणार असल्याची माहिती भाजप नेते प्रवीण दरेकर साहेबांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. ज्यामुळे राज्यातील सर्व महिला ह्या अतिशय णानदी आणि उतसाहित आपल्याला दिसल्या.

परंतु आपणास सांगू इच्छितो कि, Ladki Bahin Binvyaji Karj Yojana हि राज्यातील संपूर्ण लाडक्या बहिणींसाठी नसून ज्या लाडक्या बहिणी ह्या मुंबईमध्येच वास्तव्य करतात त्यांच्यासाठीच आहे. या योजनेचा लाभ हा उद्योजिका बानू इच्चीणाऱ्या लाडक्या बहिणींना दिला जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. मुंबई मधील मुंबै बँकेमार्फत हि योजना राबविली जाणार आहे. तसेच मुंबै बँकेचे अध्यक्ष सुद्धा प्रवीण दरेकर साहेबच असल्यामुळे त्यांनी या योजनेची घोषणा केली आहे.

योजनेचे उद्देश

इतर राज्यतील नागरिक मुंबईत येऊन मोठे उद्योजक बनले आहे. आता वेळ आहे आपल्या राज्यात आपण स्वतः उद्योजक बनण्याची, या अनुषंगाने ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना हि संधी देऊन आपल्या मुंबईमध्ये अधिकाधिक अधिक उद्योजिका निर्माण करण्याचे उद्देश शासनाचे आहे.

योजनेचे पात्रता निकष

ज्या लाडक्या बहिणी मुंबईच्या रहिवासी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्जदार महिलांचे मुंबै बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. तसेच ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचं लभ मिळतो त्याच महिला Ladki Bahin Binvyaji Karj Yojana साठी पात्र असतील. महिलांचा एक गट सुद्धा योजनेसाठी अर्ज करू शकेल.

आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँकेचे खातेबुक
  • पासपोर्ट फोटो
  • सुरु मोबाईल नंबर
  • स्वयंघोषणापत्र

योजनेचे फायदे

पहिला सर्वात मोठा फायदा म्हणजे 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळेल. पात्र लाडक्या बहिणींना जास्त कागदपत्रे गोळा करण्याची आवश्यकता नाही. योजनेअंतर्गत कर्ज मिळवून लाडक्या बहिणी स्वतःचा छोटा उद्योग सुरु करू शकतात, ज्यामुळे त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा मिटेल. जास्तीत जास्त महिला उद्योग क्षेत्रांकडे येण्यास प्रोत्साहित होतील.

असा करा योजनेचा अर्ज

तुम्ही जर मुंबई मध्ये राहत असला आणि तुम्हाला उद्योगाचा स्वतःचा ब्रँड उभा कार्याचा असेल तर हि संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. योजेचा अर्ज करण्यासाठी तुम्हला मुंबईच्या मुंबै बँकेमध्ये जाऊन अर्ज करता येणार आहे. सोबत सांगण्यात आलेले कागदपत्र सबमिट करावयाचे आहेत. जर तुम्ही पात्र झालात तर तुमच्या मुंबै बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट रक्मम जमा केली जाईल.

निष्कर्ष

मुंबई मध्ये वाढते बेरोजगारीचे प्रमाणावर हा एक जालीम उपाय हि योजना सुद्धा ठरू शकते. Ladki Bahin Binvyaji Karj Yojana ची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघितली आहे. मुंबैती लाडक्या बहिणींनी नक्की या योजेचा लाभ घेऊन उद्योगाकडे वाटचाल करावी,धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

2 thoughts on “Ladki Bahin Binvyaji Karj Yojana: लाडक्या बहिणींना मिळणार 1 लाख रुपयाचे कर्ज, बघा संपूर्ण माहिती”

Leave a Comment