Ladki Bahin Yojana June Installment: लाडक्या बहिणींच्या खात्यात जून चा हप्ता जमा, तुमचे आले नसेल तर करा हे काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana June Installment: आता पावसाळा लागला आणि शेतीचे काम सुरु झालेत त्यामुळे राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे तरी जून मधेच येतील अशी अपेक्षा होती.

मात्र सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे या महिन्याला सुद्धा लाडक्या बहनीला 12 हप्त्याचे पैसे हे जुलै महिन्यातच मिळणार आहे. त्यासाठी राज्यसरकारने महिला व बालविकास विभागाला निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Read Also: Mahila Startup Yojana: व्यवसाय करण्यासाठी महिलांना मिळणार 25 लाखापर्यंत कर्ज, अर्ज झालेत सुरु.

Ladki Bahin Yojana June Installment Maharashtra: लाडकी बहिणीचे पैसे जमा होण्यास होणार सुरुवात

आज विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत कि, “लाडकी बहिणींना जून महिन्याच्या हप्त्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला असून उद्यापासून राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये यांचे वितरण करण्यात येणार आहे”.

सोबत त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केले आहे कि, सरकारने जून महिन्याचा हप्त्यासाठी 3,600 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. ज्यामुळे ज्या महिला सर्व पात्रता निकषांमध्ये बसल्या असतील त्यांनाच जून महिन्याचा लाभ मिळणार आहे. अजित पवारांच्या या घोषणे नंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी ह्या अतिशय उताराही आणि आनंदी झाल्या आहेत.

या महिलांना नाही मिळणार जूनचा हप्ता

मागील महिन्याचा जो मे महिन्याचा लाभ देण्यात आला त्यामध्ये असे निदर्शनास आले आहेत कि, सरकारी नौकरीवर रुजू असलेल्या महिलांनी सुद्धा माझी लाडकी बहीण योजनाचा अर्ज भरले आहेत आणि दार महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होतो.

त्यामुळे महिला व बाल विकास विभाग ऍक्टिव मोड मध्ये आले आणि सर्व अर्जाची परत एकदा छाननी सुरु केली आहे. ज्या महिला सरकारी नौकरी करतात किंवा ज्यांचे वार्षिक उत्पादन हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना मात्र आता Ladki Bahin Yojana June Installment मिळणार नाही आहे. शासनाने अशा सर्व महिलांना अपात्र केलेलं आहे, जेणेकरून ज्या महिलांना खरंच या योजनेच्या लाभाची आवश्यकता आहे त्यांना लाभ दिला मिळेल.

निकषांमध्ये बसून सुद्धा हप्ता आला नसेल, तर करा हे काम

अधिकृत रित्या प्राप्त माहितीच्या आधारे एक लाख महिलांच्या खात्यामध्ये पात्र असून सुद्धा योजनेचे पैसे जमा झालेले नाही . याचे कारण स्पष्ट करतांना असेही सांगण्यात आले आहे, कि हि रक्कम शासनांकडेच जमा आहे कारण महिलांच्या बँक खात्यांची EKYC केलेली नसल्यामुळे हि रक्कम बँकांनी पार्ट केली आहे.

जेव्हा महिला बँक खात्याला आरपार लिंक करून EKYC करतील तेव्हा त्यांना हि सर्व हप्ते खात्यामध्ये वर्ग केले जातील. त्यामुळे जर तुम्ही पात्र आहे आणि सुरुवातीचे काही महिने लाभ सुद्धा मिळला आणि अचानक बंद झाला त एकदा तुमचे खाते असलेल्या बँक मध्ये जाऊन नक्की पार्ट KYC करून घ्या. तेव्हाच Ladki Bahin Yojana June Installment हि तुमच्या खात्यात जमा होईल.

निष्कर्ष

राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्त्याची वाट होती, मात्र आता जास्त वाट बघण्याची गरज नसेल, कारण उद्या जून महिन्याचा हातात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्यां महिलांचे बँक खाते EKYC ला आले आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी. जर काही अडचण येत असेल तर आमच्या व्हाट्स अप ला जॉईन करावे, तेथे वेलिवेळी सर्व माहिती मिळत जाईल.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment