शेतीसाठी मिळणार मोफत वीज, सोलर कृषी पंप साठी 90% अनुदान: Magel Tyala Krushi Pump Yojana

Magel Tyala Krushi Pump Yojana 2025: शेती करत असतांना स्वतःच्या पिकाची किती काळजी घ्यावे लागते हे आपल्यासारख्या शेतकऱ्यांना चांगलेच माहित आहे. उन्हात, पावसातच नाही तर हिवाळ्यामध्ये सुद्धा शेतकरी राज्याला शेतात राबावे लागत असते तेव्हा वर्षाच्या शेवटी चांगले उत्पन्न मिळते.

शेती करत असतांना पाणी हा एक महत्वाचा घटक आहे. परंतु तेव्हडीच महत्वाची वीज देखील असते. जे शेतकरी बागायती शेती करतात किंवा गहू, हरभरा, भाजीपाला सारखे पीक शेतामध्ये घेतात त्यांना उत्पन्न तर चांगले होते परंतु त्या पिकातील रहा पेक्षा जास्त उत्पन्न हे शेतातील मोटारीचे वीज बिल भरण्यात जातो. हा अनुभव आपण सर्वानी घेतला असेलंच.

हि बाब लक्षात येता राज्यसरकारने शेतकऱ्याला मोफत वीज कशी देता येईल यावर संशोधन सुरु केले आणि Magel Tyala Krushi Pump Yojana सुरु केली आहे. आता हि योजना कशी कार्यरत आहे? योजनेसाठी कोण पात्र असेल? अनुदान किती मिडेल? आणि कृषी सोलार पंप मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? हे सर्व प्रश्न आपल्या मनात नक्कीच आले असतील. या आर्टिकल मध्ये तुमाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न आमी करणार आहोत.

महत्वाचे बघा: शेतकऱ्यांना सरकार देणार मोफत पाईपलाईन अनुदान। Pipeline Anudan Yojana साठी असा करा अर्ज

Magel Tyala Krushi Pump Yojana Maharashtra: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र

राज्यसरकारने शेतकऱ्या साठी सुरु केलेली एक अतिशय मोठी तसेच महत्वपूर्ण हि Magel Tyala Krushi Pump Yojana आहे. सौर ऊर्जा चा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण वीज निर्मिती साठी जे आवश्यक आणि मोठा स्रोत जो डगली कोळसा असतो तो जरा कमी कमी होत चालला आहे. यावरच एक उत्तम आणि मोफत मिळणार पर्याय हा सौर ऊर्जा सरकारने सुरु केला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना मोफत मिळणार सूर्य प्रकाश सोलर पॅनल लावून कसा उपयोगात अनंत येईल याविषयी जागृती करण्यासाठीची हि एक महत्वाची योजना देखील समजली जात आहे. आज वीज महामंडळ एक शेतकऱ्याला हजारो रुपये बिल देत आहे. वाढती महागाई सोबत वीज सुद्धा अतिशय महाग होत चालली आहे. मात्र निसर्गाने मोफत दिलेली ऊर्जा हि व्यर्थ जात आहे.

Magel Tyala Krushi Pump Yojana Maharashtra
Magel Tyala Krushi Pump Yojana Maharashtra

कारण सोलर पॅनल ला खरेसाठी एकादमाने मोठ्या रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचा काळ हा सौर ऊर्जेकडे कमी दिसून येत होता. परंतु शेतकऱ्यांना हे अजूनही माहित नाही कि, एकदाचे जरी जास्त पैसे गेले तरी त्या सोलर पॅनल ला आणि मोटरला 25 वर्ष खर्च लावण्याची गरजच पडणार नाही आहे.

सोबतच सरकार मुख्यमंत्री मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना अंतर्गत 90% अनुदान सुद्धा देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जास्त पैसे सुद्धा मोजाची गरज पडणार नाही. फक्त 10% रक्कम भरून सुमच्या शेताकडे हे सौर पंप बसून घेऊ शकता. योजनेचे अर्ज हे आटा चालू झाले आहे, नवीन साइट सुद्धा सरकारने प्रसारित केली आहे.

महत्वाचे बघा: मागेल त्याला विहीर योजना मार्फत मिळणार 5 लाख रुपये अनुदान।

मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेचे फायदे

  • राज्यसरकार मागेल त्याला कृषी पंप योजनेमार्फत 90% अनुदान देऊन हे सोलर पंप देणार आहे.
  • शेतकऱ्याला स्वतःच्या पैशाने हे पंप घेण्याची गरज पडणार नाही.
  • महावितरण मंडळाकडून येणारे लाखो रुप्याचे बिल भरण्याची गरजच पडणार नाही.
  • शेतकऱ्याला हवे तेव्हा शेतातील पिकाला पाणी देता येईल आणि रात्री जागरण करण्याचे काम पडणार नाही.
  • योजनेमार्फत मिळालेल्या सोलर पंप किंवा पॅनल ला लागभग 25 वर्ष हात लावण्याची गरज पडणार नाही.
  • शेतकरीही चांगले उत्पन्न कोणत्याही ऋतू मध्ये घेऊ शकेल.
  • शेतकऱयांच्या मागे वीज बिल भरण्याचे टेन्शन राहणार नाही त्यामुळे त्याला उत्पन्न अधिक दिसेल.
  • जर का समाज शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा जमाती मधील असेल तर त्याला फक्त 5% च रक्कम भरावी लागेल आणि बाकीची 95% हे सरकारकडून अनुदान देण्यात येईल.
  • जेवढी शेती तेवढे मोठे आणि पवारांचे पंप शेतकऱ्याला देण्यात येणार आहे.

योजनेचे काही पात्रता निकष

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्याकडे अडीच एकर शेत जमीन असेल तर पात्र शेतकऱ्याला कमाल तीन हॉर्स पावर चे सोलर कृषी पंप मिळणार.
  • अडीच एकर पेक्षा जास्त आणि पाच येकरपर्यंत शेत जमीन अर्जदाराकडे असेल तर त्याला पाच हॉर्स पावरचे कृषी पंप दिले जाईल.
  • पाच एकर पेक्षा जास्त जर का शेतकऱ्याकडे शेती असेल तर साडे सात हॉर्स पावर चे कृषी पंप दिले जाणार आहे.
  • शेतकऱ्याकडे जर का सिंचनासाठी विहीर, वयक्तिक किंवा सामूहिक शेततळे, बोअर, नाले, तलाव आणि जर नदी असेल तर तेव्हाच योजनेचा लाभ मिळणर.
  • अर्जदाराने या आधी सरकारी सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • अर्जदाराने योजनेचा अर्ज केलेला असावा.

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • अर्ज करणाऱ्या पात्र शेतकऱ्याकडे त्याच्या शेतीचा 7/12 असावा. सोबत त्या उताऱ्यामध्ये सिंचनाच्या कुठल्या सोर्सची सुद्धा नोंद असणे आवश्यक आहे.
  • जर सिंचनाचा सोर्स सामूहिक असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या शेतात असेल तर त्याचे नाहरकत प्रमाणपत्र असायला हवे. जे कि 200 रुपयाच्या स्टॅम्प वरती असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • जातीचा दाखला
  • बँकेचे खातेबुक
  • पासपोर्ट फोटो
  • जर सिंचनाचा सोर्स डार्क झोन मध्ये येत असेल तर सरकारच्या भूजल विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र असणे सुद्धा बंधनकारक आहे.

असा करा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज

राज्यसरकारची योजना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज भरण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल वरती जावे लागेल. नंतर अर्ज भरण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे बघा.

Add a heading 9
Magel Tyala Krushi Pump Yojana Apply Online
  • सरकारी अधिकृत पोर्टल वरती गेल्यावर मेनू टूल वरील लाभार्थी सुविधा मध्ये जावे आणि अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
  • मग तुमच्या पुढे योजनेचा अर्ज येईल, त्या अर्जामध्ये तुम्हाला स्वतःची वयक्तिक शेती विषयी माहिती भरावी लागेल.
  • ज्यामध्ये शेतीची माहिती, सिंचनाची माहिती, रहिवासी पत्ता,शेतीचा संपूर्ण तपशील, शेतकऱ्याकडे पहिले असलेले पंप, अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती, लागणारे घोषणापत्र आणि काही इतर कागदपत्रे अपलोड सुद्धा करावे लागतील.
  • संपूर्ण माहिती अर्जामध्ये भरून झाल्यावर आणि काही कागदपत्रे अपलोड केल्यावर संपूर्ण माहिती एकदा तपासून बघा.
  • नंतर हा अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट झाल्यावरती तुम्हला एक पावतीसुद्धा मिळेल.
  • जर तुम्ही अर्ज भरून योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र झालात तर, तुम्हाला 90% अनुदानावर सोलर कृषी पंप दिले जाईल.

जर कोणत्या शेतकऱ्यास अर्ज करताना काही अडचणी येत असतील तर शेतकरी हा तालुका क्षेत्रातील महावितरण कार्यालयासोबत संपर्क साधून मदत घेऊ शकता. तसेच सरकारने ग्राहक सेवा केंद्राचे टोल फ्री नंबर 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या वरती कॉल करून आवश्यक ती मदत मिळवू शकता.

निष्कर्ष

सरकारी योजना (Magel Tyala Krushi Pump Yojana) मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता निकष, लाभाचे फायदे तसेच योजनेचा अर्ज कशपराकारे ऑनलाइन भरायचा याची सुद्धा माहिती बघितलेली आहे. योजनांच्या माध्यमातून शेतकरी हा अधिक चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकेल. हेच सरकारसोबत आमच्या टीमची सुद्धा इच्छा आहे.

त्यामुळे हि योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे. जर योजनेचा अर्ज भारत असताना काही अडचणी येत असेल तर नक्की कंमेंट्स मध्ये सांगा, आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद

FAQs

  1. Que: कृषी सौर पंप योजना म्हणजे काय आणि त्याचे लाभ काय आहेत?

    Ans- शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेली हि एक अनुदावरची योजना आहे. त्यामार्फत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप खरेदीसाठी 90% अनुदान सरकार देत आहे. शेतीअनुरूप पात्र शेतकऱ्याला 3 ते 7.5 हॉर्स पावर पर्यंतचे (hp) कृषी पंपाचा लाभ दिला जाणार.

  2. Que: मागेल त्याला कृषी पंप योजनेतून किती अनुदान मिळते?

    Ans- राज्यातील सर्व शेतकऱ्यांना योजनेच्या लाभ मध्ये 90% अनुदान देण्यात येत आहे. तर अनुसूचित जाती व जमाती मढी शेतकरी बांधवांना 95% अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Leave a Comment