Maharashtra ST Pravas Yojana: पावसाळ्यामध्ये सगळीकडं हिरवळ आपल्याला बघायला मिळते, ज्यामुळे मन एकदम प्रसन्न होत असत. तुम्ही सुद्धा राज्यभर फिरण्यामध्ये आणि विविध पर्यटन स्थळे बघण्याचे शौकीन असाल, तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची Maharashtra ST Pravas Yojana खास तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते.
जर तुम्ही बालपणात असाल, तरुण असाल, प्रौढ असला किंवा जेष्ठ सुद्धा असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 4 ते 7 साथ दिवसांपर्यंत प्रवास करता येणार आहे. ते कसा, ते बघू खालीलप्रमाणे.
Read Also: Panchayat Samiti Silai Machine Yojana: फ्री शिलाई मशीन, पंचायत समिती योजनांचे अर्ज झाले सुरु
Maharashtra ST Pravas Yojana 2025: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची प्रवास योजना माहिती
महाराष्ट्र शासन दर वर्षी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत हि योजना प्रवाश्यांकरिता राबवत असते. या योजनेचाच सर्वसामान्य व्यक्तींपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा घेऊ शकणार आहे. योजनेअंतर्गत पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्र पाहण्या करीता सुद्धा तुम्ही पास काढू शकणार आहेत. तसेच शालेय सहल, कंपनी कामगारांची सहल किंवा पारिवारिक सहलीकरिता सुद्धा तुम्ही या योजनेमार्फ़त प्रवासाचा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही एकटे जात असाल तर तुमच्या वयानुसार आणि बस सेवेवर तुमच्या पासचे तिकीट ठेवलेत आहेत.
योजनेचा उद्देश
ज्या नागरिकांची मनसोक्त प्रवास करण्याची इछा असते, मात्र अर्थनिक अडचणींमुळे ते कुठेहि फिरू शकत नाहीत. काही जेष्ठ नागरिकांची देव दर्शनाची इच्छा असून सुद्धा तिथे पैशाच्या अभावामुळे त्यांचे जाणे होत नाही. अशा नागरिकांना त्यांना हवा तास प्रवास करता यावा यासाठी Maharashtra ST Pravas Yojana आपल्या एसटी महामंडळामार्फत राबण्याची उद्देश आहे.
योजनेच्या काही अटी
योजने अंतर्गत तुम्ही किमान चार ते कमाल सात दिवसाची पास काढू शकता. जर तुम्ही साध्य बसची पास काढली तर तुम्ही राज्यभर कोठेही आणि कोणत्याही साध्या बसने प्रवास करू शकाल. जर तुम्ही शिवशाही बस ची पास काढली तर तुम्ही साध्या बस सह ऐसी असलेल्या बस मधून सुद्धा प्रवास करूशकाल.
शिवशाही बसची पास काढण्याचा अधिक एक फायदा होतो ते म्हणजे राज्याबाहेर सुद्धा तुम्ही कालावधीच्या आत प्रवास करू शकाल. प्रवासाला जाण्याच्या दहा दिवस आधी तुम्हाला पासची बुकिंग करावी लागेल. प्रवासामध्ये तुम्हाला 30 किलो पर्यंतचे स्वतःचे सामान आणि लहान मुलाचे 15 किलो पर्यंतचे सामान घेऊन जाता येणार.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस देशात जिथपर्यंत प्रवास करते तुम्हाला तिथपर्यंतच जात येणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रवासादरम्यान जर समजा पास हरवली गेली, तर ती तुम्हाला परत मिळणार नाही किंवा त्याची दुय्यम प्रत सुद्धा दिली जाणार नसल्यामुळे फार मोठी पंचाईत तुमची होऊ शकते, त्यामुळे पास सांभाळून ठेवणे तुमचे कर्तव्य राहील.
पास ज्या व्यक्तीच्या नावाने आहे त्याच व्यक्तीला प्रवास करता येईल. प्रवासादरम्यान कुठलेलंही नुकसान झाल्यास किंवा दुखापत झाल्यास परिवहन महामंडळ जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. जर कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमुळे प्रवास कॅन्सल करायचा असल्यास तारखेच्या पूर्वीच पास रद्द करता येईल. तसेच तुम्ही भरलेली रक्कम सुद्धा तुम्हाला पार्ट दिली जाईल.
प्रवास पास चे स्वरूप
साधी बससेवा: जर तुम्हाला सध्या बस ने राज्यभर प्रवास करायचा झाल्यास सात दिवसाचे प्रौढ नागरिकांना 3171 रुपये भरावे लागेल. जर चार दिवस प्रवास कार्याचा असेल तर 1814 रुपयाच्या पास मध्ये सुद्धा तुम्ही प्रवास करू शकाल. तसेच मुलांना सात दिवसांकरिता 1588 रुपये तर चार दिवसांकरिता 910 रुपयांची पास काढणे गरजेचे असेल.
शिवशाही बससेवा: शिवशाही बसने प्रवास करायचा असेल, तर प्रौढ नागरिकांना सात दिवसासाठीचे 4429 रुपये तर चार दिवसांकरता 2533 रुपयाची पास फी भरावी लागणार आहे. तसेच लहान मुलांना सात दिवसाचे 2217 रुएए आणि चार दिवसाचे 1269 रुपये भरून पास काढत येईल. यामध्ये आता ई-शिवाई बस सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत त्याची सुद्धा तुम्ही पास घेऊ शकता.
अर्ज पद्धती
Maharashtra ST Pravas Yojana साठी अर्ज करण्याकरिता बस डेपोवर जाऊन ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
निष्कर्ष
हि योजना निसर्ग प्रेमी, पर्यटन प्रेम तसेच देवदर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना अतिशल सोयींसकर असणारी आहे. ठरलेल्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रदर्शन करण्याचा वैचार केला तर ते दिखील शक्य होईल. त्यामुळे हि योजना नक्की आपल्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना सांगा आणि त्यांच्या सोबत तुम्ही सुद्धा आपल्या लालपरीन परावास करा, धन्यवाद.





