Mahila Startup Yojana: व्यवसाय करण्यासाठी महिलांना मिळणार 25 लाखापर्यंत कर्ज, अर्ज झालेत सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila Startup Yojana Maharashtra: निवडणुकपूर्ण वर्धा येथील एका सभेमध्ये देशातील पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी Mahila Startup Yojana Maharashtra ची सुद्धा घोषणा करून महिलांना मोठे गिफ़्टच दिले होते. योजनेचे अधिकृत नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना हे असून, हि योजना राज्यातील सर्व महिलांकरिता सुरु करण्यात आली आहे.

महिला सक्षमीकरणाची जे मोहीम देशभर आणि राज्यभर शासनामार्फत राबविली जात आहे त्याचाच एक भाग हि योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना उद्योजिका बनण्यासाठी शासनाकडून कमाल 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ते कसे आपण खाली बघूया.

Mahila Startup Yojana Maharashtra: महिला स्टार्टअप योजनेची संपूर्ण माहिती

राज्यातील लाडक्या बहिणींकरीता राज्यसरकारने Mahila Startup Yojana Maharashtra चा अधिकृत रित्या जीआर हा 9 जुलै 2024 ला काढला आहे. महिलांना उद्योजिका बनण्याकरिता पाठबळ देण्याकरता आणि स्वतःचे अस्तित्व बनवण्यासाठी शासनाने हि योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या महिला नेतृत्व करून स्वतःचा एक छोटा किंवा मोठा उद्योग सुरु करण्याचा विचार करत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे विचार अस्तित्वा मध्ये उतरवता येतील. ज्या महिलांचे आधीच छोटे वाय्व्साय आहेत त्यांना त्यांचा मोठा उद्योग बनवण्यासाठी सुद्धा योजनेअंतर्गत कर्ज घेता येईल. लहान उद्योगासाठी किमान 1लाख तर कमाला 2 लाख तर मोठ्या उद्योगासाठी किमान 1लाख तर कमाल25 लाखापर्यंत कर्ज कमी व्याजदरावर दिले जाणार आहे.

योजनेचे उद्देश

राज्यातील महिलांना उद्योग क्षेत्राकडे येण्यास प्रोत्साहित करणे, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारवने आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत करणे हाच योजनेमागील उद्देश आहे. तसेच राज्याला देशामधील सर्वात अधिक स्टार्ट अप किंवा उद्योग असलेलं राज्य बनवणे आणि नवीन रोजगार निर्मिती करणे हे शासनाने लक्ष आहे.

योजनेचे पात्रता निकष

राज्यातील नोंदणीकृत असलेले स्टार्टअप या Mahila Startup Yojana Maharashtra साठी पात्र असतील. तसेच प्रस्तुत स्टार्टअप मध्ये किंग उद्योग मध्ये महिलांचा पुरुषापेक्षा अधिक वाटा असणे आवश्यक आहे. ज्या स्टार्टअप साठी तुम्ही अर्ज करणार आहात ते किमान महिला नेतृत्वामध्ये एक वर्षांपासून कार्यरत असावे. तसेच तुमच्या उद्योगाची वर्षी उलाढाल किमान दहा लाख ते कमाल एक कोटी पर्यंत असेल तरच तुम्ही पात्र होणार. याआधी राज्य सरकारच्या कुठल्याही स्वरूपापाचे अनुदानाच लाभ घेतला असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच शेवटचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी 18 ते 45 याच वयोगटातील महिला पात्र असतील.

लागणारे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खातेबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • प्रकल्प अहवाल
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर

योजनेचे फायदे

महिलांना स्वतःचा उद्योग उभारणीसाठी किंवा उद्योग मोठा करण्यासाठी एकदम कमी व्यजदाराने आर्थिक मदत मिळणार आहे. एक महिला उद्योजिकांमुळे इअतरही महिलांच्या कमला हात मिळणार आहे आणि त्या सर्व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल. राज्याच्या सामाजिक विकासासोबतच आर्थिक विकासामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग वाढण्यास मदत होईल. तसेच या यशस्वी उद्योजिकांना बघितल्यावर इतरही महिला उद्योजग कडे जातील.

योजनेचा अर्ज असा करा

Mahila Startup Yojana Maharashtra चा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला www.msins.in या साइट वर जायचे आहे. तिथे तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे एक बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्या पुढे कर्ज योजनेचा फ्रॉम येईल, तो सर्व भरायचा आहे आणि तुमचे आणि उद्योगाचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. शेवटी सबमिट करा. हा अर्ज करत असतांना तुम्हाला एकही रुपया भरण्याची गरज नाही.

निष्कर्ष

राज्यामध्ये जास्तीत जास्त महिला उद्योजक बनावेत आणि नवीन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात अशी सरकारची धारणा आहे. याच्या माध्यमातून आज 26,589 महिला स्टार्टअप ने योजनेचा लाभ घेऊन आपले उद्योग मोठे केले आहेत आणि आता वेळ तुमची आहे, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment