Mahila Udyogini Yojana Maharastra: देशातील महिला ही दुसऱ्या वर अवलंबून न राहता स्वता घर चलवानारी बनायला हवी हाच उद्देश्य ठेऊन सरकार महिलासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. ज्याने महिल तिच्या वडिलवर किवा पतिवर अवलंबून राहणार नाही. महाराष्ट्रात Lek ladki Yojana, Mazi Ladki Bahin Yojana सारख्या महिलाकारिता असंख्य योजना आहेत.
परंतु पुरेसी माहिती महिलांपर्यंत पोहचत नसल्यामुडे महिला या योजनांच्या लाभपासून वंचितच राहतात. केंद्रसरकार व महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने Mahila Udhyogini Yojana देखील राबविण्यात येत आहे, परन्तु या योजनेची माहिती खुप कमी महिलांना च महित असेल. त्यामुळे महिला उद्योगिनी योजना सारख्या सर्व योजना महाराष्ट्रातील सर्व महिलापर्यंत पोहोचवण्याचे काम आमी करत आहोत.
महत्वाचे बघा: या महिलांना Maharashtra मध्ये 3 Cylinder Free मिळणार आहे, बघा कोणती कागदपत्रे लागतील.
Mahila Udyogini Yojana Maharastra 2025- महिला उद्योगिनी योजना काय आहे
आजकल प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर होत आहेत, मग ते सरकारी नोकरी असो किंवा खासगी नोकरी सगळी काडी महिलांचे प्रमाण वाढत चालले आहेत. पण आपल्या महाराष्ट्रात अजून सुद्धा ग्रामीण भागात महिलेला स्वतः चा व्यवसाय वाढीसाठी सगळे लोक विरोधच करत असतात त्यामुळे आर्थिक साहाय्य तर दूरच. हीच बाब सरकारने लक्षात घेता Mahila Udyogini Yojana राबविण्याचा संकल्प घेतला आहे.
ज्याद्वारे महिलेला स्वतःचा उद्योक वाढविण्यासाठी कमीत कमी 1,50,000 व जास्तीत जास्त 3,00,000 ( तीन लाख) रुपया पर्यंतची आर्थिक मदत लोण द्वारे दिली जाते . हि योजना भारत सरकार द्वारा 2020 मध्ये आरंभ करण्यात आली आहे. जरी Mahila Udyogini Yojana Maharastra हि Loan स्वरूपात असली तरी जर उद्योजक महिला जर शेती विषयक व्यापार करत असेल तर तिला 0% व्याजदर भरावे लागेल अर्थात बिनव्याजी स्वरूपाचे कर्ज मिळणार आहे. त्यामुळे महिलांना अतिशय फायदा होणार आहे.
महत्वाचे बघा: महिला स्वयंरोजगार योजना: Mahila Swaym Rojgar Yojana
लाभार्थी महिलेचे मनोगत
रेखा ठोंबरे: नमस्कार, मी एक उद्योजिका महिला आहे. मी महिला उद्योगिनी योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा मशरूम उद्योग सुरु केला आहे. आदी मला वाटायचे कि, उद्योग करणे महिलेचे काम नाही मात्र या योजनेअंतर्गंत जेव्हा मी उद्योग सुरु केला तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. आज माझ्या सोबत मी वीस महिलांना सुद्धा रोजगार देत आहे.
महिला उद्योगिनी योजना ची उद्दिष्ट्ये
- ग्रामीण एव शहरी भागातील महिलाना उदरनिर्वाहासाठी आणि विकासाच्या मुकग्या स्त्रोत मधे शामिल करूं घेण्यासाठी बँक व इतर वित्तीय संस्थांकडून Loan घेण्याची परवानगी मिळणे.
- अनुसूचित जाती व जमाती तील किव्वा आर्थिक मागास महिलांना बिन व्याजी अथवा कमी व्याजाचे कर्ज उपलब्ध करून देणे.
- महिला भेदभाव न ठेवता मोफत व्याज अग्रीम प्रदान करणे.
- EDP च्या कार्यक्रमाद्वारे महिला प्राप्तकर्त्याचे यश सुनिश्चित करणे
महिला उद्योगिनी योजना ची वैशिष्ट्ये
- मोफत आणि कमी व्याजदर कर्ज: महिलांना स्वतःचा व्यवसाय स्थापन किंवा वाढवण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याचा सरकारचा मानस आहे. Mahila Udyogini Yojana मधून विधवा, निराधार आणि मागास अश्या महिलाना 0% व्याजदराने कर्ज देण्यात येते.
- उच्च सन्मान आगाऊ रक्कम: उद्योगिनी योजना चा लाभ घेण्याकरिता अर्ज दाखल केलेल्या महिलांना कमल तीन लाखापर्यंत आगाऊ लोन ची ऑफर असते. परंतु त्याकरिता महिला पात्रता निकषांमध्ये बसने अत्यंत आवश्यक आहे.
- 88 लघुउद्योगांचा योजनेत समावेश: या योजनेमध्ये महिला साठी 88 उद्योगांचा समावेश करण्यात आलं आहे. ज्या उद्योगांसाठी महिला हि लोण घेऊन आपण व्यवसाय वाढवू शकतील.
- कर्जावर 30% सबसिडी: महिला उद्योगिनी योजना महिलाना स्वतःच्या पायावर उभे होण्यास मदत करते. आणि महिलांनी घेतलेले कर्ज जास्त ओझं होऊ नये म्हूनन सरकार द्वारा पुढील कर्जासाठी 30% सबसिडी देखील देण्यात येते.
- पारदर्शकता: योजना चा अर्ज करण्यासाठी कुठली हि फी अथवा पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे. सोबतच ज्या हि संस्था आणि बँका कर्ज प्रदान करतील त्या सुद्धा पारदर्शकतेनेच अर्जधारकाच्या पात्रतेचे मूल्यांकन करणार. त्यामुळे उद्योजक महिलांना Online आणि Offline देखील Apply करता येणार आहे.
योजनेचे मुख्य पात्रता निकष
- हि योजना फक्त उद्योजक महिलाकरिताच आहे, त्यामुडे अर्जकरता उद्योजक महिला असणे कर्जेचे आहे.
- अर्जदाराने भूतकाळामध्ये कधीही कुठल्याही कर्जावरती डिफॉल्ट केलेले नाही.
- महिला उद्योजक अर्जदाराचा जो क्रेडिट स्कोअर असेल तो चांगला असावा आणि कर्जासाठी अर्ज पुन्हा करण्यास सक्षम असणे गरजेचे आहे.
योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे
1. | ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरलेला अर्ज आणि पासपोर्ट आकाराचे फोटो |
2. | आधारकार्ड आणि जन्मप्रमाणपत्र |
3. | शिधापत्रिका आणि दारिद्य्ररेषेखालील कार्ड |
4. | उतपन्नाचा दाखल आणि रहिवासी दाखल |
5. | जात प्रमाणपत्र, पात्रता लागू असल्यास |
6. | बँक पासबुक त्यावरील खाते क्रमांक, बँकेचे नाव, IFSC Code, शाखेचे नाव आणि MICR |
7. | बँकेचे आवश्यक इत्तर कागदपत्रे |
महिला उद्योगिनी योजना फॉर्म
महिला उद्योजक असल्यास सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही व्यवसायला अधिक विक्सित करू शकता. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिला उद्योजक तयार होण्यासाठी Mahila Udyogini Yojana सरकारद्वारे राबविण्यात येत आहे. त्यासाठी आपण Online किंवा Offline देखील फॉर्म भरू शकता.
Mahila Udyogini Yojana Online Apply Process:
- सर्वप्रथम तुमच्या परिसरातील कुठली बँक Mahila Udyogini Yojana साठी Loan प्रदान करते याची चौकशी करा. त्या बँक च्या ऑफिसिअल साईट वर ती जा.
- नंतर त्या साईट वर तुमचा ऑनलाईन फॉर्म भरा सोबतच सर्व माहिती निकषाप्रमाणे द्या.
- सीडीपीओ नावाची अधिकृत संस्था तुमि ऑनलाईन भरलेल्या अर्जाची शहानिशा करून पुनरावलोकन करेल जर तुमि दिलेला अर्ज मंजूर झाला अथवा ना मंजूर जरी झाला तर तुमाला एसएमएस द्वारे काढण्यात येईल.
- जर मंजूर झाला असेल तर बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल सोबतच सर्व कागदपत्रे निकषानुसार आहेत कि नाही हे देखील तपासले जाईल. जर लोन मंजूर झाली असेल तर अधिकृत महामंडळाला अनुदान सोडण्याची बँक विनन्ती करेल.
- अंतिम टप्प्यात पूर्णतः बँक संपूर्ण रक्कम डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा करेल किव्वा तृतीयपक्ष पुरवठादाराच्या खात्यात टाकेल.
Mahila Udyogini Yojana Ofline Apply Process:
- उद्योगिनी योजना प्रदान करणाऱ्या बँकेकडून अथवा सेतू मधून अर्ज घेऊ शकता किंवा सीडीपीओ कार्यालयातून सुद्धा हा अर्ज मिळवू शकता.
- योजनेच्या निकषानुसार सर्व कागदपत्रे गोळा करा.
- घेतलेल्या अर्जावर संपूर्ण माहिती टाका, सोबत सर्व कादपत्रे जोडा.
- फॉर्म आणि सर्व कागदपत्रे घेऊन बँक मध्ये जा आणि तिथे अधिकाऱ्याकडे सबमिट करा.
- बँकेद्वारे तुम्ही प्रस्तुत केलेले सर्व कागदपत्रे आणि फॉर्म तपासाला जाईल. तुमचा व्यवसाय व प्रोजेक्ट प्रस्तावाचे मूल्यांकन करून तुमचा अर्ज मंजूर करायचा कि नामंजूर ते ठरवेल.
- जर बँकेद्वारे आज मंजूर झाला तर तुमाला एसएमएस द्वारे कळविण्यात येईल आंबी पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यात येतील.
निष्कर्ष
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी सरकार महिला उद्योगिनी योजना मार्फत देत आहे. ज्यामुळे राज्यातील महिला ह्या सशक्त बनतील. स्वतः उद्योजक बनून कुटुंब चालवण्यास सज्ज होतील. याचा फायदा असा होणार कि कि कुटुंबातील करता धरत्या पुरुषाला देखील आधार मिळणार आहे. जर आपण सुद्धा अजून योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकर लाभ घेऊन उद्योगिनी बना आणि एक प्रबळ उद्योक निर्माण करून स्वतःचा आणि परिवारासोबतच राज्याच्या विकासात देखील योगदान द्या.
योजनेचा फॉर्म भारत असताना काही अडचणी येत असतील तर आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की सांगा, धन्यवाद.
FAQs.
-
Que- महिला उद्योगिनी योजनेसाठी कोण पात्र आहे?
Ans: महिला उद्योजक जर सर्व पात्रता निकष पूर्ण करत असेल तर ती या योजनेसाठी पात्र आहे . फक्त त्या उद्योजक महिलेचे वय १ ८ पेक्षा जास्त व ५ ५ पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
-
Que- उद्योगिनी योजनेमार्फत किती कर्ज मिळू शकते?
Ans: महिला उद्योजक च्या पात्रता नुसार महिला उद्योगिनी मार्फत कमीत कमी दीड लाख व जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
-
Que- हे कर्ज कोणत्या महिलांसाठी आहे?
Ans: सरकार मार्फत उद्योगिनी योजना हि कुठल्याच एक समाजासाठी नाही आहे, तर ती ज्यां महिला उद्योजकाला गरज आहे तिला हि मिळू शकते. फक्त अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे .