Mofat Gas Cylinder Yojana: योजनेचे नाव अन्नपूर्ण योजना आहे, हि महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील फक्त लाडक्या बहिणींसाठीच आहेत. राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता आणि महागाईला तोंड देण्यासाठी शासनाने हि योजना मागील वर्षी 2024 मध्ये सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत प्रति वर्ष पात्र महिलांना 3 गॅस सिलेंडर ची जी रक्कम असेल ती मोफत खात्यात जमा करण्यात येणार आहे.
Read Also: LIC Vima Sakhi Yojana: या सरकारी योजनेतून महिलांना मिळणार 7 हजार रुपये महिना, आताच करा अर्ज
3 Mofat Gas Cylinder Yojana Maharashtra: मोफत गॅस सिलेंडर योजनेची संपूर्ण माहिती
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जून 2024 ला राज्यसरकारने सुरु केलेली आहे. या योजनेची घोषणा सर्वप्रथम राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. राज्यातील ज्या महिलांना केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजना अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळाले आणि आणि ज्या कुटुंबातील गरीब महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आत्ता सुद्धा मिळत आहे, त्यांच्याच या Mofat Gas Cylinder Yojana च्या माध्यमातून 3 गॅस चे पैसे खात्यामध्ये जमा केले जातात.
योजनेचा उद्देश
दिवसेंदिवस देशामध्ये महागाई उच्चांक गाठत असतांना गरीब कुटुंबांना अधिक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारने 2016 मध्ये उज्वला योजना राबवून प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस दिले आहेत. मात्र प्रति माह गॅस संपतो आणि ते भरून घेण्याकरिता गरीब महिलांना फार कठीणाई होतात. कारण गॅस सिलेंडरचे भाव सुद्धा गगन भरारी घेत आहेत. त्यामुळे या महिलांना आर्थिक मदत करण्याकरता महाराष्ट्र शासनाचा Mofat Gas Cylinder Yojana अर्थात अन्नपूर्ण योजना राबवण्याचा उद्देश आहे.
योजनेचे फायदे
राज्यातील महिलांना दरवर्षी 2500 रुपयाची आर्थिक मदत होईल. गरीब आणि ग्रामीण भागातील महिला प्रत्येक वेळेस गॅस भरण्यासाठी खूप आर्थिक अडचणी येत असतात. ज्यामुळे बहुतांश महिला ह्या चुलीवरच स्वयंपाक बनवता. चुलीच्या धुरामुळे महिलेच्या डोळ्याला त्रास होऊ शकतो आणि त्यांचे आरोग्य सुद्धा बिघडू शकेल. मात्र अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळाल्या नंतर महिलांना यापैकी कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तसेच कुटुंबातील सर्वच सदस्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहील आणि वेळेची सुद्धा बचत होईल.
योजनेचे पात्रता निकष
ज्या महिलांना उज्ज्वला योजनेचा किंवा महाराष्ट्र शासनाची माझी लाडकीकी बहीण योजनेसाठी पात्र असतील किंवा लाभ घेत असतील तेच महिला या योजनेसाठी पात्र आहेत. कुटुंबातील ज्या महिला असेल त्यांचा नावाने गॅस कनेक्शन घेतलेले असणे बंधनकारक आहे. एक कुटुंबातील किंवा एक रेशन कार्ड वरील फक्त एकच महिला या योजनेसाठी पात्र असेल. तसेच हि योजना फक्त महाराष्ट्र पुरतीच मर्यादित आहे त्यामुळे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असेल तरच Mofat Gas Cylinder Yojana चा लाभ घेऊ शकेल.
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उतपन्नाचा दाखला
- दोन पासपोर्ट फोटो
- बँकेचे खातेबुक
- गॅसचे पुस्तक
असा करा योजनेसाठी अर्ज
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑफलाईन अर्ज करणे सोयीस्कर पडेल. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी वरीलप्रमाणे जी कागदपत्रे सांगितलं ती कागदपत्र घेऊन तुमच्या परिसरातील गॅस एजेन्सी मध्ये जावे लागेल.
लक्षात ठेवा कि, एजेन्सी मध्ये जात असतांना सोबत अर्जदार महिला जिच्या नावाने गॅस आहे ती उपस्थित असणे आवश्यक आहे. तिथे गेल्यानंतर ekvy करण्यात येईल आणि तुमची काही माहहती विचारण्यात येईल. तिथे सर्व प्रक्रिया संबंधी अधिकारी पूर्ण करतील.
निष्कर्ष
महिलांना या योजनेमार्फत अनेक फायदे होतात, जसे कि आरोग्य चांगले राहते, आर्थिक मदत होते आणि मानसिक तसेच शारीरिक त्रास सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला आता सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर नक्की तुंम्ही अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकता, धन्यवाद.