Mulina Mofat Shikshan Yojana 2025: शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे, हे कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. कारण या स्पर्धेच्या युगामध्ये जीवन जगायचे असेल तर शिक्षण हि काळाची गरज बनलेली आहे. ज्यामुळे जीवन जगणे सोपे होते. परंतु वाढत्या महागाई मध्ये मात्र मुलींना उच्च शिक्षण घेणे शक्य होईना झाले आहे.
त्याकरिता राज्यसरकारच्या 5 जुलै 2024 च्या नवीन जीआर अनुसार शिक्षण विभागाकडून व्यवसायिक अभ्यासक्रमासारख्या महागड्या शिक्षाणासाठी आता मुलींना कुठलीही फी भरण्याची आवशकता राहणार नाही. तसेच 800 पेक्षा जास्त कोर्सेस सुद्धा मोफत असण्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. ज्यांचा लाभ घेत मुलींना भविष्यामध्ये चांगली नौकरी मिळू शकते.
काही पालक कारण सांगतात कि, पैसे जास्त लागतात. तसाही मुलींना नवऱ्यांच्या घरी जाऊन घरच सांभाळावी लागतात.अशा लोकांना खास हि या योजनेची माहिती असणे आवश्यक आहे. Mulina Mofat Shikshan Yojana हि अशा लोंकांना काळ फासून स्त्री शिक्षणाला एक मोठं योगदान देणारी आहे. ज्याची माहिती खालील प्रमाणे बघुयात.
हे सुद्धा वाचा: Mahila Udyogini Yojana Maharastra| महिला उद्योगिनी योजना डिटेल In Marathi
Mulina Mofat Shikshan Yojana 2025: मुलींना मोफत शिक्षण योजनाची संपूर्ण माहिती मराठीत
मुलगी संधी मिळाली तर प्रतिभा ताई पाटील सारखी देशाची राष्ट्रपती तर सोफिया अन्सारी सारखी विंग कर्नल बनून मोठे मोठे पद मिळवू शकते. मुली आजकाल एकीकडे इतिहास घडवत आहेत तर जवळपास 80% मुली ह्याचे पैसे अभावी आणि घरच्यांच्या विरोधामुळे शिक्षणच घेऊ शकत नाही आहे.
केंद्र सरकार आणि राज्यसरकार सतत स्त्री शिक्षणासाठी वेगळ्या वेगळ्या योजना राबवत असते. ज्याचा फायदा घेऊन आज लाखो महिला उच्च पदावरती पोहोचल्या आहे. याचे एक थोडे श्रेय Mulina Mofat Shikshan Yojana ला देणे सुद्धा वावगे अजिबातच ठरणार नाही. कारण या योजनेच्या माधयमातून एकदम मोफत पूर्ण शिक्षण मुलींना देऊ केले जाते. या योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे 20 लाख मुली आपले उच्च शिक्षण पूर्ण करत असतात. राज्यसरकारने या योजनेकरिता 906.05 करोड रुपयाचा निधी मंजूर करून दिला आहे.
ज्यामुळे मुली आत्मनिर्भर बनून स्वतःच्या परिवाराची जबाबदारी उचलण्यास सक्षम बनल्या आहेत. बाबासाहेबांचे एक वाक्य होते ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही”. आज बिलकुल तसेच घडतांना आपण बघत अहो, शिक्षणामुळे आपण आपल्या हक्काची लढाई लढू शकतो. मैत्रिणींनो शिक्षणाचे महत्व जितके सांगितले तितके कमीच असणार आहेत.
त्यामुळे सरकारचा एक स्पष्ट उद्देश आहे कि, देशातील सर्व मुलीना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या पालकांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करणे. जेणेकरून मुली सुद्धा मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतील . आणि देशाच्या विकासामध्ये अमूल्य योगदान देण्यास समर्थ होतील.
हे सुद्धा वाचा: या महिलांना मिळणार मोफत सूर्य चूल योजना चा लाभ। Free Chulha Yojana चा 2025 मध्ये मोबाईवरून असा करा अर्ज.
मुलींना मोफत शिक्षण योजनेचा उद्देश
- उच्च शिक्षणाच्या वेगळ्या वेगळ्या संधीची उपलब्धता: ज्या मुलींना माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाच्या सुविधा आणि वेगळे वेगळे कोर्सेस उपलब्ध करून देणे.
- आर्थिक सक्षमता: मुलीचे चांगले शिक्षण झाले तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या होऊ शकतील. त्यांना चांगला सरकारी किंवा खासगी जॉब मिळेल. ज्यामुळे मुलीसोबत तिचे कुटुंब सुद्धा आर्थिकदृष्टया सक्षम बनेल.
- समाजात महिलांविषयी सामाजिक परिवर्तन: मुलीला कमकुवत समजणाऱ्या समाजामध्ये स्त्री शिक्षणाचे महत्व समजावून त्यांच्या दिमाखात महिलांविषयीची चुकीचे विचार नष्ट करणे. महिलांकडे समाजाचा बघण्याचा निगेटिव्ह दृष्टिकोन बदलणे आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ सुरु करणे.
- समाजातील असमानतेचा नाश: स्त्री पुरुष असमानता पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक रूढी परंपरा आहे. मुलांना मुलीपेक्षा अधिक महत्व देणे, वंशाचा दिवा समजून त्याच्या सर्व गरज, सर्व हट्ट पूर्ण करणे आणि याउलट मुलींना तोंडावरच पदर सुद्धा सरकू ना देणे. दोघांमध्ये भेदभाव करणे.
योजनेचे होणारे फायदे
मोफत शिक्षणाची सोय: मुलींना या योजनेअंतर्गत सरकारकडून लहानपणापासूनच मोफत शिक्षणाची सुविधा आणि योग्य आहाराची केली गेली आहे. ज्यामुळे मुलीच्या पालकांना मुलीच्या शिक्षणाची काहीच काळजी करण्याची गरजच पडणार नाही आणि कुठली फी सुद्धा देण्याचे काम नाही.
उच्च शिक्षणासाठीची सामग्री मोफत: आजकालच्या महागाईच्या जमान्यात शिक्षण पूर्ण कारंब्यासाठी लाखो रुपयांचा कारच येत असतो, त्यामुळेच काही पालक मुलींना जास्त शिकवण्यासाठी मागपुढे बघत असतात. मात्र सरकार मुलींना मोफत शिक्षणाच्या योजना राबवून शिक्षणासाठी लागणारी सर्व सामग्री प्रदान करणार आहेत. ज्यामुळे पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी कुठलेही त्याग करण्याची आवश्यकता नसेल.
कौशल्य विकासाची संधी: मुलीला हव्या त्या क्षेत्रामध्ये शिकण्याची संधी सुद्धा योजामार्फतच मिळते. उंच शिक्षण घेत असतानाच मुलींना कौशल्य विकासाच्या संध्या सुद्धा उपलबद्ध करून दिल्या जातात. ज्याचा फायदा त्यांना भविष्यात जॉब मिळवताना होईल.
सरकारी शिष्यवृत्ती: उच्च शिक्षणाची व्यवस्था ग्रामीण भागात नसते, त्यामुळे मुलींना शहराच्या ठिकाणीच जावे लागते. त्यासाठी त्यांना तिथे राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी सुद्धा मोठा खर्च येतो. त्यामुळेच सरकारनं वेगळ्या वेगळ्या शिष्यवृत्ती योजना राबविते. ज्याचा लाभ घेऊन उदरनिर्वाहाचा सर्व खर्च निघून जातो.
योजनेचे पात्रता निकष
अनु.क्र. | पात्रता निकष |
---|---|
1) | मुलगी हि ज्या राज्यात शिक्षण घेऊ इच्छिते, त्याच राज्याची नागरिक आणि रहिवासी असणे बंधनकारक आहे. |
2) | अर्जदार मुलीचे कुटुंब आर्थिक बाबतीत कमकुवत असेल किंवा परिवाराची उत्पादन क्षमता कमी असेल आणि मागास समाजातील असेल तर अशा मुलींना विशेष प्राधान्य दिले जाते. |
3) | या योजनेचा लाभार्थी होण्याकरिता मुलीचे वय हे कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 21 असायला हवे. वेगवेळ्या राज्यानुसार यामध्ये काही कमी जास्त पण असू शकेल. |
योजनेची अंमलबजावणी
योजनेची अमलबजावणी ज्या त्या राज्याचे सरकार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत असते. महाराष्ट्र सरकार शालेय स्तरावर चांगल्या इमारती, चांगले शिक्षक, मुलांना लागणारी सर्व सामग्री आणि इतर आवश्यक असलेल्या सुविधांचा पुरावा करत असते.
तसेच महाविद्यालयीन पातळीवरील विध्यार्थ्यांसाठी उच्च षिकांसाठी अनुदान हे संबंधित संस्थांना देते. ज्या मार्फत हव्या त्या पद्धतीने उच्च शिक्षणाच्या सुविधा संस्थेमार्फत पुरविल्या जात असतात. तसेच गरीब आणि मागास कामगार पाल्यांसाठी स्कॉलरशिप योजना सुद्धा समाजकल्याण विभागाअंतर्गत राबविली जाते.
मुलींची सामाजिक सुरक्षा होण्याकरिता सरकार विविध कौशल्य विकासाची प्रकल्प राबविते. त्यामार्फत मुलींना स्वतःची रक्षा करण्याचे ट्रेंनिंग सोबत काही उपकरण सुद्धा देण्यात येत असतात. ज्यामुळे मुलींना समाजात वावरताना प्रत्येक समस्यांचा सामना करता येतो.
आवश्यक कागदपत्रे
अनु. क्र. | कागदपत्रे |
---|---|
1) | मुलीचे आधारकार्ड |
2) | मुलीच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला |
3) | रहिवासी दाखला किंवा डोमेसाइल |
4) | शाळेची टीसी |
5) | मुलीच्या मागील वर्षाची गुणपत्रिका |
6) | दोन पासपोर्ट फोटो |
निष्कर्ष
एक मुलीचे किंवा स्त्रीचे जीवन अतिशय त्रासदायक असते. जर स्त्री अशिक्षित असली तर ते जीवन अधिकच जास्त अंधकारमय होते. या आर्टिकल मध्ये आपण मुलींना मोफत शिक्षण योजनेची संपूर्ण माहिती बघितली आहे, धन्यवाद.
FAQs
-
Que: महाराष्ट्रात मुलींना मोफत शिक्षणासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
Ans– मोफत शिक्षण योजनेचा लाभ मिळण्याकरिता मुलीचे आधार कार्ड, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, टीसी, मागील वर्षाची गुणपत्रिका, रेशनकार्ड इ. कागदपत्रांची आवशयकता आहे.
-
Que: महाराष्ट्रात मुलींना अभियांत्रिकी शिक्षण मोफत आहे का?
Ans– राज सरकारने काढलेल्या नवी जीआर अनुसार 2024 नंतर राज्यातील ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख पेक्षा कमी आहे, त्यांना अभियांत्रिकी शिक्षण मोफत करण्यात येणार आहे.
-
Que: महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहे 2025?
Ans– महायुती सरकारमध्ये भाजप सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष एकत्र आहेत. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री शिवसेनाचे नेते दादा भुसे हे आहेत.