Namo Drone Didi Yojana 2025: देशाचा विकास हा त्या देशातील नागरिकांवर अवलंबून असते . त्याच प्रकारे आपल्या देशात सर्वाधिक लोक हे शेतकरी आहेत. त्यामुळेच शेतीचा विकास अर्थातच देशाचा देखिल विकास होणार. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतात सर्वच बाबतीत आधुनिकीकरण होताना दिसते आहे.
शेती मध्ये देखील आधुनिकीकरण होण्यासाठी आणि स्मार्ट पद्धतीने कुठलेही नुकसान न होता शेती करता येण्यासाठी नवीन तंत्रज्ञाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी. सरकार नमो ड्रोन दीदी योजना संपूर्ण देशभर राबवित आहे. ज्यामुळे शेतकऱ्याला शेती तर करणे सोपे होणारच सोबत महिलांना देखील रोजगार निर्माण करता येणार आहे.
महिलांसाठी हि योजना एक मोठा व्यवसाय करण्याची जणू संधीच बनली आहे. आता नमो ड्रोन दीदी योजना 2025 नेमकी आहे तरी काय? त्यासाठी पात्रता काय असेल? कागदपत्रे कोणती लागतील? आणि अर्ज कसा करायचा? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या एकाच आर्टिकल मध्ये विस्तारपूर्वक बघणार आहोत.
महत्वाचे बघा: महिलांना मिळणार 5 लाख रुपये, लखपती दीदी योजनासाठी असा करा अर्ज
Pradhanmantri Namo Drone Didi Yojana 2025 Information
देशाचे प्रधानमंत्री यांनी नमो ड्रोन दीदी योजना हि 28 नोव्हेंबर 2023 ला सुरु केली आहे.या योजनेच्या मागची संकल्पना हि अतिशय विशाल अशी आहे. कारण योजनेने महिलांना रोजगार तर मिळणारच सोयाबीत शेतकऱ्यांना शेती देखील कमी वेळेत आणि उत्कृष्ट आधुनिक पद्धतीने करण्यास मदत होणार आहे.
शेतकरी हा शेतीमध्ये फवारणी किंवा खात टाकायचे असले तर त्याला ट्रॅक्टर किंवा स्वतः मेहनत घेऊन करावी लागते. त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान देखील काही प्रमाणात होत असते, सोबत जो अधिक वेळ जातो तो वेगळाच. यावरच उपाय म्हणून नमो ड्रोन दीदी योजना (Namo Drone Didi Yojana 2025) सुरु करण्यात आली आहे. त्यामार्फ़त शेतीमध्ये ना जात रिमोट च्या साह्याने शेतामध्ये फवारणी करता येणार आहे.
या योजनेचा लाभ फक्त महिला स्वयंसेवी गटांनाच मिळणार आहे. ज्या मार्फत ते त्या ड्रोन ला शेतकऱ्यांसाठी भाडेतत्वावर देऊन चान्गला बिजनेस करू शकणार आहेत. देशातील किमान पंधरा हजार महिला स्वयंसेवी गटांना योजनेमार्फ़त ड्रोन देण्याचा संकल्प सरकारचा आहे. ज्यासाठी 1261 कोटींचा निधी देखील सरकार राखीव ठेवणार आहे.
महत्वाचे बघा: मुलगी 21 वर्षाची झाल्यावर मिळणार 6 लाख 7 हजार 128 रुपये, लवकर करा अर्ज
नमो ड्रोन दीदी योजनाचे उद्दिष्ट
ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा अतिशय चान्गला असा प्रयत्न आहे. नमो ड्रोन दीदी योजना च्या माध्यमातून राज्यातीलच नाही तर देशभरातील महिला देखील चांगला बिजनेस करू शकणार आहेत.
ज्यामुळे शेतकऱ्यांसोबत महिलांचा देखील विकास होणार आहे. आत्तापर्यंत पंजाब, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान मधील 56 पेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या शेतीला पूरक अशा व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारलेली आहे.
सरकार देणार 8 लाख रुपयाचे अनुदान
नमो ड्रोन दीदी योजना (Namo Drone Didi Yojana 2025) अंतर्गत पात्र महिला स्वयंसेवी गटांना मोठा ड्रोन खरेदी करण्यासाठी 80% अनुदान देणार आहे. साधारणतः जो आधुनिक ड्रोन असतो ते कमल दहा लाख रुप्याच्या किमतीचे असेल.
याच दृष्टिकोनातून योजनेमार्फ़त सरकार जास्तीत जास्त 8 लाख रुपयाचे अनुदान स्वरूपात देणार आहे. बाकीची जी रक्कम असेल ते स्वतः पात्र महिलांना भरावी लागेल किंवा सरकार लोन स्वरूपात देखील घेऊ शकणार आहेत. फक्त त्यावर त्यांना 3% व्याज भरायचे असेल.
नमो ड्रोन दीदी योजनेचे पात्रता निकष
सरकारची योजना नमो ड्रोन दीदी योजनेचा (Namo Drone Didi Yojana 2025) लाभ घेण्याकरिता खालील पात्रता निकषांमध्ये बसने आवश्यकआहे. नाहीतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. म्हणून खालील निकष व्यवस्तीत बघावीत.
- योजनेसाठी अर्ज करणारी महिला हि भारतीय असायला हवी.
- महिलेचे वय किमान अठरा वर्ष ते कमाल पासष्ट वर्ष तरी असायला हवी.
- योजनेमार्फ़त ड्रोन फक्त स्वयंसहायता बचत गटातील महिलांनाच मिळणार आहे.
- ड्रोन चा उपयोग करण्यासाठी महिला हि शारीरिक प्रबळ असणे गरजेचे आहे.
- पात्र महिलेला द्रोण हे भाडेतत्वावर द्यावे लागेल, त्यासाठी महिलेचे स्वयंघोषणापत्र आवश्यक राहील.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खातेबुक
- सुरु मोबाईल नंबर
- मेल आयडी
- पासपोर्ट फोटो
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- शाळेचे प्रमाणपत्र
या महिलांना सरकार देणार प्रतिमाह 15,000 रुपये मानधन
स्वयंमासेवी गटांना योजनेचा मार्फ़त ड्रोन प्राप्त झाल्यावर त्याला चालवण्यासाठी एक प्रशिक्षित पायलटची देखील गरज पडणार आहे. जे कि त्याच महिलांपैकी एक असेल. जवळील पंधरा गावाकरीत एक पायलट महिलेची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे.
हा ड्रोन शेतकऱ्यांना भाडे तत्वावर दिला जाईल म्हणून त्या महिलेचं योग्य प्रशिक्षण देखील सरकार कडूनच दिले जाईल. त्या प्रशिक्षणत शेताला फवारणी कशी द्याची, खाते कशी टाकायची याची पूर्ण माहिती देखील देण्यात येईल.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या महिलेस 15,000 रुपये प्रति माह मानधन देखील देण्यात येणार आहे. महिलेला फक्त ड्रोन चे रिमोट हाती घेऊन एक ठिकाणाहून सांगितल्या गेलेल्या शेतात मॉडरेट करायचे आहे.
महत्वाचे बघा: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर Pink E Rickshaw Yojana Maharashtra मार्फत मिळणार इलेकट्रीक रिक्षा.
नमो ड्रोन दीदी योजनेचे विविध फायदे
- महिलांच्या स्वयंमासेवी गटातील महिला ड्रोन शेतकऱ्यांना भाड्याने देऊन व्यवसाय करू शकतात.
- हा व्यवसाय करण्याकरिता सरकार 8 लाख रुपयाचे अनुदान रुपये अनुदान देणार आहे, त्यामुळे स्वतः जास्त खर्च करण्याची गरज पडणार नाही.
- आधुनिक तांत्रज्ञानाचा उपयोग करून शेत करणे सोपे आणि फायद्याचे होईल.
- पात्र महिलांपैकी एक महिलेला योग्य प्रशिक्षण देऊन ड्रोन पायलट बनवण्यात येईल आणि सोबतच प्रति माह 15,000 रुपये रुपये देखील मानधन मिळेल.
- शेतकऱ्यांना कमी वेळेत शेती हे कामे करणे शक्य होईल आणि इतर वेळेत शेतकरी दुसरा व्यवसाय देखील सांभाळू शकतील.
- देशातील महिला स्वावलंबी बनतील, आणि स्वतःच्या परिवाराच्या आर्थिक अडचणी दूर करू शकतील.
योजनेची अर्ज करण्याची पद्धत
नमो ड्रोन दीदी योजना हि देशभर घोषित जरी झाली आहे परंतु सध्या योजनेची अर्ज प्रक्रिया हि सरकारने थांबून ठेवली आहे. मिळालेल्या सूत्रांच्या माहिती नुसार लवकरच Namo Drone Didi Yojana 2025 मध्ये अर्ज सुरु करण्यात येणार आहे. जेव्हा हि अर्ज सुरु होतील त्याची माहित सर्वात प्रथम आम्ही तुम्हाला देऊ. त्यासाठी आपच्या Whats App ग्रुप ला जॉईन करा.
निष्कर्ष
सरकारने हि Namo Drone Didi Yojana 2025 सुरु करून जणू शेती मध्ये आधुनिक क्रांतीच घडवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जपान, चीन सारख्या देश मध्ये हे तंत्रज्ञान पहिले असेल. आता तेच सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे. ज्यामुळे देशातील सर्व शेतकरी हे विकसित होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाहीत.
FAQs
-
Que: नमो ड्रोन दीदी योजना काय आहे?
Ans- केंद्र सरकार मार्फ़त राबविण्यात येणारी महिलांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठीची हि योजना आहे. योजनेमार्फ़त पात्र महिलेला एक मोठा ड्रोन अनुदान स्वरूपात दिला जाणार आहे. ज्याचा उपयोग महिला शेतकऱ्यांना भाडे तत्वांवर देऊन चांगला व्यावर करू शकणार आहेत. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ची अतिशय उत्तम अशी हि योजना आहे.
-
Que: नमो ड्रोन दीदी योजना साठी कोण पात्र आहे?
Ans- ज्या महिला स्वयं सहायता बचत गटाच्या सदस्य आहेत, ज्यांचे वय हे अंतःस्रा पेक्षा अधिक आहे, अशा महिला योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र असतील.
-
Que: ड्रोन दीदी योजनामध्ये किती अनुदान मिळते?
Ans- सरकारने परासरीत केलेल्या अधिकृत माहिती नुसार महिलांना नवीन ड्रोन घेण्याकरिता 80% अनुदान मिळणार आहे. म्हणजेच जर दहा लाखाचा ड्रोन असेल तर आठ लाख रुपये हे सबसिडी स्वरूपात दिली जाणार आहे.