New Schemes Only For Women 2025: फक्त महिलांसाठी शासनाच्या विविध योजना, बघा संपूर्ण माहिती

New Schemes Only For Women 2025: मागील काही दशकांमध्ये महिलांना अतिशय कमी लेखलं जायचं आणि तुच्छ दर्जाची वागणूक दिली जात असे. संविधानाने महिलांना प्रगत होण्यासाठी स्वतःचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व सुविधा आणि आरक्षण तर प्रदान केले मात्र समाजातील काही रीती रिवाजामुळे स्त्रिया ह्या घराच्या बाहेर पडूच शकत नव्हत्या.

त्यामुळे महिलांना चूल आणि मुल ह्याच गोष्टी बघावं लागत होत्या. आता मात्र महिलांना कोणीही जुन्या चाली रीती लादून देऊ शकत नाहीत. कारण महिला ह्या स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिकल्या आहे आणि सरकार देखील त्यांना प्रोत्साहन देताना आपल्याला दिसते आहे.

एक सुशिक्षित मुलगी पुढील दहा पिढ्याला पुढे नेऊ शकते, हि बाब आज वास्तव्यामध्ये खरी होतांना आपण बघतो आहे. परंतु अजून सुद्धा काही भागामध्ये मध्ये काही महिला ह्या विकासाच्या मुख्य प्रवाह पासून खूप लांबच आहेत. त्यांचा सुद्धा विकास होण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार राज्यभर विविध योजना राबवित आहे.

त्यामधील बहुतांश योजना ह्या त्या गरीब आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचतच नाही, त्यामुळेच आपण त्या सर्व योजनांची माहिती या आर्टिकल मध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. खरोखरच राज्यातील गरजू महिलांना आपल्या आर्टिकल मधून लाभ होईल हीच आशा आहे.

फक्त महिलांसाठी शासनाच्या विविध योजना बघा कोणत्या कोणत्या आहेत: New Schemes Only For Women In Marathi

New Schemes Only For Women In Marathi
New Schemes Only For Women In Marathi

केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन योजना आणत असते. खास तर महिलांसाठी विशेष योजना राबविण्याचे धोरण सरकारचे आहे. त्यामुळे फक्त महिलांसाठी योजना कोणत्या आहे ज्याचा लाभ घेऊन महिला स्वतःचा विकास आणून घेऊ शकतील ते आपण आज बघुयात. त्यामध्ये अनुदान योजना, कर्ज, योजना, योजना, उद्योग योजना सुद्धा असणार आहेत. जे तुम्ही खालील प्रमाणे बघू शकता.

  1. माझी लाडकी बहीण योजना
  2. लेक लाडकी योजना
  3. उद्योगिनी योजना
  4. माझी कन्या भाग्यश्री योजना
  5. विधवा पेन्शन योजना
  6. पिंक ई रिक्षा योजना
  7. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
  8. सुकन्या समृद्धी योजना
  9. प्रधानमंत्री मातृ वंदन योजना
  10. नमो ड्रोन दीदी योजना
  11. प्रधानमंत्री उज्वला योजना
  12. मोफत सूर्य चूल योजना
  13. स्टँडअप इंडिया योजना

1)माझी लाडकी बहीण योजना

फक्त महिलांसाठी शासनाच्या विविध योजना मध्ये सर्वप्रथम नाव येते ते महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण योजनाचे. अतिशय कमी वेळेमध्ये देशभर प्रसिद्ध होणारी हि माझी लाडकी बहीण योजना आहे. हि योजना फक्त महाराष्ट्रातील गरजू आणि गरीब महिलांसाठीच आहे. जी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 1 जुलै 2024 ला सुरु केली आहे.

योजनांमार्फत पात्र महिलांना प्रति माह 1500 रुपये सरकार देणार आहे अर्थातच प्रति वर्ष 18000 मिळणार. योजनेचा अर्ज फक्त 21 ते 65 वयातीलच महिला भरू शकणार आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी 2.43 कोटी महिलांना पात्र करण्यात आले होते.

मात्र त्यानंतर हातात पर्यंत हाच एकदा वाढून 2.53 कोटी पर्यंत पोहोचला आहे. एवढेच नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी हा आकडा जाहीर केला आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे नऊ हप्ते सरकराने महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. अर्पित महिन्याचा दहावा हप्ता सुद्धा लवकरच जमा होण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

आता यापुढील लाभाकरिता महिलांना पात्रता अटी मध्ये बसने बंधनकारक राहणार आहे. ज्या हि पात्र महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक इनकम हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील कोणताही व्यक्ती जर सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, महादंळसासीं जोडलेला असेल तरी सुद्धा त्या महिलेला अपात्र करण्यात येणार आहे.

एवढेच नाही तर ज्या कुटुंबाकडे पाच एकर शेती किंवा त्यापेक्षा अधिक शेती असेल अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने जर का ट्रॅक्टर सोडून इतर कोणतीही चार चाकी वाहन असेल, तरी सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार नाही आहेत.

त्यामुळे जर आतापर्यंत तुम्हाला जरी लाभ मिळाला असेल परंतु या नंतर तुम्हाला अपात्र सुद्धा करू शकणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये लाभ मिळणाऱ्या 7 लाभ महिलांना निकषांमध्ये बसत नसल्यामुळे अपात्र केले आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लीक करू शकता.

महत्वाचे बघा: लाडकी बहीण योजनेची आजची मोठी अपडेट: Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi

2)लेक लाडकी योजना

हि योजना महाराष्ट्रातील मुलींकरिता राबविण्यात येत असते. मुलींची घटती संख्या आणि वाढते मृत्युदरावर नियंत्रण ठेवण्याकरिता राज्यसरकारने हि योजना राबविण्याचा निर्धार हाती घेतला आहे. तसेच मुलींच्या शिक्षणाला चालना देऊन त्यांचा सामाजिक दर्जा वाढवणे हा सुद्धा एक मुख्य उद्देष आहे. लेक लाडकी योजनाचा लाभ हा पाच टप्यांमध्ये दिला जाणार आहे.

मुलीचा जन्म झाला तेव्हापासून ते मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत 1 लाख 1 हजार रुपयाचा लाभ सरकार देणार आहे. ते म्हणजे असा कि, मुलीचा जन्म झाल्या झाल्या मुलीला 5000 रुपये मिळतील, नंतर मुलगी शाळेत जाऊ लागेल तेव्हा 6000, जेव्हा मुलगी सहावी मध्ये जाईल तेव्हा 7000, मुलगी अकराव्या वर्गात गेल्यावर 8000 आणि मुलगी जेव्हा 18 वर्षाची होईल तेव्हा 75000 रुपये दिले जाणार आहेत.

3)महिला उद्योगिनी योजना

महिला उद्योगिनी योजना महाराष्ट्र हि फक्त राज्यातील ग्रामीण भागातील महिलांकरिता सरकारने सुरु केलेली योजना आहे. या योजनेणंतर्गत पात्र महिलांना सरकार 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज स्वतःचा लघु उद्योग निर्मिती करीत देणार आहेत.

सोबतच या कर्जावरती 30% पर्यंतचे अनुदान सुद्धा मिळणार आहे. अर्थात जर का तुम्हाला तीन लाख कर्ज मिळाले तर तुम्हाला 2.10 लाख रुपयेच परत भरावे लागणार आहेत. हि योजना महिलांसाठी स्वतःचा उद्योग सुरु करण्याकरिता अतिशय चांगली आहे. सरकारचे उद्देश आहे कि प्रत्येक गावातील महिला हि आत्मनिर्भर बनावी आणि जास्तीत जास्त महिलांनी उद्यमी बनण्याकडे आपले करियर वळवायला हवे.

मुख्यतः गरीब, विधवा, बेसहारा आणि अपंग महिला तसेच अनुसूचित जाती/जमातीतील महिला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत ऐकून 88 लघु उद्योगासाठी हे कर्ज उपलब्ध असणार आहे.

महिला उद्योगिनी योजना साठी राज्यातील 18 ते 55 वयोगटातील महिला पात्र असणार आहेत. तसेच महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे दिड लाखापेक्षा कमी असायला हवे, तेव्हाच योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंक ला ओपन करून बघू शकता.

महत्वाचे बघा: Mahila Udyogini Yojana Maharastra| महिला उद्योगिनी योजना डिटेल In Marathi

4)माझी कन्या भाग्यश्री योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना हि मुलींचा जन्मदर वाढविण्याकरिता सुरु केलेली योजना आहे. योजनेची घोषणा 1 एप्रिल 2016 ला करण्यात आलीय होती मात्र तिथून जवळपास एक वर्षानंतर 1 ऑगस्ट 2017 ला हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.

योजनेअंतर्गत ज्या दाम्पत्याला एक मुलगी असेल त्याला 50 हजार रुपये सरकार देणार आहे. तसेच जर का दोन मुली असतील तर दोन मुलींच्या नावाने 25-25 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. हि रक्कम मुलीच्या शिक्षणाकरिता दिली जाणार आहे त्यामुळे मुलगी 18 वर्षाची होई पर्यंत दिलेल्या खात्यामधून योजनेचा एक रुपयाही काढता येणार नाही आहे.

योजनेसाठी पात्र होण्याकरिता सरकारने काही पात्रता अटी सुद्धा लादली आहेत. ते म्हणजे अश्या कि, योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रामधील मुलीला किंवा पालकांना दिला जाणार आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पादन हे जर सडे सात लाखापेक्षा अधिक असेल तर योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे आणि कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच मुख्य आत म्हणजे मूळचे शिक्षण किमान दहावी पस तरी असायला हवे. जे कोणी या पात्र अटी मध्ये बसेल त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

5)विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र

राज्यातील महिलांकरिता शासनाच्या विविध योजना आहेत. त्यापैकी एक विधवा पेन्शन योजना हि सुद्धा आहे. जी फक्त विधवा महिला साठी सुरु करण्यात आलेली आहे. जेणेकरून त्यांना उदर्निर्वाह करत असतांना थोडी आर्थिक मदत होईल आणि त्याची सुद्धा विकासाकडे वाटचाल होईल, हेच उद्देश सरकारने ठेवले आहे.

ज्यामुळे आर्थिक सोबत सामाजिक आणि सर्वांगीण विकास सुद्धा आपल्याला होतांना दिसतो आहे. योजनेमार्फत पात्र विधवा महिलेला सरकार प्रति महिना 600 रुपये पेन्शन देत असते. जे कि महाडीबीटी च्या मार्फत डायरेक्ट खात्यामध्ये जमा करण्यात येते.

जर त्या महिलेला मुलगा असेल तर तो मुलगा अठरा वर्षाचा होई पर्यंत महिलेस 900 रुपये पेन्शन मिळते. योजनेचा लाभ घेण्याकरिता महिला हि महाराष्ट्राची रहिवासी असावी, तिचे वय हे 40 ते 65 च्य दरम्यान असावे आणि महिलेचे वार्षिक उत्पन्न 21 हजारापेक्षा जास्त नसावे. योजनेचा अर्ज हे ओंलीने आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सुद्धा भारत येतो.

6)पिंक ई रिक्शा योजना

महाराष्ट्रातील फक्त महिलांसाठी हि पिंक ई रिक्शा योजना आहे. राज्यातील महिलांना रोजगार मिळवून देण्याकरिता आणि स्वावलंबी बनविण्याकरिता महाराष्ट्र शासन च्या महिला व बाल विकास विभागाणे घोषित केली आहे.

योजनेमार्फ़त राज्यातील गरजू आणू गरीब परिवारातील महिलांना सरकार 20% अनुदानावर पिंक ई रिक्शा योजना देणार आहे आणि 70% रक्कम हि कर्ज स्वरूपात सुद्धा उपलब्धा करून देणार आहे. त्यामुळे नवीन रिक्शा घेणे तयां सोपे झाले आहे.

योजनांचा लाभ घेऊन राज्यातील बेरोजगार महिला ह्या रिक्शा चालवून स्वतःच्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मदत होईल. तसेच महिला स्वावलंबी होऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून परिवार चालवू शकतील.

7)महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

केंद्र सरकारची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना हि महिलांना आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. जी कि भारतीय डाक विभागामार्फत देशातील फक्त महिलांकरिताच राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये महिलांना खाते उघडावे लागेल. त्या खात्यामध्ये कमीत कमी 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 2,00,000 रुपये दोन वर्षाकरिता ठेवले असता त्यावर 7.5% व्याजदर सरकार देणार आहे.

हि योजना सर्वात अधिक व्याजदर देणारी योजना आहे. त्यामुळे योजनेमार्फत पोस्ट मध्ये मागील वर्षात 86 कोटी रुपये पेक्षा अधिक निवेश केला गेला आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन माहिती मिळवू शकता.

8)सुकन्या समृद्धी योजना

केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा एक भाग म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. जी फक्त मुलींकरिता सुरु करण्यात आलेली योजना आहे. हि योजना 22 जानेवारी 2015 पासून राबविण्यात आली आहे.

हि योजना एक बचत योजना असणार आहे. त्यामुळे मुलींना उच्चं शिक्षणाकरिता स्वतःच्या खात्यामध्ये प्रति वर्ष 250 रुपये बचत म्हणून जमा करावे लागेल. जास्तीत जास्त दीड लाख रुपये सुद्धा प्रति वर्ष जमा करू शकता.

हि बचत रक्कम कमाल 15 वर्ष भरावी लागणार आहे. जेव्हा मुलगी 21 वर्षाची होईल तेव्हा प्रति वर्ष 8.2% चक्रवाढ व्याजाने परत मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुलींनी घ्यावा.

9)प्रधानमंत्री मातृ वंदन योजना

बाल कुपोषण, माता आणि बाल मृत्यू दार यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सरकारने 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदन योजना सुरु केली आहे. या योजनेमार्फत गर्भवती महिलेला आणि प्रसुती झालेल्या महिलांना योग्य आहार मिळण्याकरिता सरकार आर्थिक मदत करणार आहे. ज्यामुळे माता सोबत बाळाला सुद्धा चांगला आहार मिडल आणि दोघांची आरोग्याची तबियत सुधृढ राहील.

सरकारने प्रसारित केलेल्या जीआर नुसार पात्र महिलेस सरकार तीन टप्प्यांमध्ये ऐकून 5000 हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. जर दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली असेल तर दुसऱ्या मुलांकरिता 6000 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. योजनेचा फ़ॉर्म हा ऑफलाईन पद्धतीनेच अंगणवाडी केंद्रवर्ती भरायचा आहे.

10)नमो ड्रोन दीदी योजना

दिवसेंदिवस शेती करण्याकरिता नवीन नवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे. जणू शेती मध्ये नवी क्रांतीच घडत आहे. शेतकऱ्यांना शेतातून पीक घेणं अधिक सोपं करण्यासाठी केंद्रसरकारने नमो ड्रोन दीदी योजनाची घोषणा केली आहे. या द्रोण च्या मार्फत शेतकरी एक जागेवरून शेतातील पिकांवर औषधी फवारणी, खत टाकनी सारखे कामे करू शकणार आहे.

योजनेमार्फत मिळणाऱ्या ड्रोन मुळे शेतकऱ्याला शेती करणे सोपे तर होईलच, सोबत पिकाचे नुकसान पण होणार नाही आणि वेळेवर पिकाला पोषक ते फवारणी सुद्धा करता येणार आहे. सरकार योजनेमार्फत देशातील पंधरा हजार स्वयंसहायता बचत गटातील महिलांकरिता हि योजना राबविणार आहे.

सरकारने घोषित केलेल्या माहिती नुकसार हे ड्रोन खरेदी करण्याकरिता महिलांना 80% अनुदान दिले जाणार आहे. अर्थातच जर का ड्रोन ची किंमत दहा लाख रुपये असेल तर महिलांना मात्र दोन लाख रुप्यामध्येच द्रोण मिळणार आहे. योजनेच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना ड्रोन भाड्याने देऊन चांगली कमी करू शकतात. एवढेच नाही तर ड्रोन चालवण्यासाठी एक महिलेला विशेष प्रशिक्षण आणि 15000 रुपये महिना सुद्धा सरकारच देणार आहे.

11)प्रधानमंत्री उज्वला योजना

प्रधानमंत्री उज्वला योजना जी कि केंद्र सरकारची अतिशय फेमस अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील घरो घरी गॅस देण्याचे काम सरकारने केले आहे. तेसुद्धा फक्त 100 रुपयांमध्ये आणि त्यांचं आटा सबसिडी सुद्धा सरकार गॅस प्रमाणे देत आहे. आपल्या देशामध्ये 70% गरीब आहेत.

त्यामुळे त्यामध्ये काही असेही आहेत कि गॅस विकत घेण्याची सुद्धा हयपती होत नाही. जंगलामधून लगड आणणे, कचरा आणणे आणि आपला जेवणाचं स्वयंमापक बनवणे हेच पिढींपिढी चालत आलेलं होत. यामुळे प्रदूषण सुद्धा खूप होत होते आणि महिलांच्या डोळ्यावरती, तब्बेतीवरती सुद्धा या धुराचा असर होत होता. मात्र आता सरकारच्या योजनेमुळे घरोघरी गॅस पोहोचले आहेत. तुम्हाला सुद्धा योजनेतून गॅस मिळवायचा असेल तर तर जवळच्या एजेन्सी मदे संपर्क करा.

12)मोफत सूर्य चूल योजना

वाढती महागाई सोबत संघर्ष आज प्रत्येक नागरिक करत आहे. आता एक रुपयाची वस्तू हि दहा रुपयाला मिळत आहे. सोबतच जर गॅस, पेट्रोल, डिझेल आणि विजेचे भाव तर गगन भरारी घेतांना दिसतात. अशा परिस्थितीमध्ये सर्वात जास्त परेशान हा सर्वसामान्य माणूसच होत असतो.

सरकारने गॅस तर दिले परंतु ते गॅसचे सिलेंडर भरून घेणे शक्यच होत नाही. जर इलेकट्रीक शेगळी घेतली तर वीज बिल सुद्धा खूप जास्त येते. या सर्व गोष्टींवर पर्याय म्हणून एकच आहे ते म्हणजे सूर्य चूल. परंतु ते सुद्धा विकत घेण्याचा विचार केला तर दहा हजारापेक्षा जास्तच किमतीची होते.

म्हणून फक्त महिलांसाठी राज्यसरकारने मोफत सूर्य चूल योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार सूर्य चूल शेगळी, सोलर पॅनल सुद्धा देणार आहे. हि चूल एकदा घेतली तर परत परत गॅस सारखे पैसे खर्च करण्याची गरजच पडणार नाही आहे. हा एक उत्तम असा पर्याय राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेकरिता शोधून आणला आहे.

महत्वाचे बघा: या महिलांना मिळणार मोफत सूर्य चूल योजना चा लाभ। Free Chulha Yojana चा 2025 मध्ये मोबाईवरून असा करा अर्ज.

13)स्टँडअप इंडिया योजना

आजकाल टीव्ही वरील शो शार्क टॅंक इंडिया बघून प्रत्येक युवकाला उद्यमी बनण्याचे स्वप्न पडू लागले आहे. परंतु ते स्वप्न अस्तित्वात उतरवण्यासाठी आणि एक यशस्वी उद्यमी बनण्याकरिता पैसा राहत नाही. मानून अधिक तर तरुण हे बेरोजगारच राहतात. परंतु युवकांना सरकारने सुरु केलेली स्टँडअप इंडिया योजना मात्र माहित नाही.

हो मित्रांनो उद्यमी बनायचं असेल तर हि खास योजना तुमच्यासाठीच आहे विशेष म्हणजे महिलांसाठी. या योजनेमार्फत सरकार तुम्हाला उत्पादक, कुठलीही सेवा किंवा कुठलाही बिजनेस सुरु करण्यासाठी 10 लाख रुपयापासून ते 1 कोटी रुपत्यांपर्यंत कर्ज देणार आहे. ते सुद्धा एकदम कमी व्याजदरावर.

गरजू आणि गरीब महिलांसाठीच आहे, मात्र अनुसूचित जातीतील आणि जमातीतील युवक सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. आतापर्यंत योजनेमार्फत 25 हजार कोटी रुपयांचे वितरण सरकारने केले आहे. योजनेचा अर्ज हा स्टॅन्ड अप मित्र च्या पोर्टल वरती जाऊन भरावा लागणार आहे. तर मग वाट कसली बघताय, चला आत्ताच करा अर्ज आणि बाणा एक सफल उद्यमी.

निष्कर्ष

बंधू आणि भगिनींनो आपण आज या आर्टिकल मध्ये फक्त महिलांसाठी शासनाच्या विविध योजना असलेल्या जवळपास सर्वच योजनांची माहिती बघितली आहे. या सर्व योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकणार आहेत, त्यामुळे हि माहिती जास्तीत जास्त महिलांना पाठवा आणि कुठल्याही योजनेचा अर्ज करत असतांना काही अडचण येत असेल तर आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की सांगा, धन्यवाद.

Leave a Comment