PM Awas Yojana Yadi: मागील महिन्या दोन महिन्यात ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांसाठी PM Awas Yojana चे अर्ज सुरु झाले होते. या योजनेसाठी स्वतःचा सर्वे करून स्वतःच मोबाईल मध्ये अर्ज भरता येत होता. मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत घरकुल योजनेमध्ये पन्नास हजाराची रक्कम वाढवली जाण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहबांनी मागील नागपूर येथील अधिवेशनामध्येकेली होती.
त्या नंतर ज्या हि अर्जदारांना पात्र करण्यात आले किंवा अर्ज केला असेल त्यांना 1.60 लक्ष रुपयांऐवजी 2.10 लाख रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे आता घर बांधण्यासाठी लाभार्थ्यांना मोठा आर्थिक लाभ या योजनेच्या माध्यमातून शासन करणार आहे. त्याच प्रमाणे तत्कालीन महसूल मंत्री चारशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कमाल पाच ब्रास वाळू मोफत आणि घरपोच दिली जाणार असल्याची घोषणा सुद्धा केली होती.
शासनाच्या या साहसी निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरिबी कुटुंबांना योजनेच्या लाभातूनच स्वतःचे चांगले घर बांधणे शक्य होणार आहे. मात्र PM Awas Yojana Yadi मध्ये आपले नाव आहे कि नाही, तुम्ही पात्र झालात की नाही हे कसे तपासायचे हे मात्र अजूनही बऱ्याच नागरिकांना माहित नसल्यामुळे खास आज हे आर्टिकल आम्ही तुमच्यासाठी बनवले आहे.
PM Awas Yojana Yadi 2025 Maharashtra: असे बघा यादीमध्ये तुमचे नाव
मित्रांनो घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला कि नाही, तुम्ही पात्र आहेत कि नाही किंवा तुमचे लाभार्थी यादी मध्ये नाव आहे कि नाही हे चेक करण्यासाठी खालील प्रमाणे सांगितलेल्या संपूर्ण प्रक्रियेचा अवलंब तुम्ही करू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम PM Awas Yojana Gramin च्या अधिकृत वेबसाइट pmayg.gov.in यावर यायचे आहे.
तुमच्या पुढे आवास योजनेचे डॅशबोर्ड येईल, आणि उजव्या बाजूला तीन रेषा असलेले मेनू दिसेल. त्या मेनू च्या बटनावर क्लिक करा. त्या नंतर काही पर्याय तुमच्यापुढे येतील त्यापैकी जे दोन नंबरचा पर्याय आहे Awassoft नावाच्या त्यावर क्लिक करा. मंग पार्ट दोन नंबरचा पर्याय report असा दिसेल त्यावरती जावा. नंतर तुमच्या पुढे काही चार्ट येतील, त्यामध्ये स्क्रोल करत एकदम खाली जायचं आहे. तेथे तुम्हाला H. Social Audit Report हे टायटल दिसेल, त्यामधील Beneficiary Details For Verification या पर्यायावरती क्लीक करून घ्या.
आता तुम्हाला काही माहिती तुमच्या विषयी भरावी लागणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही ज्या राज्यात राहता, जसे कि महाराष्ट्र तर ते निवडायचे आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका सुद्धा निवडा. तुम्हाला ज्या गावाची घरकुल यादी हवी आहे किंवा तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचे नाव तुम्हाला निवडायचे आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही ज्या वर्षांमध्ये अर्ज केला ते वर्ष निवडावे लागेन. जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला 2024-25 हे वर्ष निवडावे लागेल. आटा शेवटचा पर्याय म्हणजे तुमची त्यासाठी Pradhanmantri Awas Yojana Gramin हा पर्याय निवडा. खालील एक कॅपच्या भरा व सबमिट बटनावर क्लिक करा.
इथे तुमचे काम पूर्ण होणार आहे आणि तुमच्या पुढे तुमच्या गावातील कोनाकोणाचे घरकुल मंजूर झाले आहे किंवा PM Awas Yojana Yadi मध्ये गावातील कोणाचे नाव आहे तसेच तुम्ही अर्ज भरला असेल तर तुमचे नाव चेक करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम त्या यादीची PDF सेव्ह करून घ्या. या आयडी मध्ये तुम्हाला पात्र करण्यात आले का? किंवा अपात्र केले आहे का? किती अनुदान मंजूर झाले आहे आणि आतापर्यंत किती टप्पे मिळाले आहेत याची संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे.
निष्कर्ष
मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण PM Awas Yojana Yadi कश्या पद्धतीने बघता येईल याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला अधिक इतर आवास योजनेविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कंमेंट्स मध्ये विचारू शकता, धन्यवाद.