PM Pik Vima Yojana Maharashtra: 2024-25 चा पीक विमा होणार पुढील हप्त्यात जमा

Pm Pik Vima Yojana Maharashtra: पिकांचासुद्धा विमा काढण्यात येत असते. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची बदल्यात शेतकऱ्यांना थोडी का होईना पण आर्थिक मदत मिळेल.

कारण पीक तर जाईलच सोबत पीक विमा सुद्धा मिळणार नाही आणि पिकाला लावलेला हजारोच्या खर्च देखील वाया जाणार. त्यामुळे कुठलीही आपत्ती येवो अथवा नाही आपण आपल्या पिकाचा विमा Pm Pik Vima Yojana Maharashtra मार्फ़त भरणे आवश्यक आहे.

जेणेकरून भविष्यतील आपत्तीमुले आपले अधिक नुकसान होणार नाही. मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये 2024 चा पीक विमा कधी जमा होणार, तसेच नेमकं पीक विमा म्हणजे काय , योजनेचा लाभ कसा घेता येईल, कागदपत्रे कोणती लागतील आणि अर्ज कसा करायचा अशा सर्वच प्रश्नाची उत्तर मिळणार आहेत.

महत्वाचे बघा: शेतकऱ्यांसाठी विविध शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र 2025| Shetkari Sarakari Yojana In Marathi

What Is Pm Pik Vima Yojana Maharashtra? पीक विमा योजना म्हणजे नेमकं काय?

शेतकरी बांधवांना आपल्या करीत सरकारने दिलेले हे एकप्रकारचे आर्थिक संरक्षणच असणार आहे. तुमच्या शेतामध्ये कोणतेही पीक असो मंग ते भाजीपाला असो, तूर- सोयाबीन अथवा फळबाग असो. राज्यातील शेतकरी बांधवांना Pm Pik Vima Yojana Maharashtra चा लाभ घेता येणार आहे.

मित्रांनो आपल्या भारतात 1996 पासून पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक देश एक योजना या संकल्पनेमधून याला अधिक चालना देण्याचे काम 2016 पासून करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेव्हापासूनच प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास सुरुवात झाली होती.

महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत 1 रुपयांमध्ये Pm Pik Vima Yojana Maharashtra 2024 अर्ज भरण्याची करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.अर्थात सर्व पीक विमा काढण्यासाठी चे पैसे हे राज्यसरकार सरकारी तिजोरीमधून भरणार होते. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत कोणतेही अडचण होणार नाही आणि सर्वच शेतकरी पिकाचा विमा काढतील.

राज्यातील शेतकरी, कर्जामुळे, महागाई मुळे, नैसर्गिक आपत्ती मुळे फार मोठ्या आर्थिक संकटात सापडत असतात अशामध्ये पीक विमा हा त्यांचा सहारा बनत असतो. झालेल्या पिकाच्या नुकसानाची सर्वे करून त्यानुसार पीक विमा हा खात्यामध्ये जमा करण्यात येत असतो. मिळालेल्या अधिकृत माहिती च्या अनुषंगाने जास्तीत जास्त पीक विमा हा हेक्टरीप्रमाणे 40 हजार मिळू शकतो.

महत्वाचे बघा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता मिळणार प्रति वर्ष 15,000 रुपये: Namo Shetkari Yojana Maharashtra 2025

पीक विमा कधी मिळणार 2024?

रब्बी हंगामातीळ पिकांचा पीक विमा काढण्याची शेवटची तारीख हि 2024 मधील डिसेंबर महिन्यातील 15 तारीख होती. ज्या हि शेतकरीबांधवांनी या तारखेच्या आत Pm Pik Vima Yojana Maharashtra चा अर्ज भरला असेल, त्यांच्याच खात्यात पीक विम्याची रक्कम मे महिन्याच्या पहिल्या हप्त्यात जमा होणार आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांचा सर्वे पूर्णपणे सरकारने केला आहे. विमा कंपनीकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 2025 चा एप्रिल महिना संपल्या नंतर पात्र शेजाऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करून देण्याकरिता 2308 कोटी रुपयाची तरतूद देखील राज्यसरकारने केली आहे.

पीक विमा योजनाचे उद्दिष्ट

वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग हा असतात झाला आहे. त्यामुळे कधी ऊन जास्त तापते तर कधी पाऊस जास्त येतो तर कधी कधी पाण्याचा दुष्काळ देखील पडतो.या मध्ये शेतकरी हा पूर्णपणे भरडला जातो, कधी कधी तर तर टोकाचे पाऊल देखील आपल्या राज्यातील शेजारी हे उचलत असतात.

या सर्व संकटांना तोंड देण्याकरिता सरकार शेतकरी हिताकरिता Pik Vima Yojana Maharashtra भर राबवत असते.जेणेकरून नैसर्गिक कितीही आपत्ती आल्या तरी शेकरी हा खंबीर उभा राहिला पायजे. पीक विमा म्हणजे पिकाचे संरक्षण सोबतच शेतकऱ्यांचे सुद्धा संरक्षण कवच बनूनच काम करत. आपत्ती मुळे होणारे नुकसान भरपाई स्वरूपात विमा मिळत असतो. ज्यामुळे शेतकऱ्याचा हातामध्ये पैसा खेळता राहतो.

महत्वाचे बघा: प्रधानमंत्री कृषि अनुदान योजना मराठी। Pradhanmantri Krishi Anudan Yojana 2025

योजनेसाठीची पात्रता

PM Pik Vima Yojana Maharashtra In Marathi
PM Pik Vima Yojana Maharashtra In Marathi

Pik Vima Yojana Maharashtra हि राज्यातील सर्वच शेतकऱ्यांकरिता असणार आहे. पीक विमा योजनेचा अर्ज हा राज्यातील कोणतेही पीक काघेणारा शेतकरू करू शकतो. मात्र लाभ हा ज्या शेतकऱ्यांचे खर्च नुकसान झाले आहे अशाच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

पीक विमा योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज भाव लागणार आहे. अर्ज भारत असतांना खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. तसेच सर्व कागदपत्रांवरती सारखेच नाव असणे देखील गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला अपात्र देखील करू शकतात.

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शेतीचा सातबारा आणि आठ-अ
  • अर्जदाराचे बँक खाते
  • पासपोर्ट फोटो
  • पीकपेऱ्याचं घोषणापत्र

विमासाठी पिके नोंदवतांना घ्यावयाची काळजी

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, अतिशय मेहनत घ्यावी लागते. ह्या सर्व बाबाजी आपण जाणतो. शेतकरी हा अतिशय सादा आणि भोळा असतो. त्यामुळे कोणी काही सांगितलं तरी तो तसेच करत असतो.

त्यामुळे कोणाच्याही सांगण्यावरून पीक विमा भरत असतांना चुकीची माहिती भरू नये. जे पीक आपल्या शेतात असे किंवा होते त्याचीच नोंद करावा. नाहीतर जर तुमची वेगळी दुसरी माहिती भरली असता आणि ते आढळून आल्यास तुमचा अर्ज देखील नामंजूर होऊ शकते.

कारण काही शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन सोडून जास्त लाभाच्या मोहापोटी सरकारी जमिनीवर विमा उतरवला होता, परंतु खोटे कितीही लपवले तरी लपलेजात नाही. शेवटी सरकारच्या लक्षात आले तेव्हा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली गेली आहे.

असा करा पीक विम्यासाठी अर्ज

पीक विमा योजनेचा लाभ घेण्याकरित ऑनलाईन अर्ज स्वतः मोबाईल वरून आपण करू शकणार आहोत. परंतु आता मात्र वर्ज करण्याची तारीख संपलेली आहे. खालील प्रक्रियेचा अवलंब करून पीक विमा योजनेचा लाभ आपण घेऊ शकता.

  • सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला www.pmfby.gov.in भेट द्या.
  • नंतर तुमच्या पुढे एक डॅशबोर्ड येईल.
  • त्यावर Farmer Application हा पर्याय दिसेल त्यावर जाऊन Guest Farmer या पर्यायाला ओपन करा.
  • तुमचे जर आधी खाते नसेल तर नवीन नोंदणी करा हा पर्याय निवडा. तिथे तुम्हाला तुमची सर्व वयक्तिक माहिती भरून घ्यावी लागणार आहे.
  • नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागणार, लक्षात ठेवा तो नंबर तुमच्या आधारसीं लिंक असणे आवश्यक आहे. नंतर तुमच्या नंबर ला एक ओटीपी जाईल.
  • तो ओटीपी टाकून खालील कॅपच्या भरा व सबमिट बटनावर क्लीक करा. तिथे विचारण्यात आलेली माहिती भरा
  • नंतर तुम्हाला तुमच्या शेतीची माहिती भरावी लागणार आहे, त्यात तुम्ही अल्पभूदारक शेतकरी आहेत कि अत्यल्पभूदरक आहेत हे देखील भरावे लागेल.
  • तुमचे गाव कोणते , जिल्हा कोणता आणि पिनकोड देखील टाकावा लागेल.
  • नंतर वेळ येते तुमच्या आधार नंबर टाकण्याची, तो टाकून Verify करावा.
  • पीक विमा हा डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तुमले बँकेची सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  • नंतर तुम्हाला मागण्यात येणारे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • भरलेली सर्व माहिती बरोबर आहे कि नाही ते एकदा तपासा आणि अर्ज सबमिट करा.
  • शेतवतच डब्बा म्हणजे पेमेंट्स करण्याचा तेथील क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईल वरून देखील पेमेंट करू शकता.
  • सर्व झाल्यानंतर तुमच्या अर्जाची पावती डॉनलोड कार्याला विसरू नका.
  • अशा अगदी सद्य आणि सोप्या पद्धतीने आपण Pm Pik Vima Yojana Maharashtra साठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.

निष्कर्ष

आज आपण या आर्टिकल मध्ये पीक विमा विषयीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच पीक विमा खात्यात जमा कधी होणार आहे यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. आम्हाला आशीष आहे कि आम्ही दिलेली माहिती नकीच तुम्हाला आवडली असेल. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हि माहिती नक्की पोहोचवा, धन्यवाद.

FAQs

Que: पीक विम्यासाठी कोण पात्र आहे?

Ans- राज्यातील ताठ देशातील सर्वच शेतकरी पीक विमा योजनेसाठी अर्ज करू शकतात. मग ते अल्पभूदारक असो किंवा अत्यल्पभूदरक असो, जर त्यांच्या पिकाचे नसून झाले असेल तर त्यांना नक्की लाभ दिला जाणार आहे.

Que: बँक विमा तक्रार कशी करावी?

Ans- बँकेत जाऊन किंवा कृषी विभागाकडे जाऊन आपत्ती मुले नुकसान झाले असता माहिती देता येऊ शकते. तसेच जर तक्रार करायची असेल तर 1800-209-5959 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता.

Leave a Comment