---Advertisement---

PM Sauchalay Yojana 2025| शौचालय बांधण्यासाठी सरकार देणार 12 हजार अनुदान

By CMWaliYojana

Updated on:

Follow Us
PM Sauchalay Yojana 2025
---Advertisement---

PM Sauchalay Yojana 2025:- मित्रांनो, प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वच्छता हवी असते. प्रत्येक गाव हे स्वच सुंदर असावे अशी गावातील नागरिकांची अपेक्षा असते. परंतु नागरिकांचे कमी उत्पादन आणि आर्थिक अडचणी असल्या मुळे प्रत्येक कुटुंब हे स्वतःचे स्वतंत्र शौचालय बांधू शकत नाही.

हीच बाब लक्षात घेऊन सरकारने स्वच्छ भारत मिशन अभियाना अंतर्गत PM Sauchalay Yojana सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. ज्या मार्फत गावातील गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना 100% अनुदान शौचालय बांधण्याकरिता दिले जात आहे. ज्यामुळे प्रत्येक कुटुंब हे स्वच्छ कुटुंब म्हणून आपली ओळख संपूर्ण गावामध्ये बनवू शकेल.

स्वच्छ गाव सुंदर गाव हे सरकारचे घोषवाक्य आहे. तेच खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यासाठी देशातील प्रत्येक गावामध्ये हि योजना दरवर्षी राबविला जाते. आज या आर्टिकल मध्ये PM Sauchalay Yojana 2025 चा लाभ कसा घ्यायचा, कागदपत्रे काय लागतील आणि अर्ज कसा भरावा लागेल या विषयीची योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

महत्वाचे बघा: ग्राम पंचायत अपंग योजना: Gram Panchayat Apang Yojana 2025

PM Sauchalay Yojana 2025 In Marathi। शौचालय अनुदान योजनेची संपूर्ण माहिती

PM Sauchalay Yojana 2025 In Marathi
PM Sauchalay Yojana 2025 In Marathi

PM Sauchalay Yojana 2025 हि योजना महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या प्रयत्नांमधून महाराष्ट्रामध्ये राबविली जाते. हि योजना स्वच्छ भारत मिशन योजनेचा एक प्रमुख आणि महत्वाचा घटक आहे. हागणदारी मुक्त गाव करण्याकरिता हि योजना अतिशय प्रभावी ठरली आहे. योजनेचा लाभ घेत प्रत्येक गावातील नागरिक गावाला स्वच बनवण्यास योगदान देत असतात.

दिवसेंदिवस देशात आणि राज्यात अनेक रोग पसरत आहेत. त्यांच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता हाच एक मोठा उपाय बनलेला आहे. जर गावाच्या अवतीभोवती घाण असेल तर गावात अनेक बिमाऱ्या घर करून राहू शकतात. त्यामुळे महिला छोटे बाळ यांना मोठा धोका सुद्धा होण्याची शक्यता असते.

मेनी आहे गावामध्ये अत्यंत गरीब कुटुंब अजूनही आहेत. त्यामुळे त्यांना स्वखर्चातून एक शौचालय बंधने जरा कठीणच असते. अशा नागरिकांना आर्थिक मदत करून शौचालय बांधण्याकरिता प्रोत्साहित करत आहेत. शासनाचा एक समज आहे कि घरो घरी संडास असले तर गावाला स्वच्छ आणि रोग राई पासून मुक्त करण्यासाठी कोणीही अडवू शकणार नाही.

महत्वाचे बघा: Bankam Kamgar Yojana। बांधकाम कामगार योजना। Online Apply 2025

नेमकं शौचालय अनुदान योजना काय आहे?

आपल्याला कदाचित माहित नसेल हि, कि शौचालय अनुदान योजना काय आहे? तर समजून घ्या हि ज्या नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, ज्यांच्यासाठी दोन टाइम चे जेवण मिळवण्यासाठी दिवसभर कष्ट करावे लागते, अशा गरीब आणि गरजवंत परिवाराला योजनेचा माध्यमातून आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.

शौचाला अनुदान योजना हि शासनाने 2014 ला सुरु केलेली योजना आहे. या अंतर्गत करोडो परिवाराने स्वतःचे शौचालय बांधले आहे. सरकारचे उद्देश हेच आहे कि बाहेर शौचाला जाण्याच्या ज्याहि जुन्या पद्धती होत्या त्यांना बंद करून आणि सर्व परिवारातील सदस्य शौचालयामध्येच शौचास जावेत. ज्यामुळे गाव तर स्वच होईलच सोबत रोगांपासूनसुद्धा मुक्तता होईल.

योजनेचे उद्दिष्ट

  • ग्रामीण भागात स्वच्छ आणि सुंदर वातावरण निर्मिती करणे
  • भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन योजनेला चालना देणे आणि सहयोग करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट आहे.
  • गावातील महिलांना होणारी आरोग्याच्या समस्यांना दूर करणे. उघड्यावरती शौच बंद झाल्यानंतर रोग सुद्धा हळू हळू कमी होतील.
  • गरीब आणि गरजवंत परीवालाला घरामध्ये शौचालय बांधण्याकरिता आर्थिक मदत करून सुरक्षित बनवणे.

शौचालय योजनेचे फायदे

  • प्रत्येक गाव सुंदर आणि स्वच्छ बनेल
  • गावातील प्रत्येक परिवार हे उघड्यावर शौचास जाण्यापासून वाचेल.
  • गावातील रोग हळू हळू कमी होतील व नागरिक चांगले जीवन जगू शकतील.
  • गरीब आणि योजनेसाठी पात्र झालेल्या कुटुंबाला शौचालय बांधण्याकरिता 12,000 हजाराचे आर्थिक मदत दिली जाणार.
  • स्वच्छतेचे महत्व आणि त्याविषयी जागरूकता समाजासमाजात, गावागावात होईल.
  • गावातील महिला ह्या रात्री बेरात्री बाहेर शौचाला जाण्यापासून वाचतील आणू सुरक्षित राहतील.

शौचालय अनुदान योजनेचे पात्रता अटी

  1. योजनेमार्फत गावातील एकाच कुटुंबाला लाभ दिला जाणार आहे.
  2. योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील कुटुंबालाच मिळू शकेल.
  3. जे कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असतील किंवा रेशन कार्ड धारक असेल त्यानांच पात्र करण्यात येईल.
  4. ज्या कुटुंबाकडे आधीच स्वतः बांधलेले पक्के शौचालय असेल त्यांना मात्र या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  5. जे कुटुंब योग्य पद्धतीने अर्ज करेल आणि पात्र होईल त्यांनाच लाभ दिला जाणार आहे.
  6. अर्ज करणाऱ्याकडे सर्व कागदपत्र असणे गरजेचे असेल.

लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे

PM Sauchalay Yojana 2025 साठी पात्र होण्यासाठी आणि अनुदान मिळवण्यासाठी खालील प्रमाणे जी कागदपत्रे आम्ही सांगितली ते असणे बंधनकारक आहेत. ते नसतील तर कदाचित आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही.

महत्वाचे बघा: घरकुल योजनेच्या अनुदानात मोठी वाढ, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा, यादीत करा नाव चेक

1)अर्जदाराचे आधार कार्ड
2)दारिद्र्यशेचे कार्ड
3)रहिवासी दाखला
4)मोबाईल नंबर
5)रेशन कार्ड
6)पासपोर्ड फोटो
7)बँक खातेबुक

शौचालय अनुदान योजनेसाठीचे पात्रता निकष

  • अर्जकरणारा व्यक्ती हा किमान 18 वर्षाचा असावा किंवा त्यापेक्षा जास्त कितीही वय चालेल.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • ज्या कुटुंबाकडे दारिद्ररेषेचे कार्ड आहे त्या कुटुंबातील एक व्यक्तीच योजनेसाठी अर्ज करू शकेल.
  • मागासवर्गीय समाजातील जसे अनुसूचित जाती व जमाती, अपंग व्यक्तींना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.

शौचालय अनुदान योजनेसाठी ऑफलाईन अर्ज पद्धती

  • जर ऑफलाईन अर्ज करायचा झाल्यास तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भेट द्यावी लागेल.
  • तेथून शौचालय अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • त्या अर्जावर विचारण्यात येणार संपूर्ण माहिती मुद्देसूद भरायची असते.
  • सर्व कागदपत्रे शौचालय योजनेच्या अर्जासोबत जोडून घ्यायाचे आहेत.
  • शेवटी ते अर्ज आणि कागदपत्रे ग्रामपंचायत सचिवांकडे सबमिट करा.

ऑनलाईन अर्ज पद्धती

ऑनलाईन पद्धतीने योजनेचा अर्ज करायचा असेल तर खालीलप्रमाणे सांगितलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.

  • PM Sauchalay Yojana 2025 साठी पात्र असाल तर सर्व कागदपत्रे व्यवस्थित बनवून तयार ठेवावीत.
  • नंतर सरकारचं अधिकृत पोर्टल स्वच्छ भारत मिशन ला भेट द्या.
  • तिथे तुम्हाला सर्वप्रातः तुमचे रजिष्ट्रेशन करायचे आहे.
  • त्यासाठी सिटीझन रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करावे लागेल.
  • तिथे खाते बनवण्यासाठी तुम्हाला आधारसीं लंकन असलेला मोबाईल टाकायचा आहे.
  • लक्षात ठेवा तुम्ही जो मोबाईल नंबर टाकाल तोच तुमचा लॉग इन आयडी असेल.
  • नंतर तुमचं नाव , जेन्डर आणि तुमचा पत्ता टाकावा लागेल.
  • एक कॅपच्या चा कोड भरायचा आहे व सबमिट बटनावर क्लिक करूनटाकायचे.
  • नंतर तुमचे खाते एक नोटिफिकेशन येईल, त्यामध्ये सांगेल कि तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड सांगेल.
  • नंतर आपल्याला लॉग हा पर्याय निवडायचा आहे आणि आपला मोबाईल नंबर आयडी मध्ये भरायचा आहे आणि पासवर्ड मध्ये त्यातलेच शेवटचे चार अंक टाकावे लागेल. कॅपच्या कोड भरा आणि साइन इन करा.
  • नांतर तुमच्या पुढे पासवर्ड बदलण्यासाठीचा पर्याय येईल.
  • तिथे तुम्हाला तुमचा जुना पसवॊर्ड टाकून नवीन पासवर्ड बनवता येणार आहे.
  • पुढे तुम्हाला आता नवीन अर्ज करायचा आहे त्यासाठी उजव्या बाजूने एक नंबरचे पर्याय दिसेन त्यावर क्लिक करून घ्याचे आहे.
  • नंतर तुमच्यापुढे एक योजनेचा फॉर्म येईल त्यामध्ये विचारण्यात येणारी संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अर्ज भारत असतांना काही कागदपत्रे सुद्धा अपलोड करावे लागतील.
  • सर्व प्रकीरिया झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करून घ्याचे आहे.

निष्कर्ष

आज आपण या आर्टिकल मध्ये स्वच्छ भारत मिशन अभियानाचा एक मुख्य भाग शौचालय अनुदान योजनांची संपूर्ण माहिती बघितली आहे. आम्ही सांगितलेल्या माहितीनुसार आपण अर्ज करून योजनेचा नक्कीच लाभ मिळवाल हीच आशा आहे. जर माहिती कामाची वाटली असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. अर्ज करतांना काही अडचण आल्यास कंमेंट्स मध्ये नक्की सांगा, आमची टीम नक्कीच मदत करेल, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More 

---Advertisement---

Leave a Comment