दहावी पास असाल तर सरकार देणार 5,000 रुपये महिना : Pradhanmantri Internship Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhanmantri Internship Yojana: आर्टिकल चे हेडिंग वाचून आपल्याला कदाचित कढलेच असेल कि हि योजना नेमकी कशी आहे. केंद्र सरकारने देशातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु केलेली आहे. जे कि प्रत्येक वर्षी राबविण्यात येते आणि लाखो युवक या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे जीवन मान सुधारण्याचा प्रयत्न करत असतात.

कुठे जॉब च्या शोधामध्ये गेले तर त्यांना अनुभव मागत असते. त्यामुळे जे फ्रेशर युवक असतात त्यांना जॉब मिळणे कठीण होते. राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील युवकांना या इंटर्नशिप योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या मध्ये जॉब कसा करायचा आणि मोट्या कंपन्या मध्ये काम कसे केले जाते याचा अनुभव घेण्यासाठी हि एक उत्तम संधी राहणार आहे.

Read Also: टायपिंग येत असेल तर सरकार देणार 6,500 रुपये, लवकर करा अर्ज: Amrut Yojana Maharashtra

What Is Pradhanmantri Internship Yojana: प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना काय आहे?

What Is Pradhanmantri Internship Yojana
What Is Pradhanmantri Internship Yojana

इंटर्नशिप या शबदावरु समजते कि, Pradhanmantri Internship Yojana अंतर्गत जॉब दिला जाणार आहे. जे कि फक्त अनुभव घेण्याकरिता असणार आहे. हो सरकारने घोषित केलेल्या पत्रकानुसार पात्र बेरोजगार युवक किंवा युवतीला 12 महिन्याची हि इंटर्नशिप दिली जाणार आहे. तसेच याचे पगार हा स्टायफंड स्वरूपात मिळणार आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 5,000 हजार रुपये प्रति महिना स्टायफंड सरकार देणार आहे. सोबत इंटर्नशिप केल्याचे प्रमाण पत्र मिळणार आहे. एवढेच नाही तर संपूर्ण 12 महिने कामाचा अनुभव घेतल्यानंतर अतिरिक्त बोनस स्वरूपात 6,000 रुपयेसुद्धा सरकार या योजनेमार्फतच देणार आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनासाठी अर्ज कसा करायचा? योजनेचे फायदे काय? लाभ घेण्याकरिता पात्रता निकष कोणती? तसेच योजना राबविण्या मागील सरकारचे उद्देश काय आहे. या सर्व बाबींवरती प्रकाश आपण या आर्टिकल मध्ये टाकणार आहोत.

योजनेचे उद्देश

देशातील बेरोजगारीचे वाढते प्रमाण बघून त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हि योजना सुरु केली आहे. सुशिक्षित तरुणांना एक सुवर्ण संधी या योजनेमार्फत तयार करून देण्याचे काम सरकारने केले आहे. योजनेचा लाभ घेऊन कंपनी मध्ये कशाप्रकारे काम केले जाते याचे प्रशिक्षण दिले जाते आणि कौशल्यांचा विकास होण्यास मदत होते. ज्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागतो. आणि अनुभव आल्यामुळे रोजगाराचे विविध दारे उघडतील.

योजनेची महत्वाची वैशिष्ट्य

  • पात्र अर्जदाराला 12 महिन्यांसाठी 5000 विद्यावेतन दिले जाणार आहे. ज्यामध्ये 4500 रुपये हे सरकारमार्फत मिळतील तर 500 रुपये हे संबंधित कंपनी मार्फत दिले जाणार आहेत.
  • 12 महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केल्यावर 6000 रुपयाचे बोनस सुद्धा मिळणार.
  • जर लाभार्थी तरुणाने योजनेची माहिती इत्तर बेरोजगार बांधवांना दिली आणि त्यांनी हि अर्ज भरला तर, रेफर केल्याबद्दल त्या तरुणाला 1000 – 5000 रुपयांच्या दरम्यान बक्षीस दिले जाईल.
  • योजनेचा लाभ घेणाऱ्या तरुणाला उद्योग कसा करायचे याचे प्रशिक्षण सुद्धा मिळते.
  • Pradhanmantri Internship Yojana मार्फत इंटर्नशिप व्यवस्थित पूर्ण केल्यावर तरुणाला अनुभव मिळाल्याने चांगल्या कंपनी मध्ये रोजगार प्राप्त होतो.

योजनेचे पात्रता निकष

  • अर्जदार हा किमान 10,12 किंवा आयटीआय उत्तीर्ण केलेला असायला हवा.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 21- 24 च्या मध्य असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • कुटुंबातील कुठलीही व्यक्ती जा सरकारी नोकरदार असेल तर त्या युवकाला/ युवतीला योजनेच्या लाभापासून बाद करण्यात येईल.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचे फायदे

  • राज्यातील तथा देशातील बेरोजगार तरुणाला इंटर्नशिप पूर्ण करताना मिळणाऱ्या विद्या वेतन आणि बोनस मुळे आर्थिक मदत होईल.
  • लाभार्थी व्यक्तीला प्रशिक्षण दरम्यान नवीन नवीन कौशल्य शिक्षण्याची संधी मिळेल. तसेच व्यक्तिमत्व विकास होईल.
  • योजनेचा लाभ पूर्ण पाने घेतल्यानंतर सरकारकडून एक प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे. ज्याचा फायदा त्यांना भविष्यात चांगल्या नोकरी साठी होऊ शकेल.
  • इंटर्नशिप करताना नवीन नवीन उद्योजक लोकांसोबत ओळख होईल, जे त्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणींमध्ये मदत करू शकतील.
  • कौशल्य विकास, कामाचा अनुभव मिळाल्यामुळे कुठल्याही कंपनी मध्ये नोकरी मिळण्याची संभवता वाढेल.
  • देशातील मोठं मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची आणि स्वतःचा विकास घडवून आणण्याची हि मोठी साधी मिळणार आहे.
  • योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचा आर्थिक विकासासोबत सर्वांगीण विकास सुद्धा होईल.
  • देशातील वाढत्या बेरोजगारीचा पूर्ण विराम तर नाही पण काह्ही प्रमाणामध्ये कमी करता येणार आहे.

लागणारी कागदपत्रे

  1. अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  2. 10 वी किंवा 12 वीचा शाळा सोडल्याचा दाखला
  3. मार्कशीट
  4. बोर्डाचे प्रमाणपत्र
  5. स्कॅन केलेले पासपोर्ट फोटो
  6. स्कॅन केली स्वाक्षरी
  7. कुठल्याही कामच अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र
  8. उत्पन्नाचा दाखला
  9. जातीचा दाखला
  10. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (असल्यास)
  11. रहिवासी दाखला

असा करा योजनेचा अर्ज

सर्वप्रथम Pradhanmantri Internship Yojana चा लाभ घेण्याकरिता तुम्ही पात्र आहेत का ते तपासा. आणि नंतर खालील पद्धतीचा अवलंब करून अर्ज करा.

  • जर तुम्ही पात्र असाल तर सरकारने प्रसारित केलेल्या अधिकृत साइट वरती जावे.
  • तेथे तुम्हला आदी तुमचे खाते तयार करावे लागणार आहे. तुमचा सुरु मोबाईल नामाबर आधार कार्डशी लिंक असलेला तेथे टाकावा लागेल आणि साइन अप करावे लागेल.
  • ते झाल्यानंतर मंग पार्ट लॉग इन करून तुम्ही योजनेच्या डॅशबोर्ड वरती जाऊ शकता.
  • तेथे तुम्हाला अर्ज करण्याचा एक उजव्या बाजूला पर्याय दिसेल.
  • त्यावरती क्लिक करून तुमच्या पुच्यापुढे योजनेचा फॉर्म येईल.
  • त्या फॉर्म वरती तुमची सर्व वयक्तिक माहहती नाचूकता भरायची आहे. जसे कि, तुमचे नाव, गाव, मोबाईल नंबर, मेल आयडी इत्यादी.
  • नंतर मागण्यात आलेली काही महत्वाची कागदपत्रे उधं तुम्हाला तेथे अपलोड करायची आहे.
  • ज्यामध्ये तुमचे उत्पनाचे प्रमाणपत्र, शिक्षणाची प्रमाणपत्र येतील.
  • तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये काम कातरण्यास आवडेल लिंग तुमचे शिक्षण पूर्ण झालेले क्षेत्र तुम्ही इंटर्नशिप साठी निवडू शकता.
  • तुम्हाला भारतातील टॉप कंपन्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
  • सर्व अर्ज पूर्णपणे भरन झाल्यावरती ते एकदा परत तपासा आणि सर्व बरोबर असेल तर सबमिट बटनावरती क्लिक करा.
  • अशा एकदम सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने अर्ज भरून तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

निष्कर्ष

स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वात महत्वाचे असते ते भांडवल. परंतु हे भांडवल घरी बसून तर मिळणार नाही आहे, त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि तेव्हा कुठे आपण हे मिळवू शकतो. ज्यामुळे आपल्या सर्व मूलभूत गरजा ह्या पूर्ण होऊ शकत असतात. परंतु आज बेरोजगारीमुले यवकांची दशा आपण पाहतच आहोत.

त्यामुळे ह्या सर्व तरुणीनं एक दिशा देण्यासाठी, त्यांचा विकास होण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (Pradhanmantri Internship Yojana) राबविण्याचा निर्धार केला आहे. ज्याचा फायदा आतापर्यंत हजारो, लाखो बेरोजगार युवकांनी घेतला आहे आणि स्वतःचे करियर बनवले आहे. त्यामुळे जर तुम्हाला नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर योजनेचा अर्ज करा आणि लाभ घ्या. अर्ज करताना काही अडचणी येत असेल तर आमच्या व्हाट्स अप ग्रुप ला जॉईन करा, धन्यवाद.

FAQs

  1. Que: प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना काय आहे?

    Ans- देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याकरिता केंद्रसरकारने सुरु केलेली हि एक योजना आहे. ज्या मार्फत 12 महिने इंटर्नशिप वरती रोजगार दिला जातो आणि त्याला विद्यावेतन प्रतिमाह 5000 रुपये मिळते.

  2. Que: प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

    Ans- देशातील 21 ते 24 वयोगटामधील बेरोजगार युवक या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी किमान त्यांनी दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक सांगितले आहे. तसेच त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल तरच पात्र करण्यात येणार आहे.

  3. Que: प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेमार्फत किती स्टायफंड मिळते?

    Ans- 12 महिने करीत इंटर्नशिप आहे, त्यामध्ये प्रति महिना 5000 रुपये स्टायफंड दिले जाते आणि सर्व प्रेअशिक्षण पूर्ण झाल्यावरती 6,000 हजार रुपये मिळणार आहेत. असे ऐकून एक वर्षाचे 66 हजाराचे विद्यावेतन मिळणार आहे.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment