Pradhanmantri Krishi Anudan Yojana 2025: शेतकरी हा शब्द एकताच शहरातील लोक त्याची औकादच काढायला निघत असतात. परंतु हाच जगाचा पोशिंदा कोणालाही काहीही ना बोलता स्वतःचे काम तो करत असतो. स्वाता राब राब शेतामध्ये राबतो आणि वर्षाच्या शेतवती निघालेल्या उत्पादनातून पुढील वर्ष काढतो.
एकेकाळी शेती करण्याकरिता पैसे नसतील तरी तो कर्ज काढतो तरी करो तर शेतीच. शेती अर्थात कृषि आहे म्हणून हे जग टिकून आहे याचे भान मात्र आजकालचे नवयुवक विसरून जातांना आपण बघतो आहे. शेतकरी हा सुद्धा करोडपती बानू शकतो परंतु गरज आहे योग्य मार्गदर्शनाची.
सरकार, प्रधानमंत्री कृषि अनुदान योजना राबवते परंतु त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि त्या नवीन योजना कोणत्या ह्या मात्र आमच्या भोळ्या, साद्या शेतकऱ्याला कढतच नाही. ह्याच गोष्टीची जाणीव आणि शेतकरी पुत्र असल्याच्या नात्याने आज आम्ही सरकारच्या प्रधानमंत्री कृषि अनुदान योजना कोणत्या कोणत्या आहे, त्यासाठी पात्र कोण असेल याविषयी सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Read Also: शेतकऱ्यांसाठी विविध शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र 2025|Shetkari Sarakari Yojana In Marathi
प्रधानमंत्री कृषि अनुदान योजना कोणत्या आहेत? Pradhanmantri Krishi Anudan Yojana In Marathi
शेती करत असतांना राज्यातीलच नाही तर देशातील शेतकरयांना सुद्धा अनेक नैसर्गिक आणि आर्थिक संकटांचा सामना हा करावाच लागत असतो. परंतु काही वेळा आर्थिक आणि नैसर्गिक संकटांना सुद्धा अंगावर घेण्याकरिता सरकार विविध योजना राबवून शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम करत असते. आत ह्या केंद्र सरकारच्या अश्या कोणत्या कृषी अनुदान योजना आहेत, त्याची यादी आणि त्यांची सविस्तर माहिती सुद्धा आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
- प्रधानमंत्री फसल बिमा योजना
- कृषि यांत्रिकीकरण उप-मिशन योजना
- परंपरागत कृषि विकास योजना
- राष्ट्रीय शास्वत शेती अभियान
- राष्ट्रीय पशुधन मिशन
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनांपैकी अतिशय महत्वाची आणि भारतभर फेमस झालेली हि योजना आहे. या योजनेअंतरंगात केंद्र सरकार अल्पभूदारक गरीब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 6000 हजाराचे प्रति वर्ष अनुदान तीन टप्यांमध्ये टाकत असते.
ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणींना तोंड देण्याकरिता फार मोठा हातभार लागत असतो. योजनेचा लाभ घेण्याकरिता देशातील अल्पभूदारक शेतकरी ज्यांच्याकडे दोन हेक्टर पेक्षा अधिक शेती नाही आहे तेच पात्र होऊ शकणार आहेत.
तसेच जर शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी निकारीवर कार्यरत असेल अथवा टॅक्स भारत असेल तर मात्र त्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आहे.
सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत देशातील 11 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3.75 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने pmkisan.gov.in या वेबसाईट वरती भारत येऊ शकतो.
लाभार्थ्यांचे मनोगत
प्रभाकर वीर: नमस्कार, मी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एक अल्पभूदारक शेतकरी आहे. वाढत्या महागाईला मी आणि माझे कुटुंब खूप कंटाळलेले होतो. शेतातील पीक येते ते वर्षाच्या शेवटी आणि त्यामुळे वर्षभर उदर्निर्वाह करण्याकरिता कर्ज काढावे लागत होते.
जेव्हा पासून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली तसेच राज्यसरकारने नमो शेतकरी योजना राबविली तेव्हापासून आम्हाला फार मोठी मदत होत आहे.
प्रधानमंत्री फसल बिमा योजना
शेतामध्ये पीक घेत असतांना अनेकवेळा नैसार्गिकी आपत्ती ह्या येत असतात. कधी पाण्याचा दुष्काळ पडतो, कधी अति वृष्टी होते तर कधी गारपीट होते. यामुळे होत काय कि, शेतकऱ्यांना उत्पन्न तर कमी होतेच सोबत त्याने जो खर्च केला असतो ते देखील या पिकांमधुन निगू शकत नाही.
त्यामुळे जेव्हापासून शेतकरी बियाणे विकत घेऊन पेरणी करात तर त्याचे उत्पादन घरी येई पर्यंत हा पीक बिमा काढला जात असतो. ज्या हि भागात नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान होते त्या भागातील शेतकऱ्यांचा खात्यामध्ये या योजनेकडून बिमा रक्कम जमा केली जाते.
शेतकरयांना बिमा प्रीमियम हे खरीब पिकांसाठी 2%, रब्बी पिकांसाठी 1.5%, फळे, भाजीपालांसाठी 5% अनुदान प्रधानमंत्री फसल बिमा योजना मार्फत मिळणार आहे.
लाभार्त्यांचे मनोगत
वामन वरघट: या वर्षी म्हणजे 2025 मध्ये प्रधानमंत्री फसल बिमा योजना चा लाभ मिल मिळाला आहे. मागील वर्षी अतिवृष्टी मुळे माझ्या शेतातील पिकाची फार मोठी नासधूस झाली होती.
त्यामुळे मला काढतच नव्हते का करावे. मी शेतामध्ये पेरणी करण्याकरिता सुद्धा बियाणे उधार घेऊन आलो होतो आणि निसर्गाने कहर केला वर सर्व पीक हे माती मध्ये गेले होते. पीक विमा आमच्या खात्यामध्ये जमा केल्याबद्दल मी सरकरचे आभार मानतो.
कृषि यांत्रिकीकरण उप-मिशन योजना
सरकारची प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनाचा एक महत्वाचा भाग कृषि यांत्रिकीकरण उप-मिशन योजना आहे. कारण शेती करतांना विविध यांत्रिक उपकरणाचे काम पडणारच हे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे.
कारण आदींच्या काळात बैल होते, त्यांना शेतामध्ये जोतून शेती केली जात होती. आता मात्र जमाना बदलला आणि बैलाची जागा अंधुक यंत्रांनी घेतली आहे. ट्रॅक्टर, हायवेस्टर, थ्रेशर सारखे अनेक उपकरणाचा वापर करून कमी वेळेचं अतिशय चांगली शेती करता येते. मात्र हे सर्व यंत्र, उपकरणे विकत घेणे गरीब आणि अल्पभूदारक शेतकऱ्यांना जणू असंभवच असते.
पण सरकारच्या कृषि यांत्रिकीकरण उप-मिशन योजना मार्फत आटा हे सुद्धा संभव होऊ शकणार आहे. अल्पभूदारक शेतकरी सुद्धा स्वतःचे उपकरण विकत घेऊन आधुनिक शेती करू शकतील. सरकार ट्रॅक्टर, हायवेस्टर, थ्रेशर आणि द्रोण सारख्या उंत्रांसाठी आणि त्यांच्या सर्व उपकरणांसाठी 50% पर्यंतचे अनुदान देणार आहेत.
लाभार्थ्यांचे मनोगत
सुनील डोंगरे: मी एक अल्पभूदारक आणि गरीब शेतकरी शेती करत असतांना आधुनिक यंत्राचा वापर तर करावाच लागतो, परंतु ते नेहमी नेहमी भाड्यानं आणले तर अर्ध्या पिकाचे पैसे हे प्रत्येक वर्षी भाड्यामध्येच जात होते.
मग मला माझ्या एका मित्राने प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनांपैकी एक योजना कृषि यांत्रिकीकरण उप-मिशन योजना विषयी माहिती दिली. मग मी सुद्धा अर्ध्या किमतीमध्ये स्वतःचे एक ट्रॅक्टर विकत घेतले आहे.आता मला न कोणाला भाडे देण्याचे काम आहे नाही जास्त मेहनत घेण्याचे. उलट मी माझे ट्रॅक्टर हे भाड्याने देऊन चाली कामे सुद्धा करतो.
परंपरागत कृषि विकास योजना
हि योजना कृषी अनुदान योजना पैकी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारी केंद्र सरकारची योजना आहे. त्यामार्फत सरकार 50 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समूहाला प्रति हेक्टर 31,000 अनुदान देणार आहेत. जे कि तीन वर्षासाठी मर्यादित असेल. सोबतच सेंद्रिय शेती करण्याबाबतचे सर्व प्रशिक्षण सुद्धा सरकारच देणार आहेत. ज्यामुळे शुद्ध आणि केमिकल मुक्त फळ, भाजीपाला आणि धान्य नागरिकांना मिळू शकेल.
राष्ट्रीय शास्वत शेती अभियान
वातावरणाशी जुळवून घेण्याकरिता शेतकऱ्यांना शास्वत शेती अभियान अतिशय महत्वाचे आहे. या योजनेअंतर्गत माती आरोग्य कार्ड सुद्धा शेतकऱ्याला दिले जाते. तसेच पिकाला सिंचनाची व्यवस्था होण्याकरता 35% ते 50% पर्यंत अनुदान मिळणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्याला अधिक मेहनत करण्याची गरज पडणार नाही आणि पाण्याचा सुद्धा योग्य वापर होईल.
राष्ट्रीय पशुधन मिशन
शेतीसोबत एखादा जोडधंदा असेल तर शेतकऱ्याच्या विकासाला कोणीही अडवू शकत नाही. शेतामध्ये चांगले उत्पादन नाही झाले तर जोड धंद्या मदे होईल तसेच जर धंद्यामध्ये नाही झाले तर शेती मध्ये होईल.
हि पद्धत खूप वर्षांपासून आपल्या राज्यात आणि देशात चालत असते. सरकार सुद्धा पोल्ट्री फॉर्म, शेळी पालन, बकरी पालन, गायी- म्हैस पालन करण्याकरिता राष्ट्रीय पशुधन निधन मार्फत सरकार 50 लाख रुपयावर 50% ची सबसिडी अर्थात अनुदान देणार आहे.
ज्यामुळे शेतीसोबत शेतकरी स्वतःचा मोठा उद्योग सुद्धा उभारू शकतील. तसेच अधिक उत्पन्न घेऊ शकतील. या योजनेमुळे बेरोजगार असलेले नवयुवक सुद्धा शेतीकडे आकर्षित होऊन पशुधन मिशन योजनेचा लाभ घेऊन रोजगार निर्माण करतील.
निष्कर्ष
शेतकऱ्याचा आर्थिक आणि सर्वांगीण विकास होण्याकरिता सरकार नेहमी वेगळ्या वेगळ्या योजना कादहत असते. ज्याचा लाभ घेऊन शेतकरी शेती सोबत स्वतःचा आणि परिवाराचा सुद्धा विकास करू शकणार आहेत. त्यामुळेच आज आपण या आर्टिकल मध्ये सर्व प्रधानमंत्री कृषि अनुदान योजना (Pradhanmantri Krishi Anudan Yojana) बघितल्या आहेत. आम्हाला आशा आहे कि आम्ही या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती कामाची वाटली असेल. काही अडचण असेल तर तुम्ही कंमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता, धन्यवाद.